Marathi govt jobs   »   Job Notification   »   NIV पुणे भरती 2023

NIV पुणे भरती 2023, स्टाफ नर्स आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदासाठी अधिसूचना जाहीर

NIV पुणे भरती 2023

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV) पुणे येथील स्टाफ नर्स आणि प्रकल्प तंत्रज्ञ-II या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता NIV पुणे भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहायचे आहे. आज आपण या लेखात NIV पुणे भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाचा नमुना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NIV पुणे भरती 2023: विहंगावलोकन

ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) प्रमुख संस्थांपैकी एक आहे. ICMR आणि रॉकफेलर फाऊंडेशन (RF), USA यांच्या संयुक्त विद्यमाने 1952 मध्ये व्हायरस रिसर्च सेंटर (VRC) म्हणून पुणे, महाराष्ट्र राज्यात त्याची स्थापना करण्यात आली. NIV पुणे भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

NIV पुणे भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
इन्स्टिट्यूटचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)
भरतीचे नाव NIV पुणे भरती 2023
पदांचे नाव
  • स्टाफ नर्स
  • प्रकल्प तंत्रज्ञ-II
एकूण रिक्त पदे 02
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत किंवा लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण पुणे
NIV पुणे अधिकृत संकेतस्थळ www.niv.icmr.org.in

NIV पुणे भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

NIV पुणे भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची दिनांक 12 मे 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार असून NIV पुणे भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

NIV पुणे भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
NIV पुणे भरती 2023 ची अधिसूचना 02 मे 2023
NIV पुणे भरती 2023 अंतर्गत मुलाखतीची तारीख 12 मे 2023

 

NMU जळगाव भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

NIV पुणे भरती 2023 ची अधिसूचना

NIV पुणे भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स आणि प्रकल्प तंत्रज्ञ-II या पदांची भरती होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 रोजी मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहे. NIV पुणे भरती 2023 ची अधिसूचना PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NIV पुणे भरती 2023 अधिसूचना PDF

NMU जळगाव भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे भरती 2023 मध्ये स्टाफ नर्स आणि प्रकल्प तंत्रज्ञ-II या दोन्ही संवर्गातील प्रत्येकी एका पदाची भरती केल्या जाणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
स्टाफ नर्स 01
प्रकल्प तंत्रज्ञ-II 01
एकूण 02

NIV पुणे भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

NIV पुणे भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पदाप्रमाणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  वयोमर्यादा
स्टाफ नर्स
  • नर्सिंग किंवा मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा
  • कोणत्याही राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत नर्स किंवा ANM
18 ते 30 वर्षे
प्रकल्प तंत्रज्ञ-II
  • सरकारी संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांच्या अनुभवासह एसएससी किंवा समतुल्य किंवा संबंधित क्षेत्रातील एक वर्षाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र किंवा आयटीआय किंवा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेचे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र आणि सरकारकडून संबंधित व्यापारात एटीएस यशस्वीरित्या पूर्ण
  • इंटरमिजिएट (विज्ञान विषयांसह HSC (जीवशास्त्रासह) आणि जीवशास्त्रातील B.Sc. अनुक्रमे 2 आणि 3 वर्षांच्या अनुभवाच्या समतुल्य मानण्यात येईल.
18 ते 28 वर्षे

NIV पुणे भरती 2023 अर्ज प्रक्रिया

NIV पुणे भरती 2023 साठी उमेदवारांना 12 मे 2023 रोजी दस्तऐवजांच्या मूळ स्वाक्षांकित प्रती व विहित नमुन्यातील अर्जाची प्रत सोबत घेवून मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. NIV पुणे भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना आणि मुलाखतीचा पत्ता खाली प्रदान करण्यात आला आहे.

NIV पुणे भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

मुलाखतीचा पत्ता: ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, 20-A, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-411001.

NIV पुणे भरती 2023 ची निवड प्रक्रिया

NIV पुणे भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही 12 मे 2023 रोजी होणाऱ्या मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे. जर उमेदवारांची संख्या जास्त झाली तर लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

NMU जळगाव भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
महावितरण सोलापूर भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
GMBVM भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 TMC भरती 2023
NARI पुणे भरती 2023 PDKV भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
ESIS मुंबई भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
SSC CGL अधिसूचना 2023 HBCSE भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

NIV पुणे भरती 2023 कधी जाहीर झाली?

NIV पुणे भरती 2023 दिनांक 02 मे 2023 रोजी जाहीर झाली.

NIV पुणे भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

NIV पुणे भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स आणि प्रकल्प तंत्रज्ञ-II या दोन पदांची भरती होणार आहे.

NIV पुणे भरती 2023 साठी उमेदवारांची मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

NIV पुणे भरती 2023 साठी उमेदवारांची मुलाखत दिनांक 12 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे.