Table of Contents
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण 19460 पदांची भरती होणार आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये जिल्हा परिषद परीक्षा 2023 घेण्यात येणार आहे. आपण जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन तयार करायला हवा. या शेवटच्या काही दिवसात आपण आत्तापर्यंत जे वाचले त्या सर्व टॉपिकची रिव्हिजन करणे आवश्यक आहे. याच तुम्हाच्या रिव्हिजनला मदत व्हावी या दृष्टीने आज या लेखात जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन देण्यात आला आहे. या शेवटच्या सात दिवसात आम्ही आपणासाठी जिल्हा परिषद भरती 2023 च्या दृष्टीने जे टॉपिक महत्वाचे आहेत त्यांच्याबद्दल माहिती दररोज प्रसिद्ध करणार आहोत. सोबतच त्या सर्व टॉपिकच्या लिंक्स या लेखात देण्यात येतील.
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षा विश्लेषण 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: विहंगावलोकन
या लेखात जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन देण्यात आला आहे. ज्याचा फायदा आपणास आगामी काळातील परीक्षेत नक्की होईल. जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅनचे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभागाचे नाव | ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | जिल्हा परिषद भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 19460 |
लेखाचे नाव | जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
अधिकृत संकेतस्थळ | www.rdd.maharashtra.gov.in |
जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी शेवटच्या दिवसात काय वाचावे?
जिल्हा परिषद परीक्षेसाठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. यात आत्तापर्यंत आपण जे वाचले त्याचे रिव्हिजन करणे फार आवश्यक आहे. रिव्हिजन करण्यासाठी खालील सर्व मुद्यांचा विचार केला पाहिजे. सोबतच अड्डा247 मराठीने आपणासाठी जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन तयार केला आहे. ज्याचा आधार घेऊन आपण आपल्या अभ्यासाला गती देऊ शकता. 26 सप्टेंबर 2023 पासून रोज आपणासाठी महत्वाचे लेख प्रसिद्ध होणार आहे. त्याला एकदा वाचून घेणे आवश्यक आहे.
- जिल्हा परिषद परीक्षेचा अद्ययावत परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाबद्दल माहिती मिळवली असेलच त्याचे पुन्हा एकदा विहंगावलोकन करा. त्यातील महत्वाचे सर्व टॉपिक कोणते आहे ज्यांच्यावर रिव्हिजन करायची आहे त्याला एकदा वाचणे आवश्यक आहे.
- तांत्रिक विषय ज्या पदांना लागू आहे त्यांनी त्या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास करा. त्यातील महत्वाचे टॉपिक वाचा कारण परीक्षेच्या एकूण 40 टक्के वेटेज फक्त तांत्रिक विषयाला आहे.
- जिल्हा परिषद मॉक टेस्ट सोडवणे खूप महत्वाचे आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती मिळते. जिल्हा परिषद ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवणे फार आवश्यक आहे. तरच आपला वेळेवर गोंधळ होणार नाही. यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी जिल्हा परिषद टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ज्याचा फायदा आपणास नक्कीच होईल.
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लीक करा
- जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला नियमित वेळेत संबंधित विषय वाचणे गरजेचे आहे. तरच आपण अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन
जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खाली लेखात विषयानुसार आम्ही जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन उपलब्ध करू देत आहोत. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा ज्यामुळे आपणास दैनंदिन महत्वाचे टॉपिकनुसार काय वाचावे याबद्दल माहिती मिळणार आहे.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: मराठी विषय
मराठी विषयात प्रामुख्याने मराठी व्याकरण, शब्दसंग्रह व उताऱ्यांवर प्रश्न विचारल्या जाणार आहेत. मराठी विषयाचा जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: मराठी विषय | |||
तारीख | टॉपिक | ||
26 सप्टेंबर 2023 | नाम | सर्वनाम | |
27 सप्टेंबर 2023 | विशेषण | क्रियापद | काळ |
28 सप्टेंबर 2023 | क्रियापदाचे अर्थ | शब्दयोगी अव्यय | क्रियाविशेषण अव्यय |
29 सप्टेंबर 2023 | उभयान्वयी अव्यय | केवलप्रयोगी अव्यय | |
30 सप्टेंबर 2023 | समास | प्रयोग | |
03 ऑक्टोबर 2023 | शब्दसिद्धी | ||
04 ऑक्टोबर 2023 | वाक्याचे प्रकार | ||
5 ऑक्टोबर 2023 | मराठी शब्दसंपदा | ||
6 ऑक्टोबर 2023 | शब्दसमूहाबद्दल एक शब्द | ||
7 ऑक्टोबर 2023 | विरामचिन्हे |
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: इंग्लिश विषय
इंग्लिश विषयात प्रामुख्याने इंग्लिश ग्रामर, शब्दसंग्रह (Vocabulary) व उताऱ्यांवर प्रश्न विचारल्या जाणार आहेत. इंग्लिश विषयाचा जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे. जिल्हा परिषद भरती 2023 च्या दृष्टीने Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) असे तीन भागात लेख तयार करणार आहे. इंग्लिश विषयाचा जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: इंग्लिश विषय | |||
तारीख | टॉपिक | ||
27 सप्टेंबर 2023 | इंग्लिश ग्रामर भाग 1 (Part of Speech) | ||
29 सप्टेंबर 2023 | इंग्लिश ग्रामर भाग 2 (Tenses and Voice) | ||
30 सप्टेंबर 2023 | इंग्लिश ग्रामर भाग 3 (Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence and Vocabulary) |
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय
या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते. सामान्य ज्ञान व तांत्रिक विषयाचा जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.
- भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
- इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
- राज्यघटना – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
- चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: चालू घडामोडी
जिल्हा परिषद भरती परीक्षा IBPS कंपनीमार्फत होणार असल्याने आपणास माहिती आहे की, IBPS चा चालू घडामोडी या विषयावर विशेष भर असते मागील सहा ते सात महिन्यातील घडामोडींवर विशेषतः प्रश्न विचारल्या जातात. खालील तक्त्यात मार्च 2023 पासून ते सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व चालू घडामोडी च्या PDF देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: चालू घडामोडी | ||
तारीख | मासिक चालू घडामोडी PDF | वन लायनर चालू घडामोडी PDF |
26 सप्टेंबर 2023 | मासिक चालू घडामोडी – मार्च 2023 | वन लायनर चालू घडामोडी – मार्च 2023 |
27 सप्टेंबर 2023 | मासिक चालू घडामोडी – एप्रिल 2023 | वन लायनर चालू घडामोडी – एप्रिल 2023 |
28 सप्टेंबर 2023 | मासिक चालू घडामोडी – मे 2023 | वन लायनर चालू घडामोडी – मे 2023 |
29 सप्टेंबर 2023 | मासिक चालू घडामोडी – जून 2023 | |
30 सप्टेंबर 2023 | वन लायनर चालू घडामोडी – जून 2023 | |
1 ऑक्टोबर 2023 | मासिक चालू घडामोडी – जुलै 2023 | |
3 ऑक्टोबर 2023 | वन लायनर चालू घडामोडी – जुलै 2023 | |
4 ऑक्टोबर 2023 | मासिक चालू घडामोडी – ऑगस्ट 2023 | |
5 ऑक्टोबर 2023 | वन लायनर चालू घडामोडी – ऑगस्ट 2023 | |
6 ऑक्टोबर 2023 | मासिक चालू घडामोडी – सप्टेबर 2023 | |
7 ऑक्टोबर 2023 | वन लायनर चालू घडामोडी – सप्टेबर 2023 | |
9 ऑक्टोबर 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी 08 ते 15 ऑक्टोबर 2023 |
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: बौद्धिक चाचणी
बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. अंकगणित या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित शी संबंधित महत्वाच्या लेखाच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. बौद्धिक चाचणी विषयाचा जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन: बौद्धिक चाचणी | |||
तारीख | बुद्धिमत्ता चाचणी | अंकगणित | |
26 सप्टेंबर 2023 | अंकमालिका | अक्षरमालिका | संख्या व संख्यांचे प्रकार |
27 सप्टेंबर 2023 | वेन आकृती | सांकेतिक भाषा | वयवारी |
28 सप्टेंबर 2023 | दिशा व अंतर | रक्त संबंध (Blood Relation) | वेळ आणि काम |
29 सप्टेंबर 2023 | क्रम व स्थान (Order and Ranking) | सरासरी | |
30 सप्टेंबर 2023 | गणितीय क्रिया | भागीदारी | |
3 ऑक्टोबर 2023 | गहाळ पद शोधणे | चक्रवाढ व्याज | |
4 ऑक्टोबर 2023 | असमानता | ||
5 ऑक्टोबर 2023 | गुणोत्तर व प्रमाण | ||
6 ऑक्टोबर 2023 | आकृत्या मोजणे | ||
7 ऑक्टोबर 2023 | विभाज्यतेच्या कसोट्या | ||
9 ऑक्टोबर 2023 | सहसंबंध | ||
10 ऑक्टोबर 2023 | सरळव्याज | ||
11 ऑक्टोबर 2023 | बैठक व्यवस्था | ||
12 ऑक्टोबर 2023 | बोट व प्रवाह | ||
13 ऑक्टोबर 2023 | वर्गीकरण | ||
14 ऑक्टोबर 2023 | वेळ व अंतर |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख
- जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023
- जिल्हा परिषद भरती 2023
- जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023
- जिल्हा परिषद वेतन 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
