Table of Contents
वनरक्षक कट ऑफ 2023
वनरक्षक कट ऑफ 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी वन विभाग उत्तरतालिका 2023 जाहीर केली होती. त्यातील बहुतांशी मुलांना चागले गुण प्राप्त झाले आहे. वनरक्षक पदासाठी पुढील पायरी म्हणजे शारीरिक चाचणी होय. वनरक्षक कट ऑफ 2023 बद्दल माहिती जन्णून घेणे आवश्यक आहे कारण शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्यासाठी सर्व उमेदवारांना वनरक्षक कट ऑफ 2023 क्लिअर करणे आवश्यक आहे. आज या लेखात आपण अपेक्षित वनरक्षक कट ऑफ 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात पुरुष व महिला उमेदवारांचा कट ऑफ किती असेल त्याचप्रमाणे हा कट ऑफ कसा काढला याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
अवश्य वाचा: वन विभाग उत्तरतालिका 2023
वनरक्षक कट ऑफ 2023: विहंगावलोकन
या लेखात वनरक्षक पदाचा कट ऑफ देण्यात आला आहे. उमेदवारांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर वनरक्षक कट ऑफ 2023 (अपेक्षित) तयार करण्यात आला आहे. वनरक्षक कट ऑफ 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
वनरक्षक कट ऑफ 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वन विभाग भरती 2023 |
पदाचे नाव | वनरक्षक |
वन विभाग रिक्त पदे 2023 | 2417 |
वनरक्षकाची एकूण पदे | 2138 |
लेखाचे नाव | वनरक्षक कट ऑफ 2023 |
वन विभाग उत्तरतालिका 2023 | 11 सप्टेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
वनरक्षक कट ऑफ 2023 (अपेक्षित)
वन विभाग उत्तरतालिका 2023 जाहीर झाली आहे. त्यानंतर उमेदवारांच्या मिळालेल्या प्रदिसादानंतर आम्ही खाली अपेक्षित वनरक्षक कट ऑफ 2023 देत आहोत. सदर कट ऑफ हा फक्त अपेक्षित असून अधिकृत वनरक्षक कट ऑफ 2023 थोडा वेगळा असू शकतो. येथे आम्ही कट ऑफची एक रेंज दिली आहे. प्रवर्गानुसार अपेक्षित वनरक्षक कट ऑफ 2023 खाली देण्यात आला आहे.
वनरक्षक कट ऑफ 2023 (अपेक्षित) | ||
प्रवर्ग | पुरुष | महिला |
सर्वसाधारण प्रवर्ग | 90-95 | 84-90 |
मागास प्रवर्ग | 82-86 | 76-80 |
वनरक्षक कट ऑफ 2023 कसा काढल्या गेला?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हा वनरक्षक कट ऑफ 2023 कसा काढल्या गेला. याची प्रमुख काही निकष आहे. वनरक्षक कट ऑफ 2023 चे निकष खालीलप्रमाणे आहे.
- परीक्षेत नकारात्मक गुणांकन पद्धती (निगेटिव्ह मार्किंग) नव्हती.
- बहुतांशी उमेदवारांना मराठी व बौद्धिक चाचणी हा विषय सोपा गेला.
- परीक्षेत नॉर्मलायझेशन होणार असल्याने ज्या शिफ्टमध्ये थोडा कठीण पेपर आला होता त्या शिफ्टच्या उमेदवाराचे गुण वाढणार आहेत.
- एकूण रिक्त पदांची संख्या आणि त्यासाठी आलेल्या अर्जाची संख्या याचे प्रमाण देखील वनरक्षक कट ऑफ 2023 वर प्रभाव टाकणार आहे.
- उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरीता पुढील टप्प्याकरीता पात्र राहणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |