दोन भारतीय संस्थांना 2021 चा यूएनडीपी विषुववृत्त पुरस्कार जाहीर
संरक्षण आणि जैवविविधता क्षेत्रात काम केल्याबद्दल 2021 सालच्या प्रतिष्ठित विषुववृत्त पुरस्कारप्राप्त 10 संस्थांमध्ये भारतातील आधारमल पझांगुडीयनर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि स्नेहकुंज ट्रस्ट या दोन संस्थांचा समवेश आहे. यूएनडीपी जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापराद्वारे गरीबी कमी करण्याच्या समुदायातील प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी हा द्वैवार्षिक पुरस्कार देते.आधारमल पझांगुडीयनर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही तमिळनाडूतील नीलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हमधील 1700 सदस्यांची सहकारी संस्था असून टी संपूर्णपणे स्थानिक लोकांतर्फे चालविली जाते. स्नेहकुंज ट्रस्टने 45 वर्षे समुदाय-आधारित जीर्णोद्धार आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करून पश्चिम घाट आणि कर्नाटक किनारपट्टीवर संवेदनशील वेटलँड आणि किनारपट्टीवरील परिसंस्थाचे संरक्षण केले आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो