Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023

WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023, अर्ज प्रक्रीये बद्दल सविस्तर माहिती मिळवा

WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023

WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023: महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. जलसंपदा विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीच्या लिंकचा समावेश आहे.

WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023: विहंगावलोकन 

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023

जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. जलसंपदा विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023 बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Adda247 App
Adda247 App

ऑनलाईन अर्ज प्रक्रीये बद्दल सर्वसाधारण सूचना:

  1. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  2. उमेदवारास एका संवर्गासाठी फक्त एकाच परीमंडळासाठी अर्ज सादर करता येईल.
  3. अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ https://wrd.maharashtra.gov.in
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://wrd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  5. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  6. अर्ज भरण्याची व परिक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

विहित कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे:

  1. प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
  2. उमेदवारांची लेखी परिक्षा ही उमेदवारांची कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी न करता घेतली जाणार असलेमुळे या परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पुर्ण तपासणीनंतरच उमेदवाराची गुणवत्तेच्या आधारे सामाजिक/समांतर आरक्षण निहाय अंतिम निवड केली जाईल.
  3. विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्र (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे.
  4. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे / कागदपत्रे संलग्न (Upload) केल्याशिवाय अर्ज स्विकृत केला जाणार नाही.

परीक्षा केंद्र व परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना:

  1. अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  2. परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  3. परीक्षा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवास पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या परीक्षा केंद्रावर किंवा नजिकच्या परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम राहील.

परीक्षा शुल्काचा भरणा :

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग रु.1000/-
मागासवर्गीय प्रवर्ग रु. 900/-
  1. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
  2. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
  3. उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
  4. परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीद्ववारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरुन आणि / अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.
  6. परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्का भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे, याची स्थिती (Status) लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापुर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.
  7. परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहीत दिनांक / विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. विहीत मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकणाऱ्या उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रियेकरिता विचार केला जाणार नाही.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज लिंक 

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज लिंक: जलसंपदा विभाग भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज लिंक (सक्रीय)

नागपूर कोतवाल भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD जलसंपदा भरती 2023 शी संबंधित अन्य लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

WRD जलसंपदा विभाग अर्ज प्रक्रिया 2023, अर्ज प्रक्रीये बद्दल सविस्तर माहिती मिळवा_6.1

FAQs

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीची आहे.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.