Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाजकल्याण अधिकारी गट ब या संवर्गातील एकूण 22 पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी आलेल्या अर्जानुसार परीक्षा कि मुलाखत घ्यायची याचा निर्णय MPSC घेणार आहे. 2015 मध्ये आयोगाने MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 जाहीर केला होता. जे उमेदवार या परीक्षेची तयारी करतील त्यांना MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 सविस्तर स्वरुपात दिला आहे.

MPSC भरती 2023

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

कोणत्याची परीक्षेत चागले यश मिळवायचे असेल तर आपणास त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असायला हवा. MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 बद्दल थोडक्यात माहिती खाली देण्यात आली आहे.

समाजकल्याण अधिकारी गट ब अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव MPSC भरती 2023
पदाचे नाव

समाजकल्याण अधिकारी गट ब

एकूण रिक्त पदे 22
लेखाचे नाव समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेचा अभ्यासक्रम
निवड प्रक्रिया मुलाखत किंवा लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

समाजकल्याण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) समाजकल्याण अधिकारी गट ब च्या अधिसूचनेत नमूद केले आहे कि, जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर भरती परीक्षा एकूण 150 गुणांची होणार असून परीक्षेचा दर्जा हा पदवी समान असेल. परीक्षा फक्त मराठी माध्यमातून होईल. समाजकल्याण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप 2023 खाली देण्यात आले आहे.

विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
सामान्य ज्ञान 150 150 दीड तास
 • समाजकल्याण विभाग भरती परीक्षेत 150 प्रश्न 150 गुणांसाठी विचारल्या जातात.
 • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण देण्यात येईल.
 • परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
 • परीक्षेचा कालावधी दीड तास आहे.
 • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 चा विषयानुसार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

1. कला शाखेतील घटक :

 • आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (1857-1910)
 • भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल
 • भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन

2. विज्ञान व अभियांत्रिकी

 • वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन – विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहितके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान
 • आधुनिकीकरण व विज्ञान – आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत (समस्या व उपाय)
 • जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती
 • वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम
 • भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदा. ऊर्जा समस्या, अन्नधान्य समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या,शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या

3. वाणिज्य व अर्थव्यवस्था

 • भारतीय आयात-निर्यात
 • राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी, ग्रामीण बॅकांची भूमिका
 • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी
 • किंमती वाढण्याचे कारणे व उपाय

4. समाजकल्याण अध्ययन

 • समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान
 • मानवी अभिवृध्दी व व्यक्तिमत्व विकास
 • समाज कल्याण प्रशासन
 • सामाजिक सुरक्षा विषयक कायदे व अंमलबजावणी (पीसीआर, पीओए. बाल कामगार कायदा इत्यादी)
 • भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना
 • समाज कार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र

5. जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी –

 • राजकीय,औद्योगिक,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी.

6. बुद्धिमापन विषयक प्रश्न –

 • उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टिने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा_30.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

इतर सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023 
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
SSC CGL अभ्यासक्रम 2023 तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
PCMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा_40.1
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 मी कोठे पाहू शकतो?

MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 या लेखात दिला आहे

MPSC समाजकल्याण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप मी कोठे पाहू शकतो?

MPSC समाजकल्याण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप या लेखात दिले आहे.

MPSC समाजकल्याण विभाग भरतीची परीक्षा किती गुणांची असते?

MPSC समाजकल्याण विभाग भरतीची परीक्षा 150 गुणांची असते.