Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-13 July...

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_2.1

दैनिक चालू घडामोडी: 13   जुलै 2021

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 13 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. आयसीसीआर दिल्ली विद्यापीठात ‘बंगबंधू अध्यासन’ स्थापन करणार

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_3.1

  • बांगलादेशातील घटनांचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास अभ्यास करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात ‘बंगबंधू अध्यासन’ स्थापन केले जाणार आहे.
  • दिल्ली विद्यापीठात हे अध्यासन स्थापन करण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि दिल्ली विद्यापीठ यांच्यात ढाका येथे सामंजस्य करार करण्यात आला.

अध्यासनाविषयी:

  • हे अध्यासन दोन्ही देशांमधील समान वारसा आणि मानववंशशास्त्र, बौद्ध अभ्यास, भूगोल, इतिहास, बांगला संगीत, ललित कला, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आणि समाजशास्त्र यासारख्या विषयांच्या अभ्यासावर भर देणार आहे.
  • बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा सन्मान करण्यासाठी आणि बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य युद्धाच्या 50व्या वर्धापन दिन तसेच भारताचे बांगलादेशशी असलेल्या राजनैतिक संबंधांच्या स्मरणार्थ या अध्यासनाची स्थापना केली जाईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बांगलादेशच्या पंतप्रधान: शेख हसीना
  • बांगलादेशचे अध्यक्ष: अब्दुल हमीद
  • राजधानी: ढाका
  • चलन: टका

 

राज्य बातम्या 

 2. आसाम सरकार स्थानिक श्रद्धा आणि संस्कृतीसाठी विभाग स्थापन करणार

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_4.1

  • आसामच्या मंत्रिमंडळाने राज्यातील “स्थानिक समुदाय व आदिवासी जमातींच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा” यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची घोषणा केली आहे.
  • बोडो, रभास, मिशिंग्स यासारख्या स्थानिक आदिवासींच्या स्वत:च्या धार्मिक श्रद्धा आणि अनन्य परंपरा आहेत, ज्यांना आतापर्यंत त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेला आधार मिळालेला नाही.
  • त्यांचा विकास करण्यासाठी व आधार देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या 2 करोडपेक्षा कमी  किमतीच्या असलेल्या प्रकल्पांना मंजुरी देऊ शकतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हेमंता बिस्वा सरमा

 

 3. उत्तर प्रदेशने लोकसंख्या मसुद्यामध्ये दोन अपत्ये धोरण प्रस्तावित केले

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_5.1

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या धोरण अंमलात आणले असून त्याद्वारे दोन पेक्षा कमी अपत्ये असणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देण्यात येणार आहेत.
  • लोकसंख्या धोरण 2021-2030 मध्ये प्रत्येक समुदायाची काळजी घेण्यात आली आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले की उत्तर प्रदेश 2050 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे लक्ष्य ठेवले असून लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पर्यंत कमी करणे हा या धोरणाचा उद्देश आहे.
  • या धोरणानुसार ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबांना सरकारी नोकरी, रेशन मिळविणे व इतर सुविधांवर बंधने येतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ
  • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल 
  • उत्तर प्रदेशची राजधानी: लखनऊ 

 

आंतरराष्ट्रीय बातम्या 

 4. भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे कार्गो व्यापाराला चालना

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_6.1

  • भारत आणि नेपाळ यांनी 2004 च्या भारत-नेपाळ रेल सेवा करारामध्ये (आरएसए) सुधारणा  करण्यासाठी लेटर ऑफ एक्सचेंज (एलओई) वर सह्या केल्या आहेत.
  • सुधारित करारामुळे सर्व अधिकृत मालवाहू ट्रेन चालक भारतीय रेल्वे नेटवर्कचा वापर नेपाळ आणि भारतादरम्यान तसेच इतर देशांबरोबर कंटेनर आणि इतर मालवाहतूक करू शकतात.
  • भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार हा करार उभयपक्षांमधील व्यापाराला चालना देणारा ठरणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नेपाळचे पंतप्रधान: केपी शर्मा ओली
  • अध्यक्ष: विद्या देवी भंडारी
  • नेपाळची राजधानी: काठमांडू
  • चलन: नेपाली रुपया 

क्रीडा बातम्या 

 5. सोफी इक्लेस्टोन, डेव्हन कॉनवे यांना आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_7.1

  • इंग्लंडची डावखुरी  फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन आणि न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवे यांना जून 2021 चा आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हा किताब जिंकणारा डेव्हन कॉनवे हा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे.

 

 6. 2022 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन हरियाणा मध्ये होणार

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_8.1

  • 2021 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन फेब्रुवारी 2022 मध्ये हरियाणा राज्यात होणार आहे.
  • याआधी ही स्पर्धा डिसेंबर 2021 मध्ये होणार होती मात्र कोव्हीड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, युवा खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ही स्पर्धा फेब्रुवारी 2022 मध्ये ढकलण्यात आली आहे.

