Table of Contents
वित्त विभाग भरती 2023:
वित्त विभाग भरती 2023: महाराष्ट्र शासन वित्त विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी लवकरच वित्त विभाग भरती 2023 जाहीर करण्यात येणार आहे. वित्त विभाग भरती 2023 संदर्भातील अधिकृत अधिसुचना दिनांक 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत येणे अपेक्षित आहे. वित्त विभागाने कनिष्ठ लेखापाल पदभरती संदर्भात एक प्रसिद्धीपत्र दिनांक 31जुलै 2023 रोजी जाहीर केले असून त्यात कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेचा कृती आराखडा सविस्तरपणे दिला आहे. या लेखात आपण वित्त विभाग भरती 2023 संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत.
वित्त विभाग भरती 2023: विहंगावलोकन
वित्त विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लेखपाल या पदासाठी भरती लवकरच जाहीर होणार असून त्याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या तक्त्यात दिली आहे.
वित्त विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | वित्त विभाग, महाराष्ट्र शासन |
भरतीचे नाव | वित्त विभाग भरती 2023 |
पदाचे नाव |
कनिष्ठ लेखापाल |
एकूण रिक्त पदे | अद्याप जाहीर नाही |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://finance.maharashtra.gov.in/ |
वित्त विभाग भरती 2023 अधिसुचना
वित्त विभाग भरती 2023: लेखा व कोषागारे संचनालय, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदे सरळसेवा पद्धतीने TCS कंपनीमार्फत भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत येणे अपेक्षित आहे.
वित्त विभाग भरती 2023 कृती आराखडा
वित्त विभाग भरती 2023 कृती आराखडा: कनिष्ठ लेखापाल या संवर्गातील पदांसाठी वित्त विभागातर्फे कृती आराखडा जाहीर झाला असून आपण खाली दिलेल्या तक्त्यात कृती आराखडा तपासू शकता.
वित्त विभाग भरती 2023: कृती आराखडा | ||
अ.क्र. | कार्यक्रम | तारीख |
1 | टि.सी.एस.आय.ओ.एन. कंपनीच्या प्रतिनिधी यांचेशी झालेल्या चर्चेनुसार प्रथमतः सदर कंपनी निवडीबाबत कंपनीला कार्यादेश देणे. | दि.01.08.2023 पर्यंत |
2 | ऑनलाईन पध्दतीने पदभरती प्रकियेकरीता कंपनीकडून सामंजस्य कराराचा मसुदा तयार करून अंतिम करणे. | दि. 17.08.2023 पर्यंत |
3 | टि.सी.एस.आय.ओ.एन. कंपनीकडून सामंजस्य कराराच्या मसुद्यास मंजूरी प्राप्त झाल्यानंतर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे. | |
4 | टि.सी.एस.आय.ओ.एन. कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा पोर्टल तयार करणे. | दि. 15.09.2023 पर्यंत (सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर १ महिन्याने) |
5 | कनिष्ठ लेखापाल पदासाठी निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार टि.सी.एस.आय.ओ.एन. कंपनीकडून ऑनलाईन परीक्षेकरीता प्रश्नावली संच तयार करणे. | दि. 16.10.2023 पर्यंत |
6 | टि.सी.एस.आय.ओ.एन. कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा पोर्टलबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर कपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन जाहिरात प्रसिध्द करणे. | दि. 19.10.2023 पर्यंत |
7 | अर्ज मागविण्याची अंतिम मुदत | दि. 20.11.2023 पर्यंत (जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवस कालावधी) |
8 | टि.सी. एस. आय.ओ.एन. कंपनीच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेणे | दि.20.12.2023 रोजी (अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर 1 महिन्यानंतर) |
9 | ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत परीक्षार्थीकडून हरकत नोंदविणे, योग्य हरकतीबाबत कंपनीकडून कार्यवाही करणे इ. | दि. 19.01.2024 पर्यंत (परीक्षेच्या दिनांकानंतर १ महिन्यापर्यंत) |
10 | कंपनीकडून निकाल प्रसिध्द करणे. | दि.20.02.2024 पर्यंत (परीक्षा झाल्यानंतर योग्य हरकतीबाबत कंपनीकडून कार्यवाही झाल्यानंतर) |
11 | निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांसंबंधी नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी यांचेमार्फत पूर्ण केल्यानंतर नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात येईल. |
वित्त विभाग भरती 2023 कृती आराखडा डाउनलोड करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्राचा महापॅक