Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi |...

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_30.1

 

दैनिक चालू घडामोडी: 18 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 18 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

राज्य बातम्या

  1. राजस्थान सरकार वैदिक शिक्षण व संस्कार मंडळ स्थापन करणार आहे

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_40.1

  • संस्कृत ग्रंथसंग्रह,शास्त्रे व वेदांचे ज्ञान पुनरुज्जीवित करण्यासाठी राजस्थान सरकार येत्या चार-पाच महिन्यात  वैदिक शिक्षण व संस्कार मंडळ स्थापन करणार आहे.
  • मंडळाची ध्येय, उद्दीष्टे व त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. संस्कृत शिक्षण, राज्यमंत्री सुभाष गर्ग यांनी नमूद केले आहे की, अहवालाच्या आधारे मंडळासमोर मॉड्यूल्स सादर केले जातील. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मान्यतेनंतर वैदिक मंडळ कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • राजस्थानचे मुख्यमंत्री: अशोक गहलोत
  • राज्यपाल: कालराज मिश्रा

 

2. मध्य प्रदेश सरकारने ‘युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान’ सुरू केले

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_50.1

  • मध्य प्रदेश सरकारने सध्या सुरू असलेल्या कोविड -19 च्या महामारीबद्द्ल राज्यातील सर्व लोकांना जागरूक करण्यासाठी ‘युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाद्वारे  युवा शक्तीच्या साहय्याने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे.
  • महाविद्यालयातील मुले छोट्या गटांमध्ये “कोव्हीड-अनुकूल वर्तणूक आणि लसीकरणाचे” महत्व याची माहिती देतील. हे अभियान राज्याचे उच्च शिक्षण व  तंत्रशिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागच्या साहय्याने चालवणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान
  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल.

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

3. ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर यूके आणि ऑस्ट्रेलिया यांनी सहमती दर्शविली

  • युनायटेड किंगडमबरोबरचा नवीन मुक्त व्यापार करार ऑस्ट्रेलियन नागरिकांना अधिक रोजगार आणि निर्यातदारांना व्यवसायाच्या अधिक संधी निर्माण करणारा असून दोन्ही देशांना बदलत्या सामरिक वातावरणात अधिक जवळ आणणारा ठरणार आहे.
  • ऑस्ट्रेलिया-यूके मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) व्यापक रूपरेषेवर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि बोरिस जॉनसन यांनी सहमती दर्शविली आहे.या करारामुळे ऑस्ट्रेलियन उत्पादक आणि शेतकर्‍यांना यूकेच्या बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रवेश मिळून त्यांच्या व्यापाराला अधिक चालना मिळणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • यूके राजधानी: लंडन
  • यूके पंतप्रधान: बोरिस जॉन्सन
  • यूके चलन: पाउंड स्टर्लिंग
  • ऑस्ट्रेलिया राजधानी: कॅनबेरा
  • ऑस्ट्रेलिया चलन: ऑस्ट्रेलियन डॉलर
  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान: स्कॉट मॉरिसन

 

नियुक्ती बातम्या

4. सरकारने आशिष चांदोरकर यांची भारताच्या डब्ल्यूटीओ मिशनमध्ये संचालक म्हणून नेमणूक 

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_60.1

  • भारत सरकारने तीन वर्षांसाठी आशिष चांदोरकर यांना जागतिक व्यापार संघटनेत भारताच्या कायमस्वरुपी मिशनमध्ये समुपदेशक म्हणून नियुक्त केले आहे.
  • मिशनमध्ये प्रथमच एका खासगी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. चांदोरकर हे बेंगळुरू-स्थित पॉलिसी थिंक टँक स्माही फाउंडेशन ऑफ पॉलिसी अँड रिसर्चचे संचालक आहेत.डब्ल्यूटीओ ही 164-सदस्यांची बहुपक्षीय संस्था आहे जी जागतिक व्यापाराशी संबंधित आहे. 1995 पासून भारत सदस्य आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक: एनगोझी ओकोंजो-इव्हिला
  • जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • जागतिक व्यापार संघटना स्थापना: 1 जानेवारी 1995

 

