Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   ZP परीक्षा 2023 अपडेट

ZP Exam Update 2023 | ZP परीक्षा 2023 बद्दल अद्ययावत माहिती 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 अद्ययावत माहिती 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 अद्ययावत माहिती: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण 19460 पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर केली होती. एकूण 29 संवर्गांसाठी जाहीर झालेल्या भरती अंतर्गत आता पर्यंत 14 संवर्गातील पदांसाठी परीक्षा झाली असून उर्वरित पदांच्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही. या लेखात आपण जिल्हा परिषद परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी अद्ययावत माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

जिल्हा परिषदेची परीक्षा बद्दल रोज काही ना अपडेट्स येत आहेत. जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल अद्ययावत माहिती या लेखात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023
पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
लेखाचे नाव जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

07 ऑक्टोबर 2023 पासून

अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in
ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023
30 सप्टेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 1 07, 08, 10 आणि 11 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 2
15 आणि 17 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 3 लवकरच जाहीर करण्यात येईल
pdpCourseImg
ग्रामसेवक भरती सिलेक्शन बॅच 2023

जिल्हा परिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबद्दलची वृत्तपत्रातील बातमी

जिल्हा परिषद परीक्षेला सुरुवात दिनांक 07 ऑक्टोबर 2023 पासून झाली. सुरुवातीला 07 ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये रिंगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाच्या परीक्षा संपन्न झाल्या. तसेच नंतर 15 व 17 ऑक्टोबर 2023 रोजी कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वायरमेन, फिटर, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाच्या परीक्षा झाल्या. दिनांक 18 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),औषध निर्माण अधिकारी या पदांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या पण त्या काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या. व तसेच उर्वरित परीक्षा कधी होतील हे सांगता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाची स्थिती उत्पन्न झाली आहे. त्या बाबतची वृत्तपत्राची बातमी आपण खाली तपासू शकता.

ZP Exam Update 2023 | ZP परीक्षा 2023 बद्दल अद्ययावत माहिती _5.1

 

pdpCourseImg
जिल्हा परिषद आरोग्य सेवक बॅच

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल अद्यतने

जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गांतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. 18 ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे पेपर काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत. याआधी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती 2023 च्या परीक्षा 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार होत्या. परंतु अहमदनगर जिल्हा परिषदेने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. सध्या नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून 07 ते 11 ऑक्टोबर 2023, 15 व 17 ऑक्टोबर 2023 आणि 18 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व अद्ययावत माहिती तुम्ही काली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल अद्ययावत माहिती (7 ऑक्टोबर 2023)

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल अद्ययावत माहिती (30 सप्टेंबर 2023)

अहमदनगर जिल्हा परिषद परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस PDF (28 सप्टेंबर 2023)

पर्यवेक्षिका पदाची परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस PDF (16 ऑक्टोबर 2023)

18 ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्याची नोटीस PDF (19 ऑक्टोबर 2023)

जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय

महाराष्ट्रात एकूण 19460 रिक्त पदांच्या भरतीसाठी दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. त्यासाठी IBPS ने परीक्षेचा इंटरफेस लक्षात यावा यासाठी जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय केली आहे. या जिल्हा परिषद डेमो लिंकचा वापर करून उमेदवार जिल्हा परिषद परीक्षा 2023 मध्ये युझर इंटरफेस कसा असेल व डेमो लिंकद्वारे आपण टेस्ट कशी द्यायची याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद डेमो लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे का?

होय, जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे

जिल्हा परिषदेची परीक्षा कधी पासून घेण्यात येणार आहे?

जिल्हा परिषदेची परीक्षा 07 ऑक्टोबर 2023 च्या पासून घेण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल वेळोवेळी अपडेट मला कोठे मिळतील?

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल वेळोवेळी अपडेट आपणास या लेखात पाहायला मिळतील.