Marathi govt jobs   »   Study Materials   »   President's Rule in a State: Article...

राज्यातील राष्ट्रपती राजवट (President’s Rule in a State), कलम 356, व्याख्या, घोषणेचे आधार, आणि परिणाम

राज्यातील राष्ट्रपती राजवट (President’s Rule in a State)

President’s Rule in a State: The President’s rule can be enforced under Article 352, 356, 360 of the Constitution of India. The president can impose a regime in the state. According to Article 356 of the Constitution, presidential rule can be imposed if the administration of a state is not functioning in a constitutional manner. According to Article 365 of the Constitution, it is possible for a state government to declare a presidential rule in that state even if it ignores the instructions of the Center. As per Section 356, if any State Government is in the minority or unable to function, it is dismissed and the State is governed directly by the Government of India / Central Government.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

राज्यातील राष्ट्रपती राजवट: विहंगावलोकन

In this article lets learn about important articles related to President’s Rule, Types of Emergency In India, Basis of Imposition, Parliamentary Approval and Duration, Consequences of President’s Rule, and Powers under Article 357.

President’s Rule in a State
Category Study Material
Exam Talathi and Other Competitive exams
Subject Indian Polity
Name President’s Rule in a State

राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency)

President’s Rule in a State: Article 356 | राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

President’s Rule in a State, Article 356: भारतीय संविधानातील 18 व्या भागात कलम 352 ते 360 या कलमान्वये आणीबाणीविषयक तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे कोणतीही अनियमित अथवा आणीबाणी सदृश्य परिस्थिती हाताळण्यास केंद्र सरकार सक्षम झाले आहे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षा तसेच लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था आणि राज्यघटनेचे संरक्षण करता यावे, या उद्देशाने आणीबाणीविषयक तरतुदी केलेल्या आहेत.

Classical and Folk Dances of India 

Types of Emergency In India | भारतातील आणीबाणीचे प्रकार 

Types of Emergency in India: आणीबाणी दरम्यान, केंद्र शासन पूर्ण शक्तीशाली बनते आणि घटकराज्ये केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. सामान्य काळातील संघराज्यीय राजकीय व्यवस्थेचे रूपांतर आणीबाणीदरम्यान एकात्मक व्यवस्थेत होणे, हे भारताच्या घटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे.

आणीबाणीचे प्रकार (Types of Emergency): घटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी व वित्तीय आणीबाणी.

  1. राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) – युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यांमुळे आणीबाणी (कलम 352): या आणीबाणीला ‘राष्ट्रीय आणीबाणी’ (National Emergency) म्हणून ओळखले जाते. मात्र, घटनेत या प्रकारच्या आणीबाणीला ‘आणीबाणीची उद्घोषणा’ असे संबोधले आहे.
  2. राज्य आणीबाणी (President’s Rule) – राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने आणीबाणी (कलम 356): या आणीबाणीला ‘राष्ट्रपती राजवट’ (President’s Rule) म्हणून ओळखले जाते. तिला ‘राज्य आणीबाणी’ किंवा ‘घटनात्मक आणीबाणी’ म्हणूनही ओळखले जाते. मात्र, परिस्थितीला ‘आणीबाणी’ असे संबोधलेले नाही.
  3. वित्तीय आणीबाणी (Financial Emergency) – भारताचे वित्तीय स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्याने वित्तीय आणीबाणी (Financial Emergency) घोषित केली जाते.

Role and Powers of the President

President’s Rule in a State: Basis of Imposition | राष्ट्रपती राजवट घोषणेचे आधार

President’s Rule in a state, Basis of Imposition: कलम 355 अन्वये, केंद्र शासनावर प्रत्येक राज्यशासनास बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून संरक्षित करण्याच्या कर्तव्याबरोबरच अजून एक कर्तव्य टाकण्यात आले आहे. प्रत्येक राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविले जाईल, याची सुनिश्चिती करणे हे केंद्रशासनाचे कर्तव्य असेल.
हे कर्तव्य पूर्ण करण्याच्या प्रक्रियेतच, कलम 356 अन्वये, राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविणे अशक्य झाले आहे याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हाती घेतात. यालाच ‘राष्ट्रपती राजवट’ (President’s Rule) किंवा ‘राज्य आणीबाणी किंवा ‘घटनात्मक आणीबाणी’ असे म्हटले जाते.