बँकिंग बातम्या

5. एलआयसी सीएसएलने आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने प्रीपेड गिफ्ट कार्ड सुरू केले

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_70.1

  • एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस (एलआयसी सीएसएल) ने रुपे प्लॅटफॉर्मवर आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने कॉन्टॅक्टलेस (संपर्कहीन) प्रीपेड गिफ्ट कार्ड ‘शगुन’ सुरू केले आहे.एनपीसीआयने रुपे नेटवर्कवर शगुन गिफ्ट कार्ड सुरू करण्यासाठी एलआयसी सीएसएल आणि आयडीबीआय बँकेसह  सह भागीदारी केली.
  • या कार्डमध्ये कमीत कमी ₹500 ते जास्तीत जास्त ₹10000 आणि याची वैधता 3 वर्षे असेल. ते ऑनलाइन शॉपिंग, बिले भरणे, हवाई, रेल्वे, बससाठी तिकिटे बुक इत्यादी विविध मोबाईल वॉलेट्स आणि ई-कॉमर्स पोर्टल किंवा हे कार्ड वापरुन अ‍ॅप्सद्वारे देखील वापरू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयडीबीआय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: राकेश शर्मा
  • आयडीबीआय बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र

 

अर्थव्यवस्था बातम्या

6. सीआयआयने भारताच्या वित्तीय वर्ष 2022 जीडीपी वाढीच्या दराचा 9.5% वर्तवला आहे

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_80.1

  • भारतीय उद्योग परिसंघाने (सीआयआय) चालू आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 9.5 % वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. ही वाढ वित्तीय वर्ष 2020 पेक्षा जास्त असणार आहे.

 

रँक आणि अहवाल बातम्या

7. मध्यवर्ती बँकेच्या अतिरिक्त हस्तांतरणामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_90.1

  • सन 2020 -2021 च्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सरकारकडे हस्तांतरित झालेल्या साठ्याच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे. टर्की हा देश प्रथम स्थानावर आहे.
  • आरबीआयने ₹99,122 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न वित्तीय वर्ष 21 साठी सरकारकडे हस्तांतरित केले आहे जे 2019-20 मध्ये भरलेल्या, ₹57,128 कोटींपेक्षा 73% जास्त आहे.आरबीआयने हस्तांतरित केलेली अतिरिक्त रक्कम जीडीपीच्या 0.44% आहे, तर तुर्की प्रजासत्ताकच्या मध्यवर्ती बँकेने हस्तांतरित केलेली अतिरिक्त रक्कम जीडीपीच्या 0.5% आहे.

 

8. जागतिक शांतता निर्देशांक 2021 जाहीर 

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_100.1

  • इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (आयईपी) सिडनीने, जागतिक शांतता निर्देशांक 2021 ची 15वी आवृत्ती प्रकाशित केली. जीपीआय हे जागतिक शांततेचे एक अग्रगण्य मोजमाप आहे. या निर्देशांकात शांततेच्या स्तरानुसार 163 देश आणि प्रदेशांचा क्रमांक लावला आहे.
  • जागतिक स्तरावर: सर्वात शांततापूर्ण देश- आईसलँड (2008 पासून), न्यूझीलंड, डेन्मार्क, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया हे त्यानंतरचे चार देश आहेत, अफगाणिस्तान मागील चार वर्षांपासून सर्वात कमी शांततापूर्ण देश आहे आणि त्यानंतर येमेन, सिरिया, दक्षिण सुदान आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो.
  • दक्षिण आशिया: मागील वर्षाच्या मानांकनातून भारत दोन क्रमांक पुढे सरकला आहे आणि जगातील 135 वा आणि या क्षेत्रातील 5 वा सर्वात शांततापूर्ण देश बनला आहे.
  • भूतान आणि नेपाळ हे या क्षेत्रातील अनुक्रमे पहिला आणि दुसरा शांततापूर्ण देश आहेत. बांगलादेश- जागतिक स्तरावर 91 / 163 आणि दक्षिण आशिया मध्ये तिसरा शांततापूर्ण देश आहे.
  • श्रीलंका- 2020 च्या तुलनेत 19 क्रमांकांची घट होऊन जगात 95 वा आणि दक्षिण आशिया मध्ये चौथा शांततापूर्ण देश आहे. पाकिस्तान – जागतिक स्तरावर 2020 च्या तुलनेत दोन क्रमांक वाढून 150 व्या स्थानावर आणि या प्रदेशात 6 व्या स्थानावर आहे.

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या

9. युरोपियन अंतराळ संस्था (ईएसए) जगातील पहिला लाकडा पासून बनवलेला उपग्रह प्रक्षेपित करणार आहे
Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_110.1
  • युरोपियन अंतराळ संस्थेने (ईएसए) जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे. हे प्रक्षेपण न्यूझीलंडमधून होणार आहे. 2021 च्या अखेरीस रॉकेट लॅब इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे याचे  प्रक्षेपण केले जाईल. हा उपग्रह जरी मकिनेन यांची संकल्पना आहे.
  • डब्ल्यूआयएसए वुडसॅट हा उपग्रह नॅनो उपग्रह (सूक्ष्म उपग्रह) आहे. याची लांबी,रुंदी आणि उंची 10 सेमी असेल. युरोपियन अंतराळ संस्थेने (ईएसए) उपग्रहाचे सेन्सर विकसित केले आहेत आणि ते शुष्क  राहण्यासाठी  शास्त्रज्ञांनी हे लाकूड थर्मल व्हॅक्यूम चेंबरमध्ये ठेवले आहे.
  • लाकडापासून येणारी वाफ कमीतकमी कमी करण्यासाठी आणि अणु ऑक्सिजनच्या नष्ट  करणाऱ्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी अत्यंत पातळ अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईडचा थर वापरला जाणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • युरोपियन अंतराळ संस्था मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स
  • युरोपियन अंतराळ संस्थेची स्थापना: 30 मे 1975, युरोप
  • युरोपियन अंतराळ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जोहान-डायट्रिच वॉर्नर

 

क्रीडा बातम्या

10. स्पोर्ट्स ब्रँड पुमा इंडियाने युवराज सिंगबरोबर भागीदारी वाढवली

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_120.1

  • गेल्या दशकभरापासून या ब्रँडशी संलग्न असलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगबरोबर ग्लोबल स्पोर्ट्स ब्रँड पुमा इंडियाने भागीदारी वाढविली आहे.
  • यासह, युवराज ब्रँडच्या ग्लोबल लीगमध्ये  थियरी हेनरी, बोरिस बेकर आणि उसैन बोल्ट सारख्या दिग्गजांच्या रांगेत सामील झाला आहे.या नवीन भागीदारीनुसार युवराज आता भारतातील पुमा मोटर्सपोर्टचा चेहरा म्हणून दिसणार आहे.

 

महत्वाचे दिवस

11. 18 जून: शाश्वत सात्विक आहार दिन

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_130.1

  • आपल्या जगण्यातील सात्विक आहाराचे महत्व अधोरेखित करण्यासठी  शाश्वत सात्विक आहार दिन हा दिवस 18 जून रोजी पाळला जातो. 21 डिसेंबर 2016 रोजी  संयुक्त राष्ट्र आमसभेने हा दिवस पाळण्याचे निश्चित केले. गॅस्ट्रोनोमी म्हणजे सकस आहार निवडण्याची, स्वयंपाक करण्याची आणि सेवन पद्धत किंवा कला

 

12. 18 जून: स्वमग्न अभिमान दिवस

  • दर वर्षी, लोकांमध्ये स्वमग्नेतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वमग्न लोकांसाठी अभिमानाचे महत्त्व आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात येणार्‍या भूमिकेची ओळख होण्यासाठी 18 जून रोजी स्वमग्नता अभिमान दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
  • या दिवसाचा प्रातिनिधिक शुभंकर आहे इंद्रधनुष्य रंगातील अनंत प्रतीक जे स्वमग्न लोकांमधील असीम शक्यता दर्शविते. ‘अस्पीज फॉर फ्रीडम ’या संस्थेच्या पुढाकाराने 2005 मध्ये ब्राझीलमध्ये ऑटिस्टिक प्राइड डे प्रथम साजरा करण्यात आला.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_140.1

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_160.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi_170.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.