Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   ZP परीक्षा 2023 अपडेट

ZP Exam 2023 Update | ZP परीक्षा 2023 अपडेट, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उद्यापासून सुरु होणार

ZP परीक्षा 2023 अपडेट

ZP परीक्षा 2023 अपडेट: जिल्हा परिषदेचे वेळापत्रक तिसरा टप्पा, 24 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे. या जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 तिसऱ्या टप्प्यामध्ये कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी(शिक्षण), विस्तार अधिकारी(पंचायत) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. जिल्हा परिषद भरती 2023 तिसऱ्या टप्प्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा 01 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. या लेखात पदानुसार परीक्षेची तारीख, शिफ्ट्स, परीक्षेची वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण 19460 पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर केली होती. या लेखात आपण जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

जिल्हा परिषदेची परीक्षा जाहीर झाली असून जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 व जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल अद्ययावत माहिती या लेखात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023
पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
लेखाचे नाव जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

07 ऑक्टोबर 2023 पासून

अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in
ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023
30 सप्टेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 1 07, 08, 10 आणि 11 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 2
15 आणि 17 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 3 01, 02 आणि 06 नोव्हेंबर 2023
pdpCourseImg
ग्रामसेवक भरती सिलेक्शन बॅच 2023

जिल्हा परिषद परीक्षेचे भाग 3 बद्दलची बातमी 

विविध जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 भाग 1 आधीच जाहीर केले होते. या परीक्षेचे जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 भाग 2, 7 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे आणि तसेच 24 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ZP Exam 2023 Update | ZP परीक्षा 2023 अपडेट, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उद्यापासून सुरु होणार_5.1

पदानुसार जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

पदानुसार व शिफ्टनुसार जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
01 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ यांत्रिकी
शिफ्ट 2 (सकाळी 10) यांत्रिकी
शिफ्ट 3 (सायंकाळी 03) कनिष्ठ आरेखक
02 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) विस्तार अधिकारी (शिक्षण)
शिफ्ट 2 (सकाळी 10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
06 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 2 (दुपारी 1) विस्तार अधिकारी (पंचायत)

 

pdpCourseImg
जिल्हा परिषद आरोग्य सेवक बॅच

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल अद्यतने

जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गांतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. 18 ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे पेपर काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत. याआधी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती 2023 च्या परीक्षा 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार होत्या. परंतु अहमदनगर जिल्हा परिषदेने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. सध्या नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून 07 ते 11 ऑक्टोबर 2023, 15 व 17 ऑक्टोबर 2023 आणि 18 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व अद्ययावत माहिती तुम्ही काली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल अद्ययावत माहिती (7 ऑक्टोबर 2023)

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल अद्ययावत माहिती (30 सप्टेंबर 2023)

अहमदनगर जिल्हा परिषद परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस PDF (28 सप्टेंबर 2023)

पर्यवेक्षिका पदाची परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस PDF (16 ऑक्टोबर 2023)

18 ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्याची नोटीस PDF (19 ऑक्टोबर 2023)

जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय

महाराष्ट्रात एकूण 19460 रिक्त पदांच्या भरतीसाठी दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. त्यासाठी IBPS ने परीक्षेचा इंटरफेस लक्षात यावा यासाठी जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय केली आहे. या जिल्हा परिषद डेमो लिंकचा वापर करून उमेदवार जिल्हा परिषद परीक्षा 2023 मध्ये युझर इंटरफेस कसा असेल व डेमो लिंकद्वारे आपण टेस्ट कशी द्यायची याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद डेमो लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे का?

होय, जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषदेची परीक्षा तिसरा टप्पा कधी पासून घेण्यात येणार आहे?

जिल्हा परिषदेची परीक्षा तिसरा टप्पा 01 नोव्हेंबर 2023 पासून घेण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल वेळोवेळी अपडेट मला कोठे मिळतील?

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल वेळोवेळी अपडेट आपणास या लेखात पाहायला मिळतील.