Marathi govt jobs   »   PCMC Recruitment   »   PCMC उत्तरतालिका 2023

PCMC उत्तरतालिका 2023 जाहीर, लिपिक आणि इतर पदांची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

PCMC उत्तरतालिका 2023

PCMC उत्तरतालिका 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 21 जुलै 2023 रोजी लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) रोजी PCMC उत्तरतालिका 2023 जाहीर केली. याआधी इतर सर्व पदांची उत्तरतालिका 05 जुलै 2023 रोजी उपलब्ध करून देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील एकूण 386 पदांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सदर भरती मधील सर्व पदाचे PCMC उत्तरतालिका 2023 उमेदवारांच्या खात्यात (अकाउंट) उपलब्ध करून देण्यात आली आहे. 17 जुलै 2023 रोजी राहिलेल्या उमेदवारांची परीक्षा झाल्यानंतर आता लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाची उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लेखात PCMC उत्तरतालिका 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात PCMC उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी आणि PCMC उत्तरतालिका 2023 वर काही आक्षेप असल्यात ते असे घ्यावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

PCMC उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन

PCMC उत्तरतालिका 2023 जाहीर झाली आहे. PCMC उत्तरतालिका 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

PCMC उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
भरतीचे नाव PCMC भरती 2023
लेखाचे नाव

PCMC उत्तरतालिका 2023

पदांची नावे
  • अतिरिक्त कायदा सल्लागार
  • विधी अधिकारी
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • उद्यान अधीक्षक (वृक्ष)
  • सहाय्यक उद्यान अधीक्षक
  • उद्यान निरीक्षक
  • हॉर्टीकल्चर सुपरवायझर
  • कोर्ट लिपिक
  • ॲनिमल किपर
  • समाजसेवक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • लिपिक
  • आरोग्य निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
एकूण रिक्त पदे

386

PCMC उत्तरतालिका 2023 लिंक जाहीर
अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

PCMC उत्तरतालिका 2023 नोटीस

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 26 ते 28 मे 2023 या कालावधीत झालेल्या परीक्षेची PCMC उत्तरतालिका 2023 जाहीर केली. याआधी UPSC ची परीक्षा असल्याने लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदांची उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आली नव्हती पण आता 21 जुलै 2023 रोजी सर्व पदांची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. या उत्तरतालीमधील कोणत्या प्रश्नांवर किंवा उत्तरावर काही आक्षेप असल्यास उमेदवार योग्य पुराव्यासह शुल्क (रु. 200 प्रती प्रश्न)  भरून आपण 24 जुलै 2023 पर्यंत आक्षेप घेऊ शकतात. PCMC उत्तरतालिका 2023 ची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PCMC उत्तरतालिका 2023 नोटीस (21 जुलै 2023)

PCMC उत्तरतालिका 2023 नोटीस (05 जुलै 2023)

PCMC उत्तरतालीकेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

PCMC उत्तरतालिका 2023 दिनांक 05 जुलै 2023 रोजी जाहीर झाली असून PCMC भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

PCMC उत्तरतालिका 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
PCMC भरती 2023 अधिसूचना 18 ऑगस्ट 2022
PCMC प्रवेशपत्र 2023 18 मे 2023
PCMC परीक्षा 2023 26, 27 आणि 28 मे 2023
PCMC उत्तरतालिका 2023 (इतर सर्व पदांसाठी) 05 जुलै 2023
PCMC उत्तरतालिका 2023 (लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता पदांसाठी) 21 जुलै 2023
PCMC उत्तरतालिका 2023 वर आक्षेप घेण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023
PCMC निकाल 2023 ऑगस्ट 2023

PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक जाहीर केली. उमेदवार त्यांच्या युझर आयडी आणि पासवर्ड टाकून आपली PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकतात. PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे.

PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक

नोट: आता 21 जुलै 2023 रोजी लिपिक लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदांची उत्तरतालिका उपलब्ध झाल्या आहेत. 28 मे 2023 रोजी UPSC ची परीक्षा असल्याने काही उमेदवारांना PCMC ची परीक्षा देता आली नाही त्या सर्व उमेदवारांची परीक्षा 17 जुलै 2023 रोजी घेण्यात आली असल्याने आता सर्व पदांची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली.

PCMC उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?

PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देयात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम PCMC च्या अधिकृत संकेतस्थळ @pcmcindia.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा. तेथे PCMC उत्तरतालिका 2023 वर क्लीक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लीक करा.
  • आता तुम्ही PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.

PCMC उत्तरतालिका 2023 वर आक्षेप कसा घ्यावा?

  • सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ @pcmcindia.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • ऑब्जेक्शन वर क्लीक करा.
  • योग्य पुरावा अपलोड करून आवश्यक शुल्क भरा.
  • फॉर्म सबमिट करा.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

PCMC भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
PCMC निकाल 2023 अपडेट
PCMC परीक्षा विश्लेषण 2023 (27 मे 2023) PCMC परीक्षा विश्लेषण 2023 (28 मे 2023)
PCMC भरती 2023 PCMC परीक्षेचे स्वरूप 2023
PCMC परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PCMC भरतीसाठी पुस्तकांची यादी 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

PCMC उत्तरतालिका 2023 कधी जाहीर झाली?

PCMC उत्तरतालिका 2023 दिनांक 21 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

PCMC उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?

PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स या लेखात देण्यात आल्या आहेत.

PCMC उत्तरतालिका 2023 मधील काही प्रश्नांवर आक्षेप असल्यास उमेदवार कधीपर्यंत आक्षेप घेऊ शकतात?

PCMC उत्तरतालिका 2023 मधील काही प्रश्नांवर आक्षेप घ्यायचा असल्यास उमेदवारांनी आवश्यक अर्ज शुल्क भरून 07 जुलै 2023 पर्यत घेऊ शकतात.