Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023, पदानुसार परीक्षेचे स्वरूप (अपडेटेड) व अभ्यासक्रम तपासा

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: सहकार आयुक्तालयाने विविध संवर्गातील एकूण 309 पदांच्या भरतीसाठी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर केली होती. आता सहकार आयुक्तालयाने अधिसूचनेत लघुलेखक (निम्नश्रेणी व उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक या पदांच्या परीक्षेचा कालावधी 75 मिनिटे दिला होता पण आता त्यात सुधारणा करण्यात आली असून आता तो कालावधी वाढवून 120 मिनिटे करण्यात आला आहे. सहकार आयुक्तालय परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती हवी. परीक्षेचे स्वरूप व परीक्षाच अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासाला योग्य दिशा देतात. या लेखात सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व सहकार आयुक्तालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

सहकार आयुक्तालय परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला सहकार आयुक्तालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. सहकार आयुक्तालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
पदांची नावे
 • सहकारी अधिकारी श्रेणी 1
 • सहकारी अधिकारी श्रेणी 2
 • लेखापरीक्षक श्रेणी 2
 • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
 • उच्च श्रेणी लघुलेखक
 • निम्न श्रेणी लघुलेखक
 • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे 309
लेखाचे नाव सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
निवड प्रक्रिया
 • ऑनलाईन परीक्षा (सर्व पदांसाठी)
 • व्यावसायिक चाचणी (फक्त लघुलेखक आणि लघुटंकलेखक पदासाठी)
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय भरती 2023 परीक्षेचे टप्पे

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सर्व पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लघुलेखक (निम्नश्रेणी व उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक पदाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. पदानुसार सहकार आयुक्तालय भरती 2023 परीक्षेचे टप्पे खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

पदाचे नाव टप्पे एकूण गुण
सहायक सहकारी अधिकारी, लेखापरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी
 • लेखी परीक्षा
200 गुण
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक
 • लेखी परीक्षा (120 गुण)
 • व्यावसायिक चाचणी (80 गुण)
200 गुण

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (सहायक सहकारी अधिकारी, लेखापरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक)

सहकार आयुक्तालय भरती 2023 मधील सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2 आणि वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी या पदांसाठी एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 50 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 02 तास असेल

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  
 • वरील सर्व पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
 • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
 • परीक्षेच्या माध्यमाबद्दल सध्या अधिसूचनेत माहिती उपलब्ध नाही. जसे परीक्षेच्या माध्यमाबद्दल माहिती उपलब्ध होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
 • परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील
 • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
 • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक)

सहकार आयुक्तालय भरती 2023 मधील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या पदांसाठी एकूण 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयात प्रत्येकी 30 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 75 120 मिनिटे असेल. या ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कौशल्य (व्यावसायिक) चाचणी घेण्यात येणार आहे. उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक पदासाठी परीक्षेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

 • ऑनलाईन परीक्षा (120 गुण)
 • व्यावसायिक चाचणी (80 गुण)
अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 75 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
एकूण 60 120  
 • लघुलेखक (निम्नश्रेणी आणि उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेत 60 प्रश्न 120 गुणांसाठी विचारल्या जातात.
 • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
 • परीक्षेच्या माध्यमाबद्दल सध्या अधिसूचनेत माहिती उपलब्ध नाही. जसे परीक्षेच्या माध्यमाबद्दल माहिती उपलब्ध होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
 • व्यावसायिक चाचणी एकूण 80 गुणांची स्वतंत्रपणे घेण्यात येईल.
 • प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10 वी) दर्जाच्या समान राहील.
 • परीक्षेचा कालावधी 75 मिनिटे आहे.
 • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.
 • ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.

सहकार आयुक्तालयाने परीक्षेचा कालावधी वाढवण्याबाबत जाहीर केलेली प्रेस नोट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

सहकार आयुक्तालय प्रेस नोट (10 ऑगस्ट 2023)

सहकार आयुक्तालय अभ्यासक्रम 2023
सहकार आयुक्तालय प्रेस नोट

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. विषयानुसार सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 खाली देण्यात आला आहे.

अ क्र विषय तपशील
1 English Language Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, वाक्यातील त्रुटी शोधणे
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी,आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, आकृत्यांची संख्या मोजणे, नातेसंबंध, निष्कर्ष किंचा अनुमान काढणे
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

इतर सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
कृषी विभाग अभ्यासक्रम 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023  ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
SSC CGL अभ्यासक्रम 2023 तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
PCMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 मी कोठे पाहू शकतो?

या लेखात विस्तृतपणे सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 दिला आहे.

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचे स्वरूप 2023 मी कोठे पाहू शकतो?

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 किती गुणांची होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 200 गुणांची होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचे टप्पे काय आहेत?

सहायक सहकारी अधिकारी, लेखापरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी पदांची 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या पदांची 120 गुणांची लेखी परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी अश्या एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.