Table of Contents
Maharashtra Saral Seva Bharti Latest News: In this article we will see the Latest Update on Maharashtra Saral Seva Bharti, Latest GR of Saral Seva Bharti Exams Now will be through Online Mode.
महाराष्ट्रातील सरल सेवा भरती परीक्षेबाबत मोठी घोषणा आज महाराष्ट्र शासनाने केली आहे. आता पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय सरळ सेवा भरती परीक्षा या Online पद्धतीनेच होणार आहे यासंबंधीचे नवीन GR शासनाने 18 जानेवारी 2022 रोजी जाहीर केले आहे. या लेखात आपण या नवीन GR बद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
Saral Seva Exams Now will be through Online Mode | महाराष्ट्रातील सरल सेवा भरती परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शासकीय विभागातील काही स्पर्धा परीक्षा या काही खाजगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत होत्या पण त्यात खूप गैरप्रकार होत होते. आत्ताच झालेल्या आरोग्य भरतीच्या गट ड व म्हाडा च्या परीक्षेत पेपर फुटणे, पेपर चुकीचे मिळणे असा सावळा गोंधळ होत होता किंवा होणार होता. त्यातच 12 डिसेंबर 2021 च्या म्हाडा भरतीच्या परीक्षेच्या आधल्या दिवशी ला ऐन वेळेवर MHADA ला पेपर रद्द करावा लागला. या आधीपण स्पर्धा परीक्षेत अनेक गैरप्रकार घडत होते. हा सगळा गोंधळ लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आता पासून महाराष्ट्रातील शासकीय विभागातील सर्व स्पर्धा परीक्षा पेपर TCS, MKCL व IBPS यांच्यामार्फत Online पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज या लेखात आपण या अधिकृत नवीन GR बद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
Saral Seva Exams Latest News, New GR | नवीन GR: महाराष्ट्रातील सरल सेवा भरती परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने
Saral Seva Exams Latest News, New GR: राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दि. 15/12/2021 च्या बैठकीत मा. मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले आहे. असा शाशनाने निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयानुसार यापूर्वी निर्गमित केलेले OMR Vendor च्या Empanelment बाबतचे संदर्भ क्र. 7 व 8 येथील शासन निर्णय क्र. मातंसं-२०२०/प्र.क्र.११/से-२/३९, दि.२१/०१/२०२१ आणि शासन निर्णय क्र. मातंसं २०२०/प्र.क्र.११/से-२/३९, दि.०४/०३/२०२१ हे सदर शासन निर्णयान्वये स्थगित करण्यात येत आहेत. यानंतर पदभरतीसंदर्भातील कोणतीही परिक्षा उक्त शासन निर्णयान्वये Empanelment केलेल्या OMR Vendors कडून घेण्यात येणार नाही आहे.
मा. मंत्रीमंडळाने TCS, IBPS आणि MKCL यांच्याकडून पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परिक्षा घेण्याची कार्यवाही करण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यानुषंगाने स्वतंत्र आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात येणार आहे.
विविध विभागांसाठी परिक्षा पद्धती निश्चित करणे, अटी व शर्ती निश्चित करणे व कार्यपद्धती निश्चित करणे या सर्व बाबी सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत असल्यामुळे संबंधित विभागांना सामान्य प्रशासन विभागांशी सल्लामसलत करुन त्यांच्या गरजेनुसार सदर बाबी अंतिम करता येतील. यापूर्वी वर्ष २०१७ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदांची पदभरती OMR पध्दतीने करण्यात येत होती. तसेच सदर पदभरतीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया परीक्षेचे निकाल, तसेच शिफारस झालेल्या / न झालेल्या उमेदवारांच्या याद्या संकेतस्थळावर जाहीर करणे, इ. तथा परीक्षा शुल्क सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक प्रानिम-१२१४/२८९/(प्र.क्र. १०८/१४/१३-अ दि. ११/०३/२०१५ नुसार विहित करण्यात आलेले आहेत. सदर अटी / शर्ती मध्ये कोणतीही सुधारणा करावयाची झाल्यास याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्णय घेण्यात येईल. महाराष्टातील सरळ सेवा भरती परीक्षेबद्दल हे नवीन GR तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Download करू शकता.
Saral Seva Bharti Pariksha नवीन GR Download करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढे MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), IBPS (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा TCS (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) यांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत.
Information About TCS
Information About TCS: TCS ही एक मानांकित संस्था असून बँक, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन यासारख्या परीक्षा घेते. महाराष्ट्रात या आधी TCS ने मुंबई मेट्रो जूनियर इंजीनियरची सुद्धा परीक्षा घेतली होती जी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली होती व त्यामुळे विद्यार्थ्यांचा TCS वर विश्वास बसला. नुकतेच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की यापुढे MHADA परीक्षाही TCS च्या माध्यमातून होईल.
Information About IBPS
Information About IBPS: बँकिंग क्षेत्रातील परीक्षा राबवण्यासाठी एक नामांकित संस्था म्हणजे IBPS होय. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ऑफिसर व क्लेरिकल च्या परीक्षा आयबीपीएस मार्फत होतात. तसेच केंद्राच्या विविध परीक्षा या आयबीपीएस मार्फत होतात. पारदर्शकपणा आणि विध्यार्थ्यांचा विश्वास यासाठी IBPS ही संस्था ओळखली जाते. अत्यंत पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पाडण्याच्या संस्थेमध्ये आयबीपीएस ही एक अग्रणी संस्था आहे. महाराष्ट्रातील MSEB च्या जूनियर इंजीनियर ची परीक्षा याआधी IBPS ने घेतली होती.
Information About MKCL
Information About MKCL: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) या कंपनीची स्थापना कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 5 जानेवारी 2018 रोजी एक शासकीय ठराव जारी करण्यात आला. या ठरावानुसार MKCL शी संबंधित बाबींकरिता महाराष्ट्र शासनाचा प्रातिनिधिक विभाग म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाऐवजी सामान्य प्रशासन विभागाची नेमणूक झाली आहे. महाराष्ट्रातील MSCIT च्या सर्व परीक्षा या MKCL मार्फत राबविल्या जातात.
Other Articles,
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
