Table of Contents
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: दिनांक 09 सप्टेंबर 2023 रोजी शिफ्ट 1 मध्ये पशुसंवर्धन विभागाने पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. पशुधन पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण 09 सप्टेंबर 2023 रोजी शिफ्ट 1 मध्ये झालेल्या पशुधन पर्यवेक्षक पदाच्या पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात आपण 09 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 मध्ये झालेल्या पशुधन पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | पशुसंवर्धन विभाग भरती 2023 |
लेखाचे नाव | पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 |
पदाचे नाव | पशुधन पर्यवेक्षक |
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 | 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023 |
नकारात्मक गुणांकन पद्धती | लागू नाही |
परीक्षेचा कालावधी | 02 तास |
एकूण गुण | 200 |
अधिकृत संकेतस्थळ | www.ahd.maharashtra.gov.in |
पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (पशुधन पर्यवेक्षक)
पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा 2023 अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, सामान्य अभिक्षमता आणि व्यावसायिक ज्ञान या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. पशुधन पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 15 | 30 | 02 तास (120 मिनिटे) |
2 | इंग्रजी भाषा | 15 | 30 | |
3 | सामान्य ज्ञान | 15 | 30 | |
4 | सामान्य अभिक्षमता | 15 | 30 | |
5 | व्यावसायिक ज्ञान | 40 | 80 | |
एकूण | 100 | 200 |
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट
पशुधन पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 13-14 | सोपी ते मध्यम |
2 | इंग्रजी भाषा | 12-13 | सोपी ते मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 12-13 | सोपी ते मध्यम |
4 | सामान्य अभिक्षमता | 13-14 | सोपी ते मध्यम |
5 | व्यावसायिक ज्ञान | 36-37 | सोपी ते मध्यम |
एकूण | 86-91 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023
पशुधन पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षमता या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न विचारण्यात आले होते त्याचप्रमाणे व्यावसायिक चाचणी वर एकूण 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारल्या गेले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षता या सर्व विषयांची विषयानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण
पशुधन पर्यवेक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या पशुसंवर्धन विभाग परीक्षा 2023 मध्ये मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयात उतारे, विरुद्धार्थी शब्द आणि व्याकरणावर प्रश्न विचारण्यात आले होते.
- उतारा – 5 प्रश्न
- मराठी व्याकरण – 4 प्रश्न
- विरुद्धार्थी शब्द – 2 प्रश्न
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी विषयाचे विश्लेषण
पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. इंग्रजी विषयात Error detection, Synonyms, Antonyms Idioms and Phrases यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
- Error Detection – 05 Ques.
- Synonyms – 01 Que.
- Antonyms – 01 Que.
- Idioms and Phrases – 01 Que.
पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
- चालू घडामोडी – 05 प्रश्न
- स्टॅटिक जी.के – 04 प्रश्न
पशुधन पर्यवेक्षक परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य अभिक्षमता विषयाचे विश्लेषण
पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेत सामान्य अभिक्षमता या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अंकमालिका, पदावली, असमानता यावर प्रश्न विचरण्यात आले होते.
- अंकमालिका (Number Series) – 03 प्रश्न
- असमानता (Ineuality) – 04 प्रश्न
- पदावली (Simplification) – 02 प्रश्न
- बैठक व्यवस्था (Seating Arrangement) – 05 प्रश्न
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
- पशुसंवर्धन विभाग भरती 2023
- पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023
- पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |