Marathi govt jobs   »   MPSC Non Gazetted Services 2023   »   MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण...

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023, संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे विश्लेषण तपासा

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 ची परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिळालेल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. त्याचप्रमाणे 7, 14, 22 आणि 29 ऑक्टोबर 2023 रोजी MPSC गट ब मधील इतर सर्व पदांच्या स्वतंत्र पेपर 2 ची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या पेपरचे सुद्धा MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात उपलब्ध करून दिल्या जाईल. या लेखात संयुक्त पेपर 1 चे MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयानुसार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), परीक्षेची एकूण काठीण्य पातळी आणि विषयानुसार परीक्षेचे विश्लेषण देण्यात आले आहे.

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे विश्लेषण या लेखात देण्यात आले आहे. MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC गट ब मुख्य परीक्षा 2022-23
लेखाचे नाव MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023
पदांची नावे
 • सहायक कक्ष अधिकारी (ASO)
 • राज्य कर निरीक्षक (STI)
 • पोलीस उपनिरीक्षक (PSI)
 • दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब
MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023 MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1
नकारात्मक गुणांकन पद्धती एक चतुर्थांश (1/4)
परीक्षेचा कालावधी 01 तास
एकूण गुण 200
अधिकृत संकेतस्थळ www.mpsconline.gov.in

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2022-23: संयुक्त पेपर 1 विश्लेषण

या लेखात आपण MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2022-23 अंतर्गत 01 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे विश्लेषण देण्यात आले आहे. MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 चे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अनु.क्र. विषयाचे नाव प्रश्न संख्या गुण काठीण्य पातळी
01 मराठी 50 100 सोपी ते मध्यम
02 इंग्लिश 30 60 सोपी ते मध्यम
03 सामान्य ज्ञान 20 40 सोपी ते मध्यम
एकूण  100  200 सोपी ते मध्यम
MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023, संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे विश्लेषण तपासा_40.1
अड्डा 247 मराठी

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2022-23: गुड अटेंम्ट

MPSC गट ब मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 चे गुड अटेंम्ट खालील तक्त्यात दिले आहे. गुड अटेंम्ट म्हणजे परीक्षेत तुम्ही केलेल्या 100 टक्के अचूक सोडवलेल्या प्रश्नांची सुरक्षित संख्या आहे ज्यामुळे तुम्हाला कट ऑफ क्लीअर करण्यात मदत होईल.

अनु.क्र. विषयाचे नाव गुड अटेंम्ट
01 मराठी 42-44
02 इंग्लिश 24-26
03 सामान्य ज्ञान 16-18
एकूण  82-88

विषयानुसार संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2022-23

दिनांक 01 ऑक्टोबर 2023 च्या MPSC गट ब मुख्य परीक्षा 2022-23 अंतर्गत घेण्यात आलेल्या MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 चे विषयानुसार परीक्षा विश्लेषण खाली देण्यात आले आहे. यात मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण देण्यात आले आहे.

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मधील मराठी विषयाचे विश्लेषण

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मध्ये मराठी विषयावर एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने मराठी व्याकरण, शब्दसंपदा आणि उतारा या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते. घटकानुसार MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मधील मराठी विषयाचे विश्लेषण खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2022-23: मराठी विषय
टॉपिक प्रश्नाची संख्या  काठिण्य पातळी
देवनागरी लिपी 1 सोपी
स्वर-व्यंजन 2 सोपी ते मध्यम
विभक्ती 2 सोपी ते मध्यम
संधी 2 सोपी ते मध्यम
वचन 1 सोपी
नाम 3 सोपी ते मध्यम
विशेषण 3 सोपी ते मध्यम
क्रियापद 1 मध्यम
क्रियाविशेषण 2 सोपी ते मध्यम
शब्दयोगी अव्यय 1 मध्यम
केवलप्रयोगी अव्यय 1 मध्यम
प्रयोग 2 सोपी ते मध्यम
अव्यय 1 मध्यम
वाक्याचे प्रकार 4 सोपी ते मध्यम
शब्दसिद्धी 4 सोपी ते मध्यम
विरामचिन्हे 1 सोपी
समानार्थी शब्द 1 सोपी ते मध्यम
विरुद्धार्थी शब्द 1 सोपी
वाक्प्रचार 2 सोपी ते मध्यम
म्हणी 3 सोपी ते मध्यम
विधेयपूरक 1 मध्यम
समास 2 सोपी ते मध्यम
शब्दसमूहाबद्दल एक शब्द 3 सोपी ते मध्यम
शुद्ध-अशुद्ध शब्द 1 मध्यम
उतारा (विचारस्वातंत्र व विचारवंत) 5 सोपी ते मध्यम
एकूण 50 सोपी ते मध्यम

