Table of Contents
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023
महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद भरती 2023 एकूण 19460 पदांसाठी राबविल्या जाणार आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय गट क संवर्गातील पद म्हणजे ग्रामसेवक होय. नुकताच ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे. खूप विद्यार्थी या ग्रामसेवक भरती 2023 ची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच जिल्हा परिषद विभागाने जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. ग्रामसेवक हे ग्राम पातळीवरील तलाठी एवढेच महत्वाचे पद आहे. ज्या उमेदवारांना ग्रामसेवक होण्याची इच्छा आहे त्यांनी ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 माहिती हवा तरच परीक्षेत चागले यश प्राप्त करता येईल. आज या लेखात ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 विस्तृत स्वरुपात दिला आहे.
अवश्य पहा: जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
ग्रामसेवक परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षेचा अभ्यासक्रम |
विभाग | ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | ग्रामसेवक भरती 2023 |
पदाचे नाव |
ग्रामसेवक |
लेखाचे नाव | ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो | परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.rdd.maharashtra.gov.in |
ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप 2023
ग्रामसेवक भरतीच्या परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर आपल्याला ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप 2023 माहिती असणे आवश्यक आहे. तरच कोणत्या विषयाला किती गुण आहेत, कोणत्या विषयावर भर द्यायचा याबाबत माहिती मिळते. ग्रामसेवक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असते. प्रत्येक प्रश्न 02 गुणांचा याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारल्या जातात. तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी (बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न) या विषयात प्रत्येकी 15 प्रश्न विचारल्या जाणार आहेत तर तांत्रिक (कृषी) विषयावर एकूण 40 प्रश्न विचारल्या जाणार आहे. ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप 2023 खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 15 | 30 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 15 | 30 | |
3 | सामान्य ज्ञान | 15 | 30 | |
4 | बौद्धिक चाचणी | 15 | 30 | |
5 | तांत्रिक विषय | 40 | 80 | |
एकूण | 100 | 200 |
ठळक मुद्दे
- ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
- तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
ग्रामसेवक भरती सिल्याबस 2023
ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत एकूण 05 विषय आहेत. ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक (कृषी) विषय आहे. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 सविस्तरपणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे. ज्यात विषयानुसार महत्वाचे टॉपिक देण्यात आले आहे.
विषय | अभ्यासक्रम तपशील |
मराठी भाषा |
|
इंग्रजी भाषा |
|
सामान्य ज्ञान |
|
बौद्धिक चाचणी |
|
तांत्रिक विषय (कृषी) |
अ. समाजशास्त्र विषयक ज्ञान
ब. पंचायतराज व्यवस्था
क. कृषी विषयक ज्ञान
ड. इतर
|
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 PDF
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
इतर सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम | |
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023 | |
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 | महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |
SSC CGL अभ्यासक्रम 2023 | तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |
PCMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 | महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
