Marathi govt jobs   »   Job Notification   »   महाराष्ट्र DES भरती 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 जाहीर, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील तपासा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

DES भरती 2023: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 जुलै 2023 रोजी सक्रीय करण्यात आली आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे त्यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली विविध पदे भरण्याकरीता महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना जाहीर केली आहे. DES भरती 2023 ही सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांसाठी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 मध्ये एकूण 260 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन

अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), मुंबई मध्ये विविध पदांच्या भरती करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत
भरतीचे नाव महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023
पदाचे नाव

सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क

एकूण रिक्त पदे 260
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ https://mahades.maharashtra.gov.in/

DES मुंबई भरती 2023: महत्वाच्या तारखा

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 महत्वाच्या तारखा: महाराष्ट्र DES भरती 2023 अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 – महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र DES भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
महाराष्ट्र DES भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जुलै 2023
महाराष्ट्र DES भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र DES भरती 2023 प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी 7 ते 10 दिवस
महाराष्ट्र DES भरती 2023 ऑनलाईन परीक्षेची तारीख सप्टेंबर 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना PDF

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना ही सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क या पदांसाठी जाहीर झाली असून या भारती अंतर्गत निवड ही ऑनलाईन परीक्षेमार्फत होणार आहे. पात्र उमदेवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना पाहू शकतात.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना

अमरावती महानगरपालिका भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 रिक्त पदाचा तपशील

DES भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 मध्ये एकूण 260 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

DES भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब 39
2. सांख्यिकी सहाय्यक गट क 94
3. अन्वेषक गट क 127
  एकूण रिक्त जागा 260
Adda247 App
Adda247 Marathi Application

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 पात्रता निकष

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब

अ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा

ब] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I. S. I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.

18 ते 38 वर्षे (सामान्य वर्ग)

सांख्यिकी सहाय्यक गट क अ] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा

ब] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी.

18 ते 38 वर्षे (सामान्य वर्ग)
अन्वेषक गट क माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 18 ते 38 वर्षे (सामान्य वर्ग)

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 निवड प्रक्रिया

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे. ऑनलाईन परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे. ज्याचा तपशील खाली देण्यात आले आहे

  • सहायक संशोधन अधिकारी, गट- ब (अराजपत्रित), सांख्यिकी सहायक व अन्वेषक, गट – क या पदांसाठी फक्त ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
  • वरील पदांसाठी गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • उमेदवारास समान गुण असल्यास परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४ /का.१३-अ, दिनांक ०४/०५/२०२२, तसेच याबाबतीत शासनाकडील इतर निकषांनुसार लावला जाईल.
  • सदर जाहिरातीतील उल्लेख केलेली वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पात्रता दर्शवितात.
  • प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्या अधिन राहून उमेदवारांची निवड करण्यात येईल.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

आवश्यक पात्रता असलेले सर्व उमेदवार 15 जुलै 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अर्ज लिंक (सक्रीय)

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम DES च्या अधिकृत संकेतस्थळ @mahades.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर पदभरती 2023 वर क्लिक करा
  • ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करा.
  • आता New Registration वर क्लिक करा.
  • तेथे आपली संपूर्ण माहिती भरा.
  • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 च्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 ही एकूण 200 गुणांची आहे. पदानुसार परीक्षेचे स्वरूप व महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023

 

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Read in English: Maha DES Recruitment 2023

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023
प्रसार भारती भरती 2023
WRD Recruitment 2023 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
MUCBF भरती 2023 NHM नागपूर भरती 2023
KVS पुणे भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023
नांदणी सहकारी बँक भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 मुंबई उपनगर कोतवाल भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 दिनांक 13 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया कधी पासून सुरु होईल?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया 13 जुलै 2023 पासून सुरु होईल