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मधील इंग्लिश विषयाचे विश्लेषण

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 मध्ये इंग्लिश विषयावर एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने English Grammar, Vocabulary आणि Passage या घटकांचा समावेश होता. घटकानुसार MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मधील इंग्लिश विषयाचे विश्लेषण खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

MPSC Group B Main Exam Analysis 2022-23 of English Subject
Topics No. of Questions Difficulty Level
Part of Speech 2 Easy
Correct / Incorrect Sentence 7 Easy to Medium
Articles 1 Medium
Idiom and Phrases 5 Easy to Medium
Direct Indirect Speech 2 Easy to Medium
Clause 1 Easy to Medium
Question Tag 1 Easy
Tense 1 Easy
Synonyms and Antonyms 3 Easy to Medium
Passage on Sociability 5 Easy to Medium
Voice 2 Easy to Medium
Total 30 Easy to Medium

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मधील सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मध्ये सामान्य ज्ञानावर एकूण 20 प्रश्न विचारल्या गेले होते. सामान्य ज्ञान या विषयात चालू घडामोडी, माहिती अधिकार अधिनियम, 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान (ICT) या विषयाचा समावेश होतो. विषयानुसार MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 मधील सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2022-23: सामान्य ज्ञान
विषय प्रश्नाची संख्या  काठिण्य पातळी
चालू घडामोडी 10 सोपी ते मध्यम
माहिती अधिकार अधिनियम, 2005महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 5 सोपी ते मध्यम
संगणक व माहिती तंत्रज्ञान (ICT) 5 सोपी ते मध्यम
एकूण 20 सोपी ते मध्यम

सामान्य ज्ञान विषयातील खालील टॉपिक्स वर प्रश्न विचारण्यात आले होते.

 • फिफा वर्ल्ड कप
 • राज्य व लोकनृत्य
 • बुकर पुरस्कार
 • महदायी नदीच्या पाणीवाटप वाद
 • शेवॉलियर डे आय ऑरड्रे डेस आर्ट एट डेस पुरस्कार 2022
 • गोदावरी नदी
 • इनोव्हेशन ट्रेंड 2022
 • व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2022
 • लष्करी सराव
 • दुलीप ट्रॉफी

माहिती अधिकार अधिनियम, 2005 वर खालील टॉपिक्सवर प्रश्न विचारण्यात आले होते.

 • कलम (2 प्रश्न)

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वर खालील टॉपिक्सवर प्रश्न विचारण्यात आले होते.

 • अधिकाऱ्याची कार्यक्षमता
 • कलम (2 प्रश्न)

संगणक व माहिती तंत्रज्ञान (ICT) वर खालील टॉपिक्सवर प्रश्न विचारण्यात आले होते.

 • ICT अधिनियम 2000
 • ICT शी संबंधित प्रकल्प
 • ICT शी संबंधित हल्याचा (अटॅक) चा प्रकार
 • संगणक प्रोटोकॉल
 • ICT शी संबंधित R&D कार्य करणारी संस्था

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 PDF

01 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 पेपर 1 PDF

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023, संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे विश्लेषण तपासा_50.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC गट ब 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023, संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 चे विश्लेषण तपासा_60.1
MPSC महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023 मी कोठे पाहू शकतो?

MPSC गट ब मुख्य परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात देण्यात आले आहे.

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 ची परीक्षा कधी घेण्यात आली?

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 ची परीक्षा दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आली.

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 चे गुड अटेम्प्ट किती आहे?

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 चे गुड अटेम्प्ट 82 ते 88 एवढे आहे.

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 ची काठिण्य पातळी कशी होती?

MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2022-23 मधील पेपर 1 ची काठिण्य पातळी सोपी ते मध्येम स्वरूपाची होती.