 

 7. युरो 2020 च्या अंतिम फेरीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट वर हरवले

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_9.1

  • इंग्लंड आणि इटली यांच्यामध्ये झालेल्या युरोपियन चँपियनशिप अंतिम लढतीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट (3-2) वर हरवून 2020 च्या युरो चषकावर आपले नाव कोरले.
  • अंतिम फेरीत पोहोचण्याची इंग्लंडची 1966 नंतर ही पहिलीच वेळ होती इटलीने याआधी 2000 आणि 2012 मध्ये युरो कप ची अंतिम फेरी गाठली होती.
  • इटलीचा गोलरक्षक ग्यानलुइगी डोन्नारुम्माला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा खिताब देण्यात आला.

 

 8. युरो 2020 मध्ये पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोला गोल्डन बूट सन्मान

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_10.1

  • पोर्तुगालचा कर्णधार आणि आधुनिक काळातील महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने  सर्वाधिक गोल केल्यामुळे युरो 2020 चषक स्पर्धेतील गोल्डन बूट पुरस्कार त्याला देण्यात आला.
  • त्याने एकूण 5 गोल डागले.

 

भागीदारी व करार 

 9. आयआयटी मद्रास आणि सोनी इंडिया एकत्रितपणे संवेदन 2021 आयोजित करणार

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_11.1

  • आयआयटी मद्रास प्रवर्तक टेक्नोलॉजीज फाऊंडेशन (आयआयटीएम-पीटीएफ) आणि सोनी इंडिया सॉफ्टवेयर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांनी ‘संवेदन 2021 – सेन्सिंग सोल्युशन्स फॉर इंडिया’ नावाच्या राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन आयोजित करण्यासाठी भागीदारी केली आहे.
  • हे सोनी सेमीकंडक्टर सोल्यूशन्स कॉर्पोरेशनच्या एसपीआरईएसईएनसीई™ बोर्डावर आधारित असून भारताशी सबंधित सामाजिक समस्यांवर उत्तरे शोधणे हा हॅकाथॉन उद्देश आहे.

 

पर्यावरण बातम्या 

 10. हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_12.1

  • हिमालयीन याकचा विमा काढण्यासाठी राष्ट्रीय याक संशोधन केंद्र (एनआरसीवाय) पश्चिम कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला.
  • या विमा पॉलिसी मुळे याक मालकांना हवामान आपत्ती, रोग, संक्रमण-अपघात, शल्यक्रिया किंवा दंगली यांच्यामुळे होणाऱ्या  जोखमीपासून संरक्षण मिळणार आहे.

हिमालयीन याक विषयी: 

  • हिमालयीन याक हा एक लांब केसांचा पाळीव प्राणी आहे जो भारतीय उपखंडातील हिमालयीन  प्रदेश, तिबेट पठार, म्यानमार आणि मंगोलिया आणि सायबेरियापर्यंत आढळतो
  • ते अतिशीत प्रदेशात -40°c पर्यंत राहू शकतात पण 13°c पेक्षा अधिक तापमान त्यांना घातक ठरू शकते.
  • भारतात याकची लोकसंख्या सुमारे 58,000 आहे.
  • सर्वाधिक याक लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये आहे. त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेश, सिक्किम, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडचा क्रमांक लागतो.

 

पुस्तके आणि लेखक 

 11. “आर्ट ऑफ कॉन्ज्यूरिंग अल्टरनेट रियलिटीज” हे पुस्तक प्रसिद्ध

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_13.1

  • शिवम शंकर सिंह आणि आनंद व्यंकटारायणन यांनी लिहिलेल्या ‘द आर्ट ऑफ कॉन्ज्युरिंग अल्टरनेट रियलिटीज: हाऊ इन्फॉरमेशन वॉरफेअर शेप्स युअर वर्ल्ड’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
  • हार्परकॉलिन्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

 

 12. अशोक चक्रवर्ती यांनी लिहिलेले “स्ट्रगल विदिन: मेमॉईर ऑफ इमर्जन्सी” पुस्तक प्रकाशित

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_14.1

  • अशोक चक्रवर्ती लिखित “स्ट्रगल विदिन: मेमॉईर ऑफ इमर्जन्सी” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
  • ते एक अर्थतज्ञ असून गेल्या चाळीस वर्षांपासून मुख्यतः आफ्रिकन प्रदेशातील देशांना धोरण सल्ला देत आहेत.
  • सध्या ते हरारे येथील झिम्बाब्वे सरकारचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार आहेत.

 

पुरस्कार आणि सन्मान 

 13. पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर

Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021_15.1

  • बहरीन केरलिय समाजम (बीकेएस) च्या वतीने देण्यात येणारा 2021चा साहित्यिक पुरस्कार पत्रकार आणि नाटककार ओमचेरी एन एन पिल्लई यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • बीकेएसचे अध्यक्ष पी. व्ही. राधाकृष्ण पिल्लई, सरचिटणीस वर्गीझ कराकल आणि साहित्यिक शाखा सचिव फिरोज तिरुवत्र यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
  • निवडसमितीचे प्रमुख कादंबरीकार एम मुकुंदन होते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

Sharing is caring!