महाराष्ट्र पोलिस आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचनाद्वारे महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना जारी करतात. राज्यात जम्बो पोलिस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने नवीन GR – परिपत्रक दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाले आहे. या नवीन GR अनुसार एकूण १२,५२८ पदांच्या पोलीस भरतीस मान्यता देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार ५२९७ पदांची भरतीस १००% मान्यता देण्यात आली आहे, तसेच उर्वरित ७२३२ पदांची भरतीसाठी लवकरच नवीन परिपत्रक प्रकाशित होणार आहे. हा महत्वाचा अपडेट आपल्या सर्व मित्रांना शेयर करा.
उमेदवारांना महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुन्याची (पॅटर्नची) जाण असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीवर होईल. तरी हा लेख महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल या परीक्षेसाठी तयारी करण्यार्या सर्व उमेदवारांना चांगली तयारी करण्यास मदत करणार आहे.
महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा २०२० मध्ये दोन टप्प्यांचा म्हणजे लेखी परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST) यांचा समावेश आहे.
लेखी परीक्षेमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल –
विभाग नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 प्रश्न | 25 गुण | |
मराठी व्याकरण | 25 प्रश्न | 25 गुण | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
केवळ पात्रता निकष पूर्ण करणारे आणि परीक्षेत आवश्यक असणारी किमान गुणांची नोंद असलेल्या उमेदवारांनाच शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST). साठि बोलवण्यात येईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST)
शारीरिक चाचणी (50 गुण)
- A) पुरुष उमेदवार –
- 1600 मीटर धावणे – 30 गुण
- 100 मीटर धावणे – 10 गुण
- शॉट पुट – 10 गुण
एकूण – 50 गुण
- B) महिला उमेदवार –
- 800 मीटर धावणे – 30 गुण
- 100 मीटर धावणे – 10 गुण
- शॉट पुट – 10 गुण
एकूण – 50 गुण.