दैनिक चालू घडामोडी: 10 जुलै 2021
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 10 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.
राज्य बातम्या
1. कर्नाटक राज्य बेंगळुरूमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करणार
- कर्नाटक राज्य सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी बेंगळुरू शहर, बेंगळुरू ग्रामीण, रामानगर, चिकबल्लापुरा आणि तुमकरू जिल्ह्यांमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सांगितले की ही अभिज्ञीत पर्यटन स्थळे तीन परिपथात असून त्यांच्या विकासाकारिता अंदाजे 233 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
- लोकांना बेंगळुरुचे संस्थापक केम्पेगौडा किंवा नाडा प्रभू केम्पेगौडा यांचे योगदान माहित करून देण्यासाठी या वारसा स्थळांचा विकास केला जाणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- कर्नाटक राजधानी: बेंगळुरू
- कर्नाटकचे मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा
2. प्रथम प्रवासी रेल्वे राज्यात पोहोचल्याने मणिपूर राज्य रेल्वेच्या नकाशात दाखल
- आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकातून चाचणी परीक्षण करण्यासाठी निघालेली राजधानी एक्स्प्रेस 11 किलोमीटर अंतर पार करत मणिपूरमधील वैंगैचुन्पाव रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. यामुळे ईशान्य भारतातील हे राज्य आता रेल्वेच्या नकाशावर झळकले आहे.
- विशेष म्हणजे, वैंगैचुन्पाव–इंफाळ (मणिपूरची राजधानी) रेल्वेमार्गाचे कामही सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर हा इम्फाळजवळील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- मणिपूरचे मुख्यमंत्री: एन. बीरेन सिंग
- राज्यपाल: नजमा हेपतुल्ला
अर्थव्यवस्था बातम्या
3. अपालना बद्दल आरबीआयने 14 बँकांना आर्थिक दंड ठोठावला
- आरबीआयने एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक, बंधन बँक आणि इतर 10 बँकांना एनबीएफसीला कर्ज देण्यासह इतर विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक दंड ठोठावला आहे.
- या दंडाची एकूण रक्कम 14.5 करोड रुपये असून बँक ऑफ बडोदा ला सर्वाधिक 2 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
- इतर 12 बँकांवर प्रत्येकी 1 कोटी आणि भारतीय स्टेट बँकेवर 50 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
- मुख्यालय: मुंबई
- स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता
संरक्षण बातम्या
4. भारत डायनॅमिक्स लिमिटेडने भारतीय वायुसेनेसह 499 कोटी रुपयांचा करार केला
- भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) ने भारतीय हवाई दलाला (आयएएफ) आकाश क्षेपणास्त्रांचे उत्पादन व पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाशी करार केला आहे.
- या कराराची एकूण किंमत सुमारे 499 कोटी रुपये आहे.
-
आकाश क्षेपणास्त्रा विषयी:
- आकाश ही मध्यम-श्रेणीची फिरती जमिनीवरून हवेत मारा करणारी (एसएएम) प्रणाली आहे जी भारताच्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (आयजीएमडीपी)अंतर्गत विकसित केली जात आहेत.
- आयजीएमडीपी अंतर्गत प्रकल्पांसाठी बीडीएल ही प्रमुख उत्पादन संस्था आहे
- आकाश क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केले आहे आणि भारतीय सेना आणि भारतीय हवाई दलासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) निर्मित आहे.
- बीडीएल सीएमडी: कमोडोर सिद्धार्थ मिश्रा (निवृत्त)
करार बातम्या
5. अॅक्सिस बँकेने संरक्षण सेवेच्या पगाराच्या पॅकेजसाठी भारतीय सैन्याबरोबर सामंजस्य करार केला
- देशातील तिसर्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक, अॅक्सिस बँकेने भारतीय सैन्याबरोबर “पॉवर सॅल्यूट” उपक्रमांतर्गत संरक्षण सेवा पगाराच्या पॅकेजचा प्रस्ताव देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
- संरक्षण सेवा पगाराच्या पॅकेजद्वारे सैन्याच्या सर्व अधिका-यांना वेगवेगळे फायदे देण्यात येतील. यामध्ये सेवारत आणि सेवानिवृत्त सर्व अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
- या करानुसार बँक सैन्य दलातील सर्व कर्मचार्यांना ₹ 56 लाखांपर्यंत वैयक्तिक अपघाती संरक्षणकवच देणार आहे.
- 8 लाखांपर्यंत शिक्षण अनुदान; एकूण कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व संरक्षणकवच 46 लाख आणि कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व साठी 46 लाखांपर्यंत संरक्षणकवच मिळणार आहे.
