MUHS Act 1998: Maharashtra Health University Nashik announced MUHS Exam Date 2022. MUHS Exam is scheduled on 14, 15, 17, and 18 October 2022. MUHS Recruitment 2022 Exam for Group C Cadre Post will ask questions on MUHS Act 1998 for 40 marks. In the State of Maharashtra, the MUHS Act 1998 was enacted with the aim of providing proper and systematic education, teaching training, and research in modern medicine and Indian systems of medicine. In this article, you will get detailed information about MUHS Act 1998 in this article.
MUHS Act 1998 | |
Category | Study Material |
Useful for | MUHS Recruitment 2022 |
Article Name | MUHS Act 1998 |
No. of Chapters in MUHS Act 1998 | 13 |
No. of Articles in MUHS Act 1998 | 97 |
MUHS Act 1998 PDF | Provided in this article. |
MUHS Act 1998
MUHS Act 1998: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने 25 जुलै 2022 रोजी MUHS Recruitment 2022 जाहीर केली. एकूण 122 पदांसाठी MUHS Recruitment 2022 होणार आहे. MUHS भरती 2022 मधील गट क संवर्गातील पदासाठी होणाऱ्या परीक्षेत MUHS Act 1998 वर 40 गुणांसाठी प्रश्न विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे MUHS Act 1998 बद्दल माहिती असणे आपणास आवश्यक आहे. आज या लेखात आपण Maharashtra Arogya Vidnyan Vidyapith Adhiniyam 1998 (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम) बद्दल सविस्तर माहिती जसे की, MUHS Act 1998 मध्ये किती कलम आहे, MUHS Act 1998 मधील Chapter (प्रकरण) याविषयी माहिती पाहणार आहे. सोबतच या लेखात MUHS Act 1998 PDF दिली आहे.
Click here to Download MUHS Hall Ticket 2022
MUHS Act 1998 – Maharashtra Arogya Vidnyan Vidyapith Adhiniyam 1998 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998
MUHS Act 1998: महाराष्ट्र राज्यामध्ये, आधुनिक वैद्यक व भारतीय वैद्यक पद्धती यामध्ये यथायोग्य आणि पद्धतशीर शिक्षण, अध्यापन प्रशिक्षण व संशोधन होत आहे हे सुनिश्चित करण्याच्या प्रयोजनाकरिता एका स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करणे व ते विधिसंस्थापित करणे आणि राज्यात वैद्यक शास्त्रांत समतोल विकास साधणे, तसेच वैद्यक शाखांतील विविध अभ्यासक्रमांत एकरूपता आणणे आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करणे इष्ट होते. त्यासाठी त्वरित कायदा करणे आवश्यक आहे असे शासनाला वाटले उपरोक्त प्रयोजनांसाठी कायदा तयार करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. 3 जून 1998 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अध्यादेश 1998 (MUHS Act 1998) हा प्रख्यापित केला. ज्याद्वारे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
![[PDF] MUHS Act 1998 - Maharashtra Arogya Vidnyan Vidyapith Adhiniyam 1998_40.1](https://adda247jobs-wp-assets-adda247.s3.ap-south-1.amazonaws.com/jobs/wp-content/uploads/sites/11/2022/02/05111153/Adda247-App-e1659593338572.jpeg)
MUHS Recruitment 2022 – MUHS Nashik Bharti 2022
MUHS Act 1998 Key Points | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 महत्वाचे मुद्दे
MUHS Act 1998 Key Points: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 शी संबंधित महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विधेयक 1998 हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 30 जुलै 1998 रोजी संमत करण्यात आले.
- महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वरील अध्यादेश मागे घेऊन व निरसित करून त्यांनी दिनांक 29 ऑगस्ट 1998 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (चालू ठेवणे) अध्यादेश, 1998 भूतलक्षी प्रभावाने म्हणजेच दिनांक 3 जून 1998 पासून प्रख्यापित केला.
- अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 हा अधिनियम 3 जून 1998 रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येते.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 या अधिनियमास महाराष्ट्राच्या राज्यपालांची दिनांक 21 जानेवारी 1999 रोजी अनुमती मिळाली.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 हा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार, असाधारण यामध्ये दिनांक 21 जानेवारी 1999 रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये एकूण 13 प्रकरणे व 97 कलमे आहेत.
Chapters in MUHS Act 1998 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 मधील प्रकरणे
Chapters in MUHS Act 1998: Maharashtra Arogya Vidnyan Vidyapith Adhiniyam 1998 मध्ये एकूण 13 प्रकरणे आहेत. MUHS Act 1998 मधील सर्व प्रकरणे कशाशी संबंधित आहे याबद्दल माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
Chapter | Related to | Related Article |
1 | प्रारंभिक | 1 ते 2 |
2 | विद्यापीठ | 3 ते 9 |
3 | विद्यापीठाचे अधिकारी | 10 ते 21 |
4 | विद्यापीठाची प्राधिकरणे | 22 ते 47 |
5 | परिनियम, आदेश, नियम व विनिमय | 48 ते 52 |
6 | अध्यापक आणि कर्मचारी | 53 |
7 | प्रवेश, परीक्षा व विद्यार्थ्यांची संबंधित इतर बाबी | 54 ते 58 |
8 | समित्या | 59 ते 62 |
9 | परवानगी, संलग्नीकरण व मान्यता | 63 ते 74 |
10 | नावनोंदणी, पदव्या व दीक्षांत समारंभ | 75 ते 82 |
11 | विद्यापीठ निधी, लेखे व लेखापरीक्षा | 83 ते 86 |
12 | संक्रीर्ण | 87 ते 92 |
13 | संक्रमणात्मक तरतूद | 93 ते 97 |
MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern
MUHS Act 1998 PDF | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 PDF
MUHS Act 1998 PDF: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये एकूण 13 प्रकरणे व 97 कलमे आहेत. परीक्षेत याबद्दल माहिती असल्यास आपल्याला चांगले गुण मिळवता येतील MHUS भरती 2022 ची परीक्षा इंग्लिश व मराठी दोन्ही भाषेत होणार आहे. त्यासाठी आपल्या सोयीनुसार परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही या लेखात MUHS Act 1998 PDF दोन्ही भाषेत उपलब्ध करून दिले आहे.
![[PDF] MUHS Act 1998 - Maharashtra Arogya Vidnyan Vidyapith Adhiniyam 1998_50.1](https://adda247jobs-wp-assets-adda247.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2022/04/21105009/Adda247-Telegram-e1665574245751.jpeg)
FAQs: MUHS Act 1998
Q1. When was the MUHS act promulgated?
Ans. The MUHS act was promulgated on 21 January 1999
Q2. How many Chapters are there in MUHS Act 1998?
Ans. There are 13 Chapters in MUHS Act 1998
Q3. How many articles are there in MUHS Act 1998?
Ans. There are 13 articles in MUHS Act 1998
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exam | Click Here |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
![[PDF] MUHS Act 1998 - Maharashtra Arogya Vidnyan Vidyapith Adhiniyam 1998_60.1](https://st.adda247.com/https://d2fldgtygklyv6.cloudfront.net/77811619768658.png?tr=w-200)