Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतातील शेती

भारतातील शेती – स्वरूप, हरितक्रांती, जनुकीय पिके आणि नवे शास्त्रीय पर्याय: ZP भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

भारतातील शेती

भारतातील शेती: भारतातील शेतीची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून झाली. भारताच्या इतिहासात सिंधू खोऱ्यात तांदूळ आणि कापूस ही दोन पिके घेतली जात असल्याचा उल्लेख आहे. भूमिवर्ग आणि भारतीय संस्कृत ग्रंथानुसार, शेतजमीन 12 श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाने कृषी क्षेत्रात प्रचंड विकास केला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्वाचे स्थान आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण भारतातील शेती बद्दल माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील शेती: विहंगावलोकन

भारत सरकार अनेक वर्षांपासून कृषी पायाभूत सुविधांवर काम करत आहे आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सरकार कृषी क्षेत्रासाठी विविध योजना राबविते. या लेखात भारतीय शेतीच्या इतिहासापासून ते शेतीच्या नव्या शास्त्रीय स्वरूपावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

भारतातील शेती: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती 2023  व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय भारताचा भूगोल
लेखाचे नाव भारतातील शेती
लेखातील प्रमुख मुद्दे
  • शेतीचे उत्पत्तीस्थान
  • भारतातील पुरातन शेतीचे स्वरूप
  • हरितक्रांतीचा काळ
  • भारतातील महत्वाची पिके आणि संबंधित राज्य
  • जनुकीय पिकांचे नवे पर्व
  • भारतातील शेतीसाठी नवे शास्त्रीय पर्याय

भारतातील शेती: शेतीचे उत्पत्तीस्थान

जगात शेतीचा शोध साधारणत: 10000 वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात (fertile crescent) लागला. अर्थात प्रत्यक्ष शेतीला सुरवात करण्याआधीही माणूस (खरे तर स्त्रिया) त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून त्यातील खाद्ययोग्य अन्नाचे व विशेषत: बियाणांचे निरीक्षण करीत होता. पोषणमूल्य असलेली बियाणे राखून ठेवून ती दुसर्‍या वर्षीच्या हंगामात पेरता येऊ शकतात व एका बियाणाच्या पेरणीतून उगवलेल्या ताटातून कापणी किंवा तोडणीनंतर कितीतरी जास्त बियाणे गोळा करता येतात हे समजल्यावर शेतीतील अन्ननिर्मितीचे तंत्रच त्याच्या हाती आले. सुरवातीच्या काळात शेतीतंत्र हे अतिशय प्राथमिक अवस्थेत होते. हातानेच शेताची मशागत, पेरणी व इतर कामे व्हायची. पुढे गुरांच्या मदतीने शेती व्हायला लागली.

भारत-म्यानमार हा प्रदेश (भारताचा पश्चिमोत्तर भाग सोडून) देखील एक आहे. या प्रदेशात ज्यांची लागवड केली जात होती अशा ज्या 117 वनस्पतींची व्हॅव्हिलॉव्हने नोंद केली त्यात तांदूळ, तूर, मूग, उडीद, चणा, चवळी ही तृणवर्गीय कडधान्ये; वांगे, मुळा, काकडी यासारख्या भाज्या; आंबा, चिंच, संत्री, लिंबू यासारखी फळवर्गीय पिके व याशिवाय ऊस, कापूस, तीळ, करडई, ज्यूट, ताग, काळे मिरे, दालचिनी, नीळ यासारखी विविध प्रकारची महत्वाची पिके आहेत.

भारतातील शेती
अड्डा247 मराठी अँप

भारतातील पुरातन शेतीचे स्वरूप

भारतीय शेतीचे, स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा बियाणांचा वापर, मातीचे स्वास्थ टिकवून ठेवणे आणि शेतीतील जैवविविधता (विशेषत: पिकांची) असे तीन मुख्य आधार होते. या मजबूत पायावरच भारतीय शेती गेली साडेसहा हजार वर्षे टिकून राहिली. शेतीतील शाश्वतता टिकून राहण्यासाठी इतर नैसर्गिक संसाधनांचे – जसे पाणी, माती व जंगले यांचे जतन करणे गरजेचे आहे याची ग्रामस्थांना जाणीव होती व तसे करण्याची परंपरा होती. जंगलांचा शेती उत्पादनासाठी असलेला संबंध माहीत असल्यामुळे ‘ग्रामवनाची’ निगा राखण्याची जबाबदारीही गावकर्‍यांची असायची. दक्षिण भारतात (महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात देखील) गावपातळीवर तलाव राखल्या जाऊन त्यातून शेतीसाठी पाटाने पाणी देण्याची व्यवस्था होती. दर उन्हाळ्यात हंगाम संपल्यानंतर या तलावातील गाळ काढणे (व त्या सुपीक मातीचा शेतात वापर करणे) किंवा या तलावांच्या भिंतींची डागडुजी करणे ही कामे सामूहिक पद्धतीने केली जायची. पिकांचा फेरपालट व मिश्रपीक पद्धतीचा वापर हा अनुभवजन्य होता.

भारतातील शेती: हरितक्रांतीचा काळ

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांपुढे शेतीधोरण विषयक वेगळ्या प्रकारची आव्हाने होती. वाढलेल्या लोकसंख्येसाठी पुरेशा अन्न निर्मितीची समस्या तर होतीच शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगोलगच्या काही वर्षांमध्ये आलेल्या दुष्काळांचीही भर पडली. यावर उपाय भारताला अन्नधान्य निर्मितीत स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘हरितक्रांतीच्या’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे धोरण केंद्र सरकारतर्फे स्वीकारण्यात आले.

‘हरितक्रांतीच्या’ तंत्रज्ञानामध्ये जास्त उत्पादन देणारी उन्नत बियाणे, रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके अशा ‘त्रिसूत्रीचा’ समावेश होता. संकरीकरणाच्या तंत्राच्या सहाय्याने पिकांची हेक्टरी जास्त उत्पादन देणारी संकरित बियाणे तयार करण्यात आली. या तंत्रात एखाद्या पिकाच्या दोन किंवा जास्त वाणांमधील काही महत्त्वाचे गुणधर्म एकत्र आणून त्या पिकाचे नवीनच वाण तयार केल्या जाते (जसे जास्त उत्पादकता, पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद, इत्यादी). परंतु हे गुणधर्म त्या नव्या वाणाच्या केवळ एकाच पिढीपुरते एकत्र राहत असल्यामुळे व त्यापुढील पिढीत ते पुन्हा वेगवेगळे होत असल्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी बाजारातून त्या पिकाचे नवे संकरित वाण विकत घेणे आवश्यक झाले.

‘हरितक्रांतीची’ सुरवात प्रथम गहू व त्यानंतर तांदूळ या दोन महत्वाच्या धान्य पिकांपासून झाली. नंतर इतरही पिकांच्या बाबतीत या तंत्रज्ञानाचा अवलंब झाला. या तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील स्वीकारामुळे त्यानंतरच्या काळात भारतातील अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. भारताच्या हरित क्रांतीबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

भारतातील हरित क्रांती

भारतातील शेती: महत्वाची पिके आणि संबंधित राज्य

भारतातील महत्वाची पिके आणि त्यांच्याशी संबंधित राज्यांची यादी खाली देण्यात आली आहे.

पिकाचे नाव
राज्य
गहू
उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा
तांदूळ
पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तामिळनाडू
हरभरा
मध्य प्रदेश आणि तामिळनाडू
बार्ली
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान
बाजरी
महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान
ऊस
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र
खसखस
उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश
नारळ
केरळ आणि तामिळनाडू
जवस
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश
भुईमूग
आंध्र प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू
बलात्कार आणि मोहरी
राजस्थान आणि उत्तर प्रदेश
तीळ
उत्तर प्रदेश आणि राजस्थान
सूर्यफूल
महाराष्ट्र आणि कर्नाटक
कापूस
महाराष्ट्र आणि गुजरात
ज्यूट
पश्चिम बंगाल आणि बिहार
रेशीम
कर्नाटक आणि केरळ
भांग
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश
कॉफी
कर्नाटक आणि केरळ
रबर
केरळ आणि कर्नाटक
चहा
आसाम आणि केरळ
तंबाखू
गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
मिरी
केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू
काजू
केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश
आले
केरळ आणि उत्तर प्रदेश
हळद
 आंध्र प्रदेश आणि ओडिशा

भारतातील कृषी अर्थव्यवस्था

भारतातील शेती: जनुकीय पिकांचे नवे पर्व

जनुकीय अभिकीयांत्रिकी या नव्या विद्याशाखेच्या आधारे बर्‍याच सजीवांच्या पेशीमधील जनुकीय रचनेची माहिती जनुकीय आरेखनाद्वारे (genetic mapping) आता उपलब्ध होऊ लागली. या माहितीचा उपयोग करून एखाद्या सजीवातील कोणत्या जनुकाद्वारे त्या सजीवातील कोणता गुणधर्म नियंत्रित होतो हे कळू लागले आहे. तसेच एखाद्या सजीवाच्या पेशीतील पाहिजे ते जनुक दुसर्‍या सजीवाच्या पेशीतील जनुकरचनेशी जोडता येण्याचे तंत्रही आता विकसित झाले आहे. याच तंत्राचा वापर करून पिकांची नवी जनुकीय जात निर्माण केल्या जाते. अशा प्रकारे जनुकांचे स्थानांतरण वनस्पती, प्राणी अथवा सूक्ष्म जीवाणू अशा कोणत्याही एका सजीव प्रकारातील एका प्रजातीमधून (species) दुसर्‍या कुठल्याही प्रकारच्या प्रजातीमध्ये करता येऊन, ज्या प्रजातीमध्ये ते केले आहे त्या प्रजातीचे मूळ गुणधर्म आता बदलता येणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, बॅसिलस थुरीनजीएन्सीस (Bacillus thuringiensis) या जीवाणूमधील (bacterium) ‘क्राय1 एसी’ (Cry1 Ac) या नावाचे जनुक कापूस, सोयाबीन आणि मका या पिकात संस्कारित करून बीटी कापूस, बीटी सोयाबीन आणि बीटी मक्याच्या नव्या जाती निर्माण केल्या गेल्या आहेत.

भारतात सध्या तरी बीटी कापसाच्या स्वरुपात जनुकीय वाणाचा वापर सुरु आहे. मुळात बीटी वाणांसाठीचे हे तंत्रज्ञान ‘मॉंसँन्टो’ या बहुराष्ट्रीय कंपनीने विकसित करून भारतीय कंपन्यांना स्वामित्वशुल्क (royalty) घेऊन वापरायला दिले मॉंसँन्टोच्या या तंत्रज्ञानाचा वापर करून 34 देशी बियाणे कंपन्यांनी बीटी कापसाची देशभरात जवळपास 780 वाणे विक्रीला आणलीत व त्यातून दरवर्षी भरपूर नफा कमावणे सुरु आहे.

भारतीय शेतीसमोरील आव्हाने

भारतीय शेतीची आज जी कुंठितावस्था आली आहे त्यातून सुटका होण्यासाठी खालील आव्हानांचा सामना करावा लागेल.

  1. भारतातील लागवडीखालील शेतीपैकी जवळपास 65 टक्के जमीन कोरडवाहू असून ती मान्सूनमधील पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवितांना विदेशी शेतीचे प्रारूप व तंत्रज्ञान जसेच्या तसे वापरून चालणार नाही.
  2. हरितक्रांतीच्या व जनुकीय संस्कारित पिकांच्या नावे स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचा भर ‘जास्त बाह्य निविष्ठांचा वापर – जास्त उत्पादन – जास्त धोका’ या गृहितकावर आधारलेला आहे. त्यातून या बहुसंख्य गरीब शेतकर्‍यांची वाईट अवस्था झाली.
  3. संकरित बियाणे शेतकर्‍यांना दरवर्षी विकत घ्यावी लागत असल्यामुळे बियाणांच्या संदर्भात शेतकरी पूर्णपणे परावलंबी झाले आहेत. शेतकर्‍यांची बियाणांच्या बाबतीत बाजाराकडून होणारी लूट थांबविण्यासाठी जास्त उत्पादन देणार्‍या सरळ वाणांच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.
  4. आताची शेतीउत्पादन व्यवस्था शेतकर्‍याच्या कौटुंबिक गरजांची पूर्तीपेक्षा बाजाराला हव्या असलेल्या गरजा पूर्ण करण्यावर भर देते. म्हणूनच या व्यवस्थेतील पीकपद्धत शेतकरी कुटुंब, त्या घरची गुरे व शेतजमीन यांच्या सुपोषणाचा विचार करून पिकांची निवड करण्यापेक्षा बाजारात मागणी असलेल्या नगदी पिकांच्या लागवडीचा प्राधान्याने विचार करते. शेती पिकविण्यासाठी लागणार्‍या सर्व निविष्ठा तर शेतकर्‍याला बाजारातून विकत घाव्या लागतातच, शिवाय शेतमाल विकून आलेल्या पैशातून घरच्या गरजा भागविण्यासाठी पुन्हा बाजारातूनच वस्तू विकत घ्याव्या लागतात.
  5. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी सेंद्रीय शेती हीदेखील शाश्वत शेतीपद्धती असली तरी ती आजच्या काळाचे उत्तर होऊ शकत नाही. कारण पुरातन काळी कसण्यासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीचे लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाण जास्त होते. आज कमी जागेतून जास्त उत्पादन काढणे हे महत्त्वाचे आव्हान आहे.
  6. वेगवेगळया भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची सर्व जीवमात्रांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यामुळेच एखाद्या प्रजातीचे विविध वाण निसर्गात निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आपल्या देशात तांदळाचे जवळपास 1 लाखावर, तर वांग्याचे 2500 वर वाण अस्तित्वात असावेत असा अंदाज आहे. हरितक्रांतीमध्ये जास्त उत्पादन देणार्‍या केवळ निवडक वाणांचाच प्रसार करण्यात आल्यामुळे पिकांची निसर्गनिर्मित अशी कितीतरी वाणे नष्ट झालीत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

भारतातील शेतीसाठी नवे शास्त्रीय पर्याय

गेल्या शकतात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे अधिराज्य होते. आता नव्या शतकात बाजारव्यवस्था जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या नावे पुन्हा हावी होऊ पहात आहे. ही दोन्ही प्रकारची तंत्रज्ञाने पर्यावरण, जैवविविधता आणि मानवी आरोग्याला हानी पोचविणारी असल्यामुळे आज शेतीविषयक संशोधनाच्या संदर्भात जगभर रसायनांचा वापर टाळून केवळ जैविक साधनांच्या मदतीने शाश्वत पद्धतीने उत्पादन कसे घेता येईल यावर विचारमंथन व प्रयत्न सुरु आहेत. यापैकी एक दिशा आहे ती ‘परिस्थितीकीय शेतीची’ (ecological agriculture). ‘परिस्थितीकी’ (ecology) ही निसर्गातील ‘जैविक’ व ‘अजैविक’ घटकांचा आणि एखाद्या परिव्यवस्थेतील (ecosystem) विविध प्रकारच्या प्रजातींमधील परस्पर संबंधाचा समग्र रितीने अभ्यास करणारी जैवविज्ञानाची विद्याशाखा आहे. ‘परिस्थितीकीय तत्त्वांचा’ (ecological principles) शेतीविषयक संदर्भात विचार करणारी ‘कृषी परिस्थितीकी’ (agro-ecology) अशी पुन्हा एक नवी विद्याशाखा आता पुढे येत आहे. यात शेताला एक प्रकारची परिव्यवस्था समजून त्यातील वनस्पती व प्राणी यांची जैवविविधता वाढविणे, शेतीजन्य कचर्‍यातील पोषकद्रव्यांचा चक्रीय पद्धतीने (cyclic) वापर करणे, कमी-जास्त उंचीची मुळे असलेल्या पिकांची एकमेकांसोबत लागवड करून सिंचनाद्वारे दिलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जैविक पद्धतीने किडींवर व तणावर नियंत्रण करणे आदी उपायांचा अवलंब केला जातो. एकल पिकांपेक्षा बहुविध पीकपद्धतीमध्ये सर्व पिकांची मिळून ‘एकत्रित उत्पादकता’ (cumulative productivity) बरीच जास्त असते असे यात सिद्ध होते. याच तत्त्वांच्या आधारावर ‘पर्माकल्चर’ (Permaculture) ही शेतीपद्धती बिल मॉलीसन या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने विकसित केली आहे, ज्यात स्थानीय संसाधनांचा खूप कार्यक्षम वापर करून किमान जागेतून खूप जास्त उत्पादन काढता येते. आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना ही शेतीपद्धती जास्त उपयोगाची आहे.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
भौतिक राशी आणि त्यांचे एकके
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP)
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

गहू हे पिक कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात घेतल्या जाते?

भारतामध्ये गव्हाचे पीक उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने घेतले जाते.

भारतात कोणत्या पिकाचे बीटी वाणाचा वापर केल्या जातो?

भारतात बीटी कापसाच्या स्वरुपात जनुकीय वाण वाणाचा वापर सुरु आहे.

भारतीय शेतीसमोरील प्रमुख आवाहन काय आहे?

भारतातील लागवडीखालील शेतीपैकी जवळपास 65 टक्के जमीन कोरडवाहू असून ती मान्सूनमधील पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे.