Marathi govt jobs   »   Maharashtra Gramsevak Bharti 2023   »   ग्रामसेवक वेतन 2023

ग्रामसेवक वेतन 2023, ग्रामसेवक पदाची वेतन संरचना आणि जॉब प्रोफाइल तपासा

ग्रामसेवक वेतन 2023

ग्रामसेवक वेतन 2023: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा लवकरच 18939 पदांसाठी अधिसूचना जाहीर करणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 मधील एक लोकप्रिय पद म्हणजे ग्रामसेवक होत. खूप उमेदवार ग्रामसेवक भरती 2023 ची तयारी करत असतील. त्यांना एक आनंदाची बातमी जाहीर झाली आहे. नुकत्यात घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आता कंत्राटी ग्रामसेवकाचे मानधन 16000 करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे खूप जणांना उत्सुखता असेल की, जिल्हा परिषद ग्रामसेवकास काय वेतन ऑफर करते याबद्दल सर्व माहिती आम्ही या लेखात घेऊन आलो आहे. या लेखात आपण ग्रामसेवक वेतन 2023 बद्दल माहिती पाहणार आहोत ज्यात कंत्राटी ग्रामसेवक आणि ग्रामसेवक यातील फरक, ग्रामसेवकाची वेतन संरचना, इतर भत्ते आणि कामाचे स्वरूप (जॉब प्रोफाईल) याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

अवश्य पहा: जिल्हा परिषद भरती 2023 

ग्रामसेवक वेतन 2023: विहंगावलोकन

या लेखात ग्रामसेवक वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ग्रामसेवक वेतन 2023 बद्दल संक्षिप्त आढावा घेण्यासाठी खालील तक्ता तपासा

ग्रामसेवक वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव ग्रामसेवक भरती 2023
पदाचे नाव ग्रामसेवक
लेखाचे नाव ग्रामसेवक वेतन 2023
ग्रामसेवक वेतनस्तर S8: 25500-81100
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक यातील फरक काय आहे?

जसे शिक्षण सेवक, कृषी सेवक आहे. एखादा उमेदवार ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्यावर तो पहिले तीन वर्षे आपण कंत्राटी तत्वावर किंवा प्रोबेशन पिरेड वर काम करतो. तेव्हा त्या पदास कंत्राटी ग्रामसेवक असे म्हणतात. आणि प्रोबेशन पिरेड संपल्यावर त्या पदाचे रुपांतर अपोआप ग्रामसेवक या पडत होत असते. कंत्राटी ग्रामसेवकास ठराविक मानधन मिळत असते तर ग्रामसेवकास शासन नियमाप्रमाणे संपूर्ण वेतन मिळते. नुकत्याच 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आता कंत्राटी ग्रामसेवकाचे मानधन 6000 रुपयांवरून 16000 रु. करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामसेवक वेतन 2023
कंत्राटी ग्रामसेवक मानधन निर्णय

ग्रामसेवक वेतन संरचना

कंत्राटी ग्रामसेवक म्हणून काम पूर्ण केल्यानंतर ग्रामसेवकाची वेतन संरचना आणि इतर भत्ते मिळतात. ग्रामसेवकाची वेतन संरचना खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पदाचे नाव 07 व्या वेतन आयोगानुसार वेतन संरचना
ग्रामसेवक S8: 25500-81100
ग्रामसेवक वेतन 2023
अड्डा 247 मराठी अँप

ग्रामसेवक वेतन 2023 सोबत मिळणारे इतर भत्ते

जिल्हा परिषद त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

 • DA- महागाई भत्ता
 • HRA- घरभाडे भत्ता
 • TA- वाहतूक भत्ता
 • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे ग्रामसेवक पदासाठी बेसिक पे 25,500 आहे तर जवान पदाची इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 25,500
महागाई भत्ता (DA) 7905
घरभाडे भत्ता (HRA) 4590
वाहतूक भत्ता (TA) 2358
एकूण वेतन 40353

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, यात काही बदल असू शकतो.

ग्रामसेवक पदाचे जॉब प्रोफाईल (कार्ये)

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. ग्रामसेवक पदाचे जॉब प्रोफाईल (कार्ये) खालीलप्रमाणे आहेत.

 • गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे.
 • ग्रामसेवक ग्राम विकासासाठी झालेल्या खर्चाचा हिशेब ठेवतो आणि त्याचा अहवाल शासनाला देतो.
 • शासनाने बनविलेल्या शासकीय योजनेचा गावात प्रचार करणे ही देखील ग्रामसेवकाची जबाबदारी आहे.
 • ग्रामसेवक हा सरकार आणि गाव यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो.
 • गावात कोणतेही रुग्णालय, रस्ता, किंवा अशा दैनंदिन गरजासंबंधी काही समस्या असल्यास ग्रामसेवक त्याचे निराकरण करतो.
 • ग्रामसभेतील सर्व लेखी कामकाज ग्रामसेवक सांभाळतो.
 • ग्रामपंचायतीने पारित केलेल्या सर्व नोंदी ठेवणे व त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे.
ग्रामसेवक वेतन 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख 
जिल्हा परिषद भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full-Length Mock Online Test Series

Sharing is caring!

FAQs

ग्रामसेवक वेतन 2023 बद्दल मला सविस्तर माहिती कुठे मिळू शकते?

ग्रामसेवक वेतन 2023 बद्दल मला सविस्तर माहिती आपण या लेखात पाहू शकता.

ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक यातील फरक काय आहे?

उमेदवार कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होतो. त्याला 03 वर्षाचा प्रोबेशन पिरेड पूर्ण करावा लागतो. 03 वर्षाचा प्रोबेशन पिरेड पूर्ण केल्यावर कंत्राटी ग्रामसेवक पदाचे रुपांतर ग्रामसेवक पदात होते.

जिल्हा परिषद त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणते भत्ते देते?

जिल्हा परिषद त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते देते.