Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023, पदानुसार पात्रता निकष तपासा

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023: कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करताना त्यातील पदांसाठी आवश्यक असणारा पात्रता निकष माहित असणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. एकूण 14 संवर्गातील पदांसाठी ही भरती जाहीर झाली असून प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगळा आहे. या लेखात आपण पदानुसार WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023: विहंगावलोकन 

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
 • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • आरेखक गट क
 • सहाय्यक आरेखक गट क
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
 • अनुरेखक गट क
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क
 • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

जलसंपदा विभाग भरती 2023 पात्रता निकष

नागरिकत्व

उमेदवार भारतीय नागरिक असावा.

वयोमर्यादा

जलसंपदा विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 वयोमर्यादा 
प्रवर्ग  वयोमर्यादा 
खुल्या उमेदवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय उमदेवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
पदवीधारक अंशकालीन उमदेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील
स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी  यांचेसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष इतकी राहील
दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
प्रकल्पग्रस्त आणि भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
माजी सैनिक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील

टीप:-तथापि, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव 2023/प्र.क्र /14/ कार्या 92 दि. 3 मार्च 2023 अन्वये दि. 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.

Adda247 App
Adda247 App

शैक्षणिक अर्हता

जलसंपदा विभाग भरती 2023 शैक्षणिक अर्हता: जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये जाहीर झालेल्या प्रत्येक  पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून ती खालील तक्त्यात दिली आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव  शैक्षणिक अर्हता
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
 • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे.
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
 • जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
 • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे.
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
 • उपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
 • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
 1. Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेच
 2. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल
आरेखक गट क
 • ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे.
सहाय्यक आरेखक गट क
 • ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;
 • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.
 • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
 1. पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका
 2. पदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल.

 

प्रयोगशाळा सहाय्यक गट क
 • ज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे.
अनुरेखक गट क
 • ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणि
 • ज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे.
दफ्तर कारकून गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच
 • टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
मोजणीदार गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
 • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कालवा निरीक्षक गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
 • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
सहाय्यक भांडारपाल गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
 • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
 • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा
 • औध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे
 • कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल

टंखलेखन अर्हता :

दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी टंकलेखन अर्हता लागू आहे. तरी उमेदवाराने सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अहंता अर्ज स्विकारण्यासाठी विहीत अंतिमदिनांक येईल त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे.

टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (दप्तर कारकुन मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक

भांडारपाल पदाकरीता):

दिव्यांग उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग- 2016/प्र.क्र. 116/16-अ, दिनांक 16 नोव्हेंबर 2016 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणान्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-2018/प्र.क्र.180/28. दिनांक 13 जून 2019 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

अनाथ उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अनाथ- 2022/प्र.क्र.84/1का-03, दिनांक 07 जुलै 2022 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

प्रकल्पग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

भूकंपग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे भूकंपग्रस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही.

नागपूर कोतवाल भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD जलसंपदा भरती 2023 शी संबंधित अन्य लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

 

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 काय आहे?

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे.

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 मला कोठे बघायला मिळेल?

WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 या लेखात सविस्तरपणे दिली आहे.