Table of Contents
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: महाराष्ट्र राज्य वन विभागाने TCS मार्फत वनरक्षक पदाची परीक्षा दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे. सध्या शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 ची परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. 02 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या सर्व शिफ्टचे विश्लेषण या लेखात केल्या जाणार आहे. जसे शिफ्ट 3 चा पेपर होईल तसे आम्ही या शिफ्टचे वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात उपलब्ध करून देऊ. शिफ्टनुसार विश्लेषण पाहण्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा. वनरक्षक परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात आपण वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती देण्यात आली आहे. वनरक्षक पदाच्या वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वन विभाग भरती 2023 |
लेखाचे नाव | वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 |
पदाचे नाव |
वनरक्षक |
वनरक्षक परीक्षेची तारीख 2023 | 02 ते 11 ऑगस्ट 2023 |
नकारात्मक गुणांकन पद्धती | लागू नाही |
परीक्षेचा कालावधी | 02 तास |
एकूण गुण | 120 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
वनरक्षक परीक्षेचे स्वरूप 2023 (वनरक्षक)
वनरक्षक भरती परीक्षा 2023 अंतर्गत वनरक्षक पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 60 प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वेक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 15 | 30 | 02 तास (120 मिनिटे) |
2 | इंग्रजी भाषा | 15 | 30 | |
3 | सामान्य ज्ञान | 15 | 30 | |
4 | बौद्धिक चाचणी | 15 | 30 | |
एकूण | 60 | 120 |
वनरक्षक परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ
वनरक्षक पदाची परीक्षा 2023 ही 02 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेतल्या जाणार आहे. वनरक्षक पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.
शिफ्ट | परीक्षेची वेळ |
शिफ्ट 1 | सकाळी 08.30 ते 10.30 |
शिफ्ट 2 | दुपारी 12.30 ते 02.30 |
शिफ्ट 3 | संध्याकाळी 04.30 ते 06.30 |
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)
वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 13-14 | सोपी ते मध्यम |
2 | इंग्रजी भाषा | 12-13 | सोपी ते मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 12-13 | सोपी ते मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 13-14 | सोपी ते मध्यम |
एकूण | 50-54 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)
वनरक्षक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची विषयानुसार वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
वनरक्षक पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. टॉपिक नुसार प्रश्नाची संख्या खाली देण्यात आली आहे.
टॉपिक | प्रश्न संख्या |
शब्दांच्या जाती | 04 |
समानार्थी शब्द | 02 |
विरुद्धार्थी शब्द | 01 |
प्रयोग | 01 |
म्हणी व वाक्प्रचार | 03 |
पुस्तके व लेखक | 01 |
शुध्द अशुद्ध शब्द | 01 |
वाक्याचे प्रकार | 02 |
एकूण | 15 |
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
वनरक्षक परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Parts of Speech, Parajumble, Sentence rearrangement, Error detection आणि Fill in the Blank यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
Topics | No. of Questions |
Error Detection | 02 |
Fill in the Blank | 03 |
Article | 02 |
Sentence Rearrangement | 02 |
One Word Substitution | 01 |
Synonyms | 02 |
Antonyms | 01 |
Ideom and Pharases | 02 |
Total | 15 |
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
विषय | प्रश्न संख्या |
इतिहास | 02 |
भूगोल | 04 |
राज्यघटना | 02 |
चालू घडामोडी | 03 |
स्टॅटिक जी.के | 04 |
एकूण | 15 |
वनरक्षक शिफ्ट 2 मधील सामान्य ज्ञान विषयात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना कधी करण्यात आली?
- 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी मांडला?
- प्राचीन इतिहासावर एक प्रश्न होता.
- कलम 17 आणि 213 यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
- इंडियन फोरेस्ट रिपोर्ट 2019 वर 02 प्रश्न विचारण्यात आले होते.
- वन प्रमाणावर एक प्रश्न विचरण्यात आला होते.
- पहिली कागद गिरणी वर कोठे उघडल्या गेली?
- पानझड क्षेत्रावर एक प्रश्न विचरण्यात आला होता.
- राखीगडी कोठे आहे?
- गळतीचा मान्सून त्यांच्या मुख्य ठिकाणापासून कोणत्या दिशेने वाहतो?
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
वनरक्षक भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, अक्षरमाला, नातेसंबंध, आकृत्या पूर्ण करणे आणि जोड्या जुळवणे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय | प्रश्न संख्या |
पदावली (BODMAS) | 02 |
कोडी | 04 |
सांकेतिक भाषा | 01 |
अक्षरमाला | 02 |
संख्यामाला | 01 |
दिशा | 02 |
तर्क व अनुमान (Syllogysm) | 01 |
बैठक व्यवस्था | 01 |
पेपर फोल्डिंग | 01 |
एकूण | 15 |
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)
वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 13-14 | सोपी ते मध्यम |
2 | इंग्रजी भाषा | 12-13 | सोपी ते मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 12-13 | सोपी ते मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 12-13 | सोपी ते मध्यम |
एकूण | 49-53 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)
वनरक्षक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची विषयानुसार वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
वनरक्षक पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
शब्दांच्या जाती | 03 |
समानार्थी शब्द | 02 |
विरुद्धार्थी शब्द | 02 |
प्रयोग | 01 |
म्हणी व वाक्प्रचार | 03 |
पुस्तके व लेखक | 01 |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द | 01 |
अलंकार | 02 |
एकूण | 15 |
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
वनरक्षक परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Parts of Speech, Parajumble, Sentence rearrangement, Error detection आणि One Word Substitution यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
Topics | No. of Questions |
Fixed Preposition | 01 |
Fill in the Blank | 03 |
Article | 02 |
Sentence Rearrangement | 02 |
One Word Substitution | 02 |
Synonyms | 02 |
Antonyms | 01 |
Ideom and Pharases | 02 |
Total | 15 |
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
विषय | प्रश्न संख्या |
इतिहास | 02 |
भूगोल | 04 |
राज्यघटना | 02 |
विज्ञान | 01 |
चालू घडामोडी | 03 |
स्टॅटिक जी.के | 03 |
एकूण | 15 |
वनरक्षक शिफ्ट 1 मधील सामान्य ज्ञान विषयात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- डिस्र्पेस क्लास असोसिऐशन वर एक प्रश्न होता.
- महाराष्ट्राच्या उत्तर सिमा कोणता पर्वत निर्धारित करतो?
- 2023 मध्ये भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
- महौली 1500 वर्षापूर्वीची वास्तु कोठे आहे?
- ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
- नैरुत्या मोसमी वाऱ्याला कोण रोखत?
- लढाख येथील पुगा व्हॅली कोणत्या उर्जेसंबंधी आहे?
- वारली विद्रोह प्रमुख महिला कोण होत्या?
- PMGY योजनेचे वर्ष विचारण्यात आले.
- मध्य हिमालय मोठी रांग कोणती आहे?
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
वनरक्षक भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, अक्षरमाला, नातेसंबंध, आकृत्या पूर्ण करणे आणि जोड्या जुळवणे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय | प्रश्न संख्या |
कोडी | 01 |
सांकेतिक भाषा | 02 |
अक्षरमाला | 05 |
संख्यामाला | 02 |
दिशा | 01 |
नातेसंबंध | 02 |
आकृत्यावरील प्रश्न | 01 |
दिनदर्शिका | 01 |
एकूण | 15 |
वनरक्षक शिफ्ट 1 मध्ये बौद्धिक चाचणी या विषयावर विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- आज मंगळवार आहे तर आजपासून तीन दीपसांपूर्वी कोणता वर असेल.
- ABHRAHAM यांमध्ये इंग्रजी वर्णमाळेनुसार किती जोड्या येतात.
- जर x ची आई ही y च्या वडिलांची बहीण असेल तर y चे वडील x चे कोण आहे.
- x चे वडील हे y च्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलगा असेल तर x हा Y चा कोण आहे?
- A2, B8, C32, ?, E512
- EGF, ECD, CAB, DBC यातील भिन्न पर्याय निवडा.
- एक व्यक्ती पहिले दक्षिणेकडे 7 किमी जातो, त्यानंतर डावीकडे वळण घेऊन 3 किमी जातो, पुन्हा डावीकडे वळून 2 किमी जातो, नंतर उजवे वळण घेऊन 2 किमी जातो आणि पुन्हा उजवीकडे 9 किमी जातो. तर त्याच्या प्रारंभ बिंदू ते अंतिम बिंदू दरम्यानचे अंतर शोधा.
- 8.-2,-1,0,?,26
- पहिली 4 आणी शेवटची 4 alphabet उलट क्रमाने लिहिले तर उजवीकडून सहावे alphabet कोणते.
- A2D:Z4W:: B3E:?
- ACEG, BDFH, ?, DFHJ

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