राज्यात राष्ट्रपती राजवट कलम 356 अन्वये लावण्यात येते. मात्र त्याचे दोन आधार आहेत:

  1. कलम356 मधील आधारावर- राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी
  2. कलम 365 मधील आधारावर- केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्याचा परिणाम:

i. कलम 356 मधील आधारावर- जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री झाली तर, ते त्या राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s Rule) लावण्याची घोषणा करू शकतात. अशी घोषणा ते संबंधित राज्याच्या राज्यपालाकडून तसा अहवाल प्राप्त झाल्यास किंवा तसा अहवाल प्राप्त न झाल्यासही करू शकतात.

ii. कलम 365 मधील आधारावर- केंद्राने एखाद्या राज्याला दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात त्या राज्याने कसूर केली तर, राष्ट्रपतींनी असे गृहीत धरणे कायदेशीर होईल की, त्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles and Schedules 

President’s Rule in a State: Parliamentary Approval and Duration |  संसदेची मान्यता व राष्ट्रपती राजवटीचा कालावधी

President’s Rule, Parliamentary approval and duration: राष्ट्रपतींच्या एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s Rule) लागू करण्याच्या घोषणेला संसदेची संमती घ्यावी लागते. त्यानुसार राष्ट्रपती राजवटीचा कालावधीही ठरतो. त्याबाबतच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:

  • राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटीची (President’s Rule) घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते. अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो.
  • जर राष्ट्रपती राजवटीची घोषणा लोकसभा विसर्जित केलेली असतांना करण्यात आलेली असेल किंवा उपरोक्त दोन महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर, नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत लोकसभेने राष्ट्रपती राजवटीस (President’s Rule) मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा राजवटीचा अंमल संपुष्टात येतो. अर्थात, राज्यसभेने तत्पुर्वी अशा राजवटीस मान्यता दिलेली असावी.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्रपती राजवटीस मान्यता दिल्यास तिचा अंमल दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत राहतो. त्यानंतर तो संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविता येतो. मात्र, असा तो महत्तम तीन वर्षांसाठीच वाढविता येतो.
  • जर उपरोक्त कोणतेही सहा महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर, नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर 30, दिवसांच्या आत राष्ट्रपती राजवटीचा (President’s Rule) अंमल चालू राहण्याचा ठराव लोकसभेने पारित करणे गरजेचे असते. अन्यथा, राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते. अर्थात, तत्पुर्वी राज्यसभेने असा ठराव पारित करणे गरजेचे असते.
  • राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव किंवा ती पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमार्फत साध्या बहुमताने (म्हणजेच हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या निम्म्या बहुमताने) पारित होणे गरजेचे असते.

Fundamental Rights Of Indian Citizens

राष्ट्रपती राजवटीचा अंमल एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढविण्याच्या प्रक्रियेवर मर्यादा घालण्यासाठी 44व्या घटनादुरूस्ती कायद्याने (1978) पुढील नवीन तरतूद समाविष्ट केली:

पुढील दोन अटी पूर्ण झाल्याशिवाय संसदेला राष्ट्रपती राजवटीचा(President’s Rule) अंमल एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढविण्याचा ठराव पारित करता येणार नाही:

  1. त्यावेळी संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा त्याच्या एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी, आणि
  2. निवडणूक आयोगाने असे प्रमाणित करावे की, संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे अडचणीचे असल्याने राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू ठेवणे आवश्यक आहे.

राष्ट्रपती राजवट समाप्त करणे (Revocation of President’s Rule):

राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसऱ्या उद्घोषणेद्वारे समाप्त करू शकतात. अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.

President’s Rule: Article 356- Consequences of President’s Rule | राष्ट्रपती राजवटीचे परिणाम

President’s Rule in a state, Consequences of President’s rule: एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यावर राष्ट्रपतींना असामान्य अधिकार प्राप्त होतात ते पुढीलप्रमाणे:

  • राष्ट्रपती त्या राज्यशासनाची सर्व किंवा काही कार्ये, तसेच राज्याच्या राज्यपालाचे व विधानमंडळ वगळता इतर संस्था आणि प्राधिकारी यांचे सर्व किंवा काही अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात.
  • राष्ट्रपती असे घोषित करू शकतात की, त्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेकडून वापरले जातील.
  • राष्ट्रपती उद्घोषणेची उद्दिष्टे अंमलात आणण्याकरता आवश्यक अशा अनुषंगिक व प्रभावी तरतुदी करू शकतात. तरतुदींमध्ये राज्यातील कोणतीही संस्था किंवा प्राधिकारी यांच्याशी संबंधित घटनात्मक तरतुदी निलंबित करण्याचा समावेश असू शकतो.
  • मात्र, राष्ट्रपतींना उच्च न्यायालयाचा कोणताही अधिकार स्वत:कडे घेण्याचा किंवा उच्च न्यायालयाशी संबंधित असलेल्या कोणतीही घटनात्मक तरतूदीचे कार्यचालन पूर्णत: किंवा अंशतः निलंबित करण्याचा अधिकार नसेल. म्हणजेच, राष्ट्रपती राजवटीदरम्यान उच्च न्यायालयाची घटनात्मक स्थिती, दर्जा, अधिकार व कार्ये समान राहतात व त्यांमध्ये बदल होत नाही.
  • अशा रीतीने, राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s Rule) लागू केल्यावर, राष्ट्रपती मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ भंग करतात. राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवाच्या मदतीने किंवा राष्ट्रपतींनी नेमलेल्या सल्लागारांच्या मदतीने राज्याचे प्रशासन चालवितात.

Governor General of British India before 1857

President’s Rule, Powers under Article 357 | कलम 357 अंतर्गत अधिकार

President’s Rule in a state, Powers under article 357: राष्ट्रपती राजवटीखालील (President’s Rule) राज्याची विधानसभा राष्ट्रपती एकतर निलंबित किंवा विसर्जित करतात. (विधानसभा विसर्जित केल्यास निवडणूका घेतल्या जाऊन नवीन विधानसभा निवडली जाते.) निलंबन किंवा विसर्जनाच्या परिस्थितीत राज्य विधेयके आणि अर्थसंकल्प संसदेमार्फत पारित केले जातात.कलम 357 मध्ये राज्याच्या कायदेकारी अधिकाराच्या वापराबद्दल तरतुदी देण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

  • राष्ट्रपती राजवटीदरम्यान राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेमार्फत वापरले जातील असे घोषित करण्यात आले असेल तरः
  1. संसद, राज्य विधानमंडळाचा कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्रदान करू शकते, तसेच राष्ट्रपतींना असा अधिकार इतर प्राधिकाऱ्याकडे सोपविण्यासाठी प्राधिकृत करू शकते.
  2. संसद किंवा राष्ट्रपती किंवा उपरोक्त प्राधिकारी केंद्राला किंवा त्याच्या अधिकाऱ्यांना किंवा प्राधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करणारे व कर्तव्ये नेमून देणारे कायदे करू शकतात.
  3. राष्ट्रपती, लोकसभेचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा राज्याच्या संचित निधीतून खर्चास संसदेकडून त्यास मंजुरी मिळेपर्यंत मान्यता देऊ शकतात.
  4. राष्ट्रपती, संसदेचे अधिवेशन चालू नसल्यास राज्याच्या प्रशासनासाठी अध्यादेश काढू शकतात.
  • संसदेने/राष्ट्रपतींनी / उपरोक्त प्राधिकान्यानी केलेला कायदा राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतरही अंमलात राहतो. अर्थात, राज्य विधानमंडळ असा कायदा त्यानंतर केव्हाही रद्द करू शकते किंवा बदलू शकते किंवा त्यात सुधारणा करू शकते.

सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट (President’s Rule) पंजाब राज्यात 1951 मध्ये लावण्यात आली होती. (घटनेच्या प्रारंभापूर्वी 1949 मध्ये विंध्य प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती.) त्यानंतर जवळजवळ सर्वच राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. सर्वाधिक म्हणजे 9 वेळा राष्ट्रपती राजवट केरळ व उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये लावण्यात आली, तर त्याखालोखाल 8 वेळा पंजाब राज्यात लावण्यात आली होती.

Adda247 App
Adda247 App

FAQs President’s Rule in a State

Q.1 घटनेमध्ये आणीबाणीचे किती प्रकार दिलेले आहेत?

Ans. घटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत.

Q.2 राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 राष्ट्रपती राजवटसाठी कोणते कलम वापरले जाते ?

Ans: कलम 356 राष्ट्रपती राजवटसाठी कलम वापरले जाते.

Q.4  राष्ट्रपती राजवट याची माहिती कुठे मिळेल?

Ans. राष्ट्रपती राजवट याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

लेखाचे नाव लिंक
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

Where can I find information on political science?

Information on the topic of political science can be found on Adda247 Marathi's app and website.

Which article is used for Presidency's Rule?

Article 356 is used for Presidency's Rule

Where can I find information on Presidency's Rule?

Information on the topic of Presidency's Rule can be found on Adda247 Marathi's app and website.

What are the three types of Emergencies in India ?

The President can declare three types of emergencies — national, state and financial emergency