Table of Contents
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना जाहीर केल्या आहेत. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023, 17 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. उमेदवार त्यांच्या MPSC च्या खात्यात लॉग इन करून MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी ठळक सूचनांबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना : विहंगावलोकन
दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवार या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 ठळक सूचना चा सर्व तपशील तपासू शकतात.
MPSC गट क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 ठळक सूचना : विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 |
पदांची नावे |
|
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
गट क एकूण पदे | 7510 |
लेखाचे नाव | MPSC गट क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 ठळक सूचना |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 17 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | |
परीक्षेची तारीख | 17 डिसेंबर 2023 |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
MPSC गट क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 ठळक सूचना: महत्वाच्या तारखा
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना 13 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
MPSC गट क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना | 20 जानेवारी 2023 |
MPSC अराजपत्रित सेवा प्रवेशपत्र 2023 (संयुक्त पूर्व परीक्षा) | 21 एप्रिल 2023 |
MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 | 30 एप्रिल 2023 |
MPSC अराजपत्रित सेवा उत्तरतालिका 2023 (अंतिम) | 07 जून 2023 |
MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा निकाल 2023 (दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि कर सहाय्यक) | 01 सप्टेंबर 2023 |
MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा निकाल 2023 (लिपिक टंकलेखक) | 12 सप्टेंबर 2023 |
MPSC गट क मुख्य परीक्षा अधिसूचना 2023 | 13 ऑक्टोबर 2023 |
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 17 ऑक्टोबर 2023 |
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | |
MPSC गट क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 तारीख | 10 डिसेंबर 2023 |
MPSC गट क मुख्य परीक्षेची तारीख 2023 | 17 डिसेंबर 2023 |
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना: MPSC गट क मुख्य परीक्षेचे आयोजन 17 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. त्याआधी आयोगाने उमेदवारांसाठी परीक्षेला जाण्यापूर्वी काही ठळक सूचना जारी केल्या आहेत. उमेदवार खाली त्या ठळक सूचना पाहू शकतात.
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे कृपया काळजीपूर्वक अवलोकन करावे.
- परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.
- ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राचो छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
- परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.
- परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
- पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.
- परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पाकिंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
- प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
- उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बेठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा,
- परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमुद करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ देण्यात येणार नाही
- कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) कारवाई केली जाईल, तसंच, प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल, परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 ठळक सूचना PDF
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
MPSC अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क 2023 शी संबंधित इतर लेख