- हवाई अपघाताचे संरक्षणकवच ₹ 1 कोटी आणि कुटुंबातील सदस्यासाठी विनामूल्य अतिरिक्त डेबिट कार्ड या सुविधा असणार आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- अॅक्सिस बँक मुख्यालय: मुंबई
- अॅक्सिस बँक स्थापना: 1993
- अॅक्सिस बँकेचे एमडी आणि अॅक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी
6. अॅक्सिस बँक आणि मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स ने बँकाश्युरन्स करारवर स्वाक्षऱ्या केल्या
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स या एक स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने देशातील तिसर्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या अॅक्सिस बँके बरोबर बँकाश्युरन्स करार केला आहे.
- या करारामुळे अॅक्सिस बँकेच्या कर्मचार्यांना आणि ग्राहकांना सर्वसमावेशक आरोग्य विमा उपाय प्रदान करण्यात येतील.
- या करारानुसार बँकेच्या 4500 पेक्षा अधिक शाखांमधील ग्राहकांना मॅक्स बुपाने प्रदान केलेल्या आरोग्य विमा उत्पादनांद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ: कृष्णन रामचंद्रन
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स मुख्यालय: नवी दिल्ली
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स स्थापना: 2008
महत्वाचे दिवस
7. 10 जुलै: राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन
- मत्स्य विभाग, मत्स्यव्यवसाय , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो.
- हा दिवस, 10 जुलै 1957 रोजी भारतीय प्रमुख मासळीच्या प्रजनन तंत्रज्ञानाचा शोध लावणार्या डॉ. के. एच. अलीकुंही आणि डॉ. एच. एल. चौधरी यांच्या कामिगीरीच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो.
- 2021 या वर्षी 21 वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन पाळला जात आहे.
पुरस्कार बातम्या
8. झैला अवंत-गार्डेने 2021 ची स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली
- लुईझियानामधील न्यू ऑर्लीयन्स येथे राहणाऱ्या आफ्रिका-अमेरिकन, झैला अवंत-गार्डेने 2021 ची स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेची विजेतेपदाची रक्कम 50000 डॉलर्स आहे.
- स्पर्धेच्या 93 वर्षांच्या इतिहासात झैला हा पहिला आफ्रिकी-अमेरिकन स्पर्धक आहे.
- .1998 मध्ये जमैकाच्या जोडी-अॅनी मॅक्सवेलनंतर झैला पहिला कृष्णवर्णीय स्पर्धक आहे. स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी ही अमेरिकेत वार्षिक स्पेलिंग स्पर्धा आहे.
नेमणूक बातम्या
9. श्याम श्रीनिवासन यांची फेडरल बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुनर्नियुक्ती करण्यास आरबीआयने मान्यता दिली
- फेडरल बँकेच्या भागधारकांनी श्याम श्रीनिवासन यांना पुन्हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
- त्यांचा नवीन कार्यकाळ 23 सप्टेंबर 2021 पासून ते 22 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल. श्रीनिवासन यांनी 2010 मध्ये फेडरल बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- फेडरल बँक मुख्यालय: अलुवा, केरळ
- फेडरल बँक संस्थापक: के.पी. हॉर्मिस
- फेडरल बँक स्थापना: 23 एप्रिल 1931
क्रीडा बातम्या
10. आयसीसीने मनु सावनी यांना सीईओ पदावरून मुक्त केले
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मनु सावनी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून तात्काळ मुक्तता केली आहे. आयसीसीच्या सदस्य बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जॉफ अलार्डिस हे पुढेही कामकाज पाहतील. बाह्य एजन्सीने घेतलेल्या अंतर्गत आढावादरम्यान झालेल्या विविध आरोपानंतर सावनी यांना मार्चमध्ये निलंबित करण्यात आले होते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आयसीसी मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती
- आयसीसीची स्थापनाः 15 जून 1909
- आयसीसीचे उपाध्यक्ष: इम्रान ख्वाजा
- आयसीसीचे अध्यक्ष: ग्रेग बार्कले
पुस्तके आणि लेखक
11. करीना कपूर यांनी “द प्रेग्नन्सी बायबल” पुस्तकाचे लोकार्पण केले
- करीना कपूर खान यांनी “करिना कपूर खानस् प्रेग्नन्सी बायबल” नावाच्या त्यांच्या नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने या पुस्तकाला स्वत:चे तिसरे अपत्य असे देखील संबोधले आहे.
विविध बातम्या
12. आमिर खान यांचा ‘पीके’ चित्रपट भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराच्या संग्रही दाखल
- राजकुमार हिरानी यांच्या 2014 मधील ‘पीके’ या चित्रपटाची मूळ कॅमेरा निगेटिव्ह आपल्या संग्रहात दाखल केल्याची घोषणा भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराने (एनएफएआय) केली आहे.
- भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराची स्थापना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मिडिया घटक म्हणून 1964 साली करण्यात आली.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा