Table of Contents
जिल्हा परिषद रिफंड लिंक
जिल्हा परिषद रिफंड लिंक: महाराष्ट्र ग्रामविकास विभागाने विविध संवर्गातील एकूण 19460 पदांच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर केली आहे. याआधी सुद्धा जिल्हा परिषद भरती ही 2019 आणि 2021 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्या दोन्ही भरती आता रद्द करण्यात आल्या आहेत. आता 2019 आणि 2021 मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना पैसे रिफंड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद रिफंड लिंक सुरु करण्यात आली आहे. आज या लेखात आपण जिल्हा परिषद रिफंड लिंक व रिफंडची संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती मिळवणार आहोत.
जिल्हा परिषद रिफंड लिंक: विहंगावलोकन
महाराष्ट्र ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद रिफंड लिंक सक्रीय केली आहे. त्यानुसार आता ज्या उमेदवारांनी 2019 व 2021 मध्ये अर्ज केले होते ते रिफंड साठी अर्ज करू शकतात. या लेखात जिल्हा परिषद रिफंड लिंक बद्दल माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद रिफंड लिंक: विहंगावलोकन | |
श्रेणी | अद्ययावत माहिती |
विभाग | ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | जिल्हा परिषद भरती 2023 |
लेखाचे नाव | जिल्हा परिषद रिफंड लिंक |
जिल्हा परिषद रिफंड लिंक | सक्रीय |
कोण रिफंड साठी अर्ज करू शकतात | ज्या उमेदवारांनी 2019 आणि 2021 मध्ये जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केले होते. |
अधिकृत संकेतस्थळ | www.rdd.maharashtra.gov.in |
जिल्हा परिषद रिफंड लिंक सक्रीय
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर करण्याच्या अगोदर 2019 आणि 2021 मधील जिल्हा परिषद भरती रद्द करण्याचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर करण्यात आली. तेव्हा ग्रामविकास विभागाने 2019 व 2021 मध्ये ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केले होते त्यांना रिफंड मिळेल असे घोषित केले होते त्यानुसार आता जिल्हा परिषद रिफंड लिंक सक्रीय करण्यात आली आहे. या लेखात जिल्हा परिषद रिफंड लिंक बद्दल माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद रिफंड लिंक
जिल्हा परिषद भरती 2019 व 2021 साठी उमेदवारांना प्रत्येक जिल्हा परिषदेमार्फत रिफंड दिल्या जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराजवळ आपला अप्लिकेशन आयडी किंवा अप्लिकेशन नंबर असणे आवश्यक आहे. याद्वारेच ते आपला युझर आयडी व पासवर्ड जनरेट करू शकतात. जिल्हा परिषद रिफंड लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद रिफंड लिंक (लिंक सक्रीय)
जिल्हा परिषद रिफंड मिळणवण्याची पद्धत (प्रोसेस)
जिल्हा परिषद रिफंड मिळणवण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
- सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- तुमच्या तपशील जाणून घेण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकासह लॉगिन करा
- त्यानंतर तुम्हाला आयडी व पासवर्ड मिळेल
- आयडी व पासवर्डने लॉग इन करा.
- अपडेट बटणावर क्लिक करा आणि योग्य बँक तपशीलांसह फॉर्म भरा
- OTP सह तुमचे तपशील प्रमाणीकृत करा
- तपशील जतन करण्यापूर्वी पूर्वावलोकन पृष्ठावरील तपशील सत्यापित करा
- तपशील जतन करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख
- जिल्हा परिषद भरती 2023
- जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023
- जिल्हा परिषद वेतन 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |