Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Maharashtra Current Affairs 2021 for Govt...

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2 | महाराष्ट्र चालू घडामोडी 2021

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams. In this article Part 2, you will get Maharashtra Current Affairs 2021, Sports News and Award News specifically in Maharashtra which helps in your upcoming all Competitive Exams

Maharashtra Current Affairs 2021
Catagory Current Affairs
Article Name Maharashtra Current Affairs 2021
Part 2

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे, जर आपला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला या परीक्षांमध्ये सहज चांगले गुण मिळवता येतील. MPSC State ServiceMPSC Group BMPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, MHADA भरतीजिल्हा परिषद भरती या सर्व पदांचा अभ्यासक्रम पाहिला असेल तर आपल्याला लक्षात येईल की, चालू घडामोडी किती महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या परीक्षेत महाराष्ट्रातील चालू घडामोडींवर अधिक भर असतो. त्यामुळे चालू घडामोडी मध्ये महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीवर (Maharashtra Current Affairs 2021) परीक्षेत जास्त प्रश्न विचारल्या जातात. आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये Maharashtra Current Affairs 2021 वर नक्की प्रश्न येतील. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी Adda247 मराठी महाराष्ट्रातील चालू घडामोडींवर (Maharashtra Current Affairs 2021) एक लेखमलिका (Article Series) घेऊन येत आहे. Maharashtra Current Affairs 2021 Part 1 मध्ये आपण राज्य बातम्या (State News), नियुक्ती बातम्या (Appointment News) व पर्यावरण बातम्या (Environment News) बघितल्या आज या लेखात आपण 2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी (Maharashtra Current Affairs 2021 Part 2) भाग 2 बघणार आहे. ज्यात महाराष्ट्रातील महत्वपूर्ण क्रीडा बातम्या (Sports News) व पुरस्कार बातम्यांचा (Award News) समावेश आहे.

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job | 2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तर चालू घडामोडी महत्वाच्या आहेतच. सोबतच वर्तमान घडामोडींमध्ये बातम्या, माहिती, जागरुकता आणि जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन यांचा समावेश असतो – हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज दैनिक चालू घडामोडी,साप्ताहिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न व आता 2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी (Maharashtra Current Affairs 2021) घेऊन येत आहे. आज या Maharashtra Current Affairs 2021 Part 2 मध्ये जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 मधील आपण राज्य बातम्या (State News), नियुक्ती बातम्या (Appointment News), पर्यावरण बातम्या  (Environment News) पाहणार आहे. ज्याचा फायदा आपणास नक्की होईल.

Maharashtra Current Affairs 2021 – Sports News (क्रीडा बातम्या)

1. संकल्प गुप्ता हा 71 वा भारतीय ग्रँडमास्टर ठरला आहे.

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_30.1
संकल्प गुप्तां
  • सर्बियाच्या अरंडजेलोवाक येथे झालेल्या GM Ask 3 राउंड-रॉबिन स्पर्धेत 6.5 गुण मिळवून आणि दुसरे स्थान मिळवून संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रँडमास्टर बनला आहे.
  • या स्पर्धेदरम्यान नागपूरच्या संकल्प गुप्ताने 2500 एलो रेटिंगचा टप्पाही गाठला. GM खिताब मिळविण्यासाठी, खेळाडूला तीन GM मानदंड सुरक्षित करावे लागतात आणि 2,500 Elo पॉइंट्सचे थेट रेटिंग पार करावे लागते.

2. दिव्या देशमुख ही भारताची 22 वी WGM बनली.

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_40.1
दिव्या देशमुख
  • दिव्या देशमुखने 17 महिन्यांहून अधिक काळातील तिच्या पहिल्या स्पर्धेत तिचा अंतिम WGM-नॉर्म केला. तिने 5.0/9 गुण मिळवले, 2452 वर कामगिरी करून भारताची नवीनतम महिला ग्रँडमास्टर बनली. तिने या प्रक्रियेत तिचा दुसरा IM-नॉर्म देखील मिळवला. पहिले दोन WGM-नॉर्म आणि एक IM-नॉर्म फेब्रुवारी 2019 पर्यंत स्कोअर केले गेले. कोविड-19 महामारीमुळे तिला ओव्हर-द-बोर्ड स्पर्धा खेळण्याची संधी मिळण्यास विलंब झाला. गेल्या वर्षी, तिने FIDE ऑनलाइन ऑलिम्पियाड 2020 मध्ये भारतीय संघासाठी सुवर्णपदक जिंकले.

3. प्रियांका मोहिते अन्नपूर्णा पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_50.1
प्रियांका मोहिते
  • प्रियंका मोहिते ही जगातील दहावे सर्वोच्च शिखर अन्नपूर्णा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. 8,485 मीटर उंच असलेल्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या माउंट मकालूवर चढाई करणारी भारतातील पहिली महिला होण्याचा विक्रमही प्रियांकाच्या नावावर आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील 26 वर्षीय गिर्यारोहकाने मे 2019 मध्ये ही कामगिरी केली होती. गिर्यारोहण हे प्रियांकाचे बालपणीचे स्वप्न होते. याच आवडीपोटी प्रियांकाने लहानपणापासूनच महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा चढायला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी पश्चिम हिमालयातील बंदरपूंच शिखरावर चढाई केली होती. हे शिखर उत्तराखंडमध्ये आहे.

4. मुंबईतील ‘सागरकन्या’ जियाचे एकाच वेळी चार विक्रम

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_60.1
जिया राय
  • ‘सागरकन्या’अशी ओळख झालेली कुलाब्यातील जिया राय हिने आठ तास 40 मिनिटे पोहण्याचा नवा विक्रम केला आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 35 किमी.चे अंतर तिने यादरम्यान पूर्ण केले. स्वमग्नग्रस्त असलेल्या 12 वर्षीय जियाने याद्वारे एकाचवेळी चार विक्रम केले आहेत.
  • स्वमग्नग्रस्त असताना सलग 8 तास 40 मिनिटे पोहणे, 36 किमीचे अंतर जेमतेम साडेआठ तासांत पोहून पूर्ण करणे, वयाच्या जेमतेम 12 व्यावर्षी 36 किमी आणि आठ तासांहून अधिक काळ सलग पोहणे, असे चार विक्रम याद्वारे जिया राय हिने केले आहेत.

5. अद्वैत मेननची जागतिक समुद्रपर्यटन स्पर्धेसाठी निवड

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_70.1
अद्वैत मेनन
  • नेव्ही चिल्ड्रेन स्कूल’मध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अद्वैत मेनन या विद्याथ्र्याची जागतिक समुद्रपर्यटन स्पर्धेसाठी (वर्ल्ड सेलिंग चॅम्पियनशिप) निवड झाली आहे. ३० जून ते १० जुलैदरम्यान इटली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अद्वैत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
  • अद्वैतचे वडील नौदलात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती राष्ट्रीय संरक्षण अकादमी (नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी) येथे झाली होती. या वेळी अद्वैतने तेथील जवानांना समुद्रपर्यटन करताना पाहिले असता त्यालाही याविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर अद्वैतने या खेळाचे रीतसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मुंबईत आल्यानंतर नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रात त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. आतापर्यंत त्याने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिके  मिळवली आहेत.

6. मालविका बनसोडने RSL लिथुआनियन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली.

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_80.1
मालविका बनसोड
  • मालविका बनसोडने RSL लिथुआनियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले आहे. ती मुलाची नागपूर येथील असून RSL लिथुआनियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आयर्लंडच्या रचेल दरागला पराभूत केले.

2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी भाग 1

Maharashtra Current Affairs 2021 – Award News (पुरस्कार बातम्या)

7. महाराष्ट्र भूषण पुरस्कार‚ 2021

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_90.1
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  • राज्य शासनाचा 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सदस्य सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, विभागाचे सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालकांसह समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, प्रकाश आमटे, बाबा कल्याणी, संदीप पाटील, दिलीप प्रभावळकर इत्यादी सदस्य होते.
  • महाराष्ट्र सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रु. रोख व स्मृतीचिन्ह हे आहे.

8. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_100.1
रंगनाथ पठारे
  • मराठी भाषेचा प्रसार, प्रचारासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल मराठी भाषा विभागातर्फे  दिला जाणारा प्रतिष्ठेचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे.
  • श्री. पू. भागवत पुरस्कारासाठी शब्दालय प्रकाशन आणि मराठी भाषा अभ्यासक पुरस्कारासाठी डॉ. सुधीर रसाळ यांची निवड करण्यात आली आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मराठी भाषा विभागाचे अन्य पुरस्कार

  • श्री. पू. भागवत पुरस्कार – शब्दालय प्रकाशन
  • मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार – डॉ. सुधीर रसाळ
  • कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार – संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश

9. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_110.1
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला आहे. संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत, मीना मंगेशकर खडीकर यांना यंदाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
  • या वर्षी, संगीत आणि कलेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना देण्यात आला. भारतीय संगीत आणि सिने उद्योगातील समर्पित सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कार तर दीनानाध विशेष पुरस्कार ज्येष्ठ गायिका संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना देण्यात आला आहे. प्रख्यात अभिनेते प्रेम चोप्रा यानाही चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

10. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सायरस पूनावाला यांना जाहीर

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_120.1
सायरस पूनावाला
  • गभरातील कोट्यवधी नागरिकांना करोना विषाणूपासून सुरक्षित ठेवणाऱ्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे निर्माते आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • लोकमान्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र, यंदा 13 ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सकाळी साडेदहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी दिली.

11. यशवंत पंचायत राज पुरस्कार 2021

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_130.1
कोल्हापूर जिल्हा परिषद
  • यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वीतीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त या जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे 30 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि 17 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

12. गदिमा पुरस्कार जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर करण्यात आला.

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_140.1
नाना पाटेकर
  • ष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना यंदाचा म्हणजेच 2021 चा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 14 डिसेंबरला गदिमा यांची 44 वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे 14 डिसेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाना पाटेकर यांना ‘गदिमा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या गृहिणी सखी सचिव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जाहीर झाला आहे.
  • ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रज्ञा पुरस्कार नवोदित गायिका रश्मी मोघे यांना जाहीर करण्यात आला आहे. गीतरामायणकार गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांची 14 डिसेंबर रोजी 44 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 See Also

FAQs Maharashtra Current Affairs 2021

Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?

Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर  MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.

Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?

Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

Q3. महाराष्ट्र चालू घडामोडी 2021 मला कुठे पाहायला मिळेल?

Ans.महाराष्ट्र चालू घडामोडी 2021 आपणास Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईट आणि अ‍ॅउ वर वाचायला मिळेल.

Q4. Adda247 मराठी मला कोणकोणत्या स्वरुपात मला चालू घडामोडी देत असते.?

Ans. Adda247 मराठी आपणास दैनिक. साप्ताहिक व मासिक घडामोडी पुरवत असते. त्या सर्वांच्या लिंक वर दिलेल्या आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams Part 2_150.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

Why is it important to study current events for MPSC and other competitive exams?

Current affairs questions are asked in the General Knowledge section, which is asked in MPSC and other competitive exams. 8 to 10 questions are asked in the exam on current affairs.

How many months of current affairs should be studied for MPSC and other competitive examinations?

For the MPSC exam, it is necessary to study the current events of the last 1 year. And for other competitive exams, questions may be asked on current events of the last 6 months.

Where can I see Maharashtra Current Affairs 2021?

You can read Adda247 on Marathi's official website and on the app.

Adda247 Marathi In what format does it give me current affairs?

Adda247 Marathi Provides daily. weekly and monthly current affiaris.