Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग वेतन 2023

वन विभाग वेतन 2023, पदानुसार वेतन संरचना व जॉब प्रोफाइल तपासा

वन विभाग वेतन 2023

वन विभाग वेतन 2023: महाराष्ट्र राज्य वन विभागाने एकूण 2417 पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. वन विभाग भरती 2023 अंतर्गत लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. जे उमेदवार वन विभाग भरती 2023 ची तयारी करत असतील त्यांना वन विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करत असलेले वन विभाग वेतन 2023 याबद्दल माहिती घेण्यास उत्सुख आहेत. आज या लेखात आपण वन विभाग वेतन 2023 बद्दल माहिती पाहणार आहोत ज्यात पदानुसार वेतन संरचना, इतर भत्ते आणि पदानुसार कामाचे स्वरूप (जॉब प्रोफाईल) याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

वन विभाग वेतन 2023: विहंगावलोकन

या लेखात पदानुसार वन विभाग वेतन 2023 देण्यात आले आहे. ज्यात वेतनश्रेणी आणि इतर भत्ते याबद्दल माहिती दिली आहे. त्यासोबतच पदानुसार कोणती कर्तव्य उमेदवारास पार पडावी लागतात याबद्दल सुद्धा माहिती प्रदान करण्यात आली आहे. वन विभाग वेतन 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात मिळावा.

वन विभाग वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • लेखापाल
  • सर्वेक्षक
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे 2417
लेखाचे नाव वन विभाग वेतन 2023
वनरक्षक वेतनस्तर
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग वेतन 2023: पदानुसार वेतनश्रेणी आणि जॉब प्रोफाइल

लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. या लेखात वरील सर्व पदास किती वेतन मिळते, त्याची वेतनश्रेणी, महाराष्ट्र शासनातर्फे मिळणारे इतर भत्ते व जॉब प्रोफाइल (कामाचे स्वरूप) याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

वन विभाग वेतन 2023
अड्डा 247 मराठी अँप

वन विभाग वेतन 2023: पदानुसार वेतन संरचना

वन विभाग वेतन 2023 मधील अधिकृत अधिसूचनेनुसार सर्व पदांची वेतन संरचना 07 व्या वेतन आयोगानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे. 

पदाचे नाव वेतन श्रेणी
लघुलेखक (उच्चश्रेणी) S16: रु. 44900 ते रु. 142400
लघुलेखक (निम्नश्रेणी) S15: रु. 41800 ते रु. 132300
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S14: रु. 38600 ते रु. 122800
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक S14: रु. 38600 ते रु. 122800
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक S8: रु. 25500 ते रु. 81100
सर्वेक्षक S8: रु. 25500 ते रु. 81100
लेखापाल S10: रु. 29900 ते रु. 92300
वनरक्षक S7: रु. 21700 ते रु. 69100
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वनरक्षक वेतन 2023 सोबत मिळणारे इतर भत्ते

वन विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे वनरक्षक पदासाठी बेसिक पे 21,700 आहे तर जवान पदाची इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 21,700
महागाई भत्ता (DA) 10,710
घरभाडे भत्ता (HRA) 4,590
वाहतूक भत्ता (TA) 2,556
एकूण वेतन 39,556

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल

वन विभाग प्रामुख्याने जंगल किंवा अभयारण्याचे व्यवस्थापनाचे कार्य करत असते. अभयारण्यातील प्राण्याची, वनस्पतीची निगा राखणे हे वन विभागाचे प्रमुख कार्य आहे. वन विभागामधील सर्व पदाची कर्तव्ये खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव जॉब प्रोफाइल
लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • कार्यालयीन कामकाजाचे प्रतीलेखन करणे
  • लघुलेखन करणे
  • सर्व फाईलचा नोंदी ठेवणे
  • निम्नश्रेणी लघुलेखकाडून आवश्यक ती कार्य करून घेणे
लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कार्यालयीन कामकाजाचे प्रतीलेखन करणे
  • लघुलेखन करणे
  • वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भाषणांची नोंद करणे
  • मीटिंगच्या नोट्स तयार करणे
  • सर्व शासकीय कार्यवाही सुरळीतपणे पार पडतील याची खात्री करणे
  • आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय कामे करणे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वन विभागातील विविध साईट्स वर देखरेख ठेवणे
  • अभयारण्यातील प्रेक्षणीय स्थळाचे व्यवस्थापन करणे
  • विविध प्रकल्पात सक्रिय सहभाग घेणें
  • प्रकल्पात सहभागी असलेल्या कोणत्याही सल्लागार, उपकंत्राटदार, पर्यवेक्षक, सर्वेक्षणकर्ता आणि सामान्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधने
  • आवश्यकतेनुसार अहवाल सादर करणे
सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व डेटा सांभाळून ठेवणे
  • वनातील वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या संख्येचे विवरण करणे
  • डेटा प्रोसिसिंग करणे
वनरक्षक
  • वन्यप्राण्यांची शिकार होणार नाही याची काळजी घेणे.
  • कोणीही झाडे तोडत नाही किंवा त्यांना हानी पोहोचवू शकेल असे काहीही करत नाही याची खात्री करण्यासाठी तुम्हाला जंगलाचे बारकाईने निरीक्षण करावे लागेल.
  • जंगलात किंवा आजूबाजूला संशयास्पद हालचालींची कोणतीही चिन्हे आढळल्यास तक्रार करणे
adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 03 ऑगस्ट 2023 वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 02 ऑगस्ट 2023
वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023, (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक), 01 ऑगस्ट 2023, शिफ्ट 1)
वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (लेखापाल) 01 ऑगस्ट 2023, शिफ्ट 2  
वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (सर्वेक्षक) 31 जुलै 2023, शिफ्ट 1 वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (लेखापाल) 31 जुलै 2023, शिफ्ट 2

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

वन विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

वन विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

वन विभागातील वनरक्षक पदाची वेतनश्रेणी काय आहे?

वन रक्षक पदाची वेतनश्रेणी S7: रु. 21700 ते रु. 69100 ही आहे.

वन विभाग त्यांच्याकर्मचाऱ्यांना कोणते भत्ते देते?

वन विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते देते.