Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   ZP परीक्षा विश्लेषण 2023

ZP परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 2, 23 नोव्हेंबर 2023, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेचे विश्लेषण

ZP परीक्षा विश्लेषण 2023

ZP परीक्षा विश्लेषण 2023: जिल्हा परिषद 2023 भरती अंतर्गत दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुसऱ्या  शिफ्टमध्ये वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) या पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 2 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 23 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या दुसऱ्या शिफ्टचे ZP परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

ZP परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

ZP परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. ZP परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

ZP परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग जिल्हा परिषद
भरतीचे नाव ZP भरती 2023
पदाचे नाव वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)
लेखाचे नाव ZP परीक्षा विश्लेषण 2023
ZP परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2, 23 नोव्हेंबर 2023 (वरिष्ठ सहाय्यक (लिपिक))
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

ZP परीक्षेचे स्वरूप 2023

ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  

ZP परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

ZP परीक्षा 2023 ही 23 नोव्हेंबर 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. ZP पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30. ते 06.30

ZP परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

ZP भरती 2023 अंतर्गत (वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-24 सोपी
2 इंग्रजी भाषा 22-23 मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-24 मध्यम
4 बौद्धिक चाचणी 21-22 मध्यम
एकूण 85-93 मध्यम

विषयानुरूप ZP परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)

ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने उताऱ्यावरील प्रश्न, अधोरेखित जागी योग्य शब्द, वाक्यांचा योग्य क्रम लावणे इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेत विचारण्यात आलेले सर्व विभागांची माहिती खाली दिली आहे.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Passage based Questions, Phrases, Para Jumble, इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Passage based Questions – 5 Qtns
  • Synonyms
  • Antonyms
  • Phrases
  • Article
  • Fill in the blanks
  • Para Jumble – 3-4 Qtns
  • Word swapping (4 – 5 Qtns)
  • Misspelt
  • Error Detection – (4 – 5 Qtns)
  • Sentence Rearrangement

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने ज्या ZP मध्ये परीक्षा आहे त्या संबंधित प्रश्न, चालू घडामोडी वर प्रश्न, लोकसंख्या 2011 वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत

  • इमानगाव तामरपाषाणयुगीन अवशेष कोणते जिल्हा मद्ये सापडले?
  • ऋताजा भोसले हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
  • फैजपूर कोणता तालुक्यातील आहे?
  • साहित्य नोबेल 2023
  • कार्बन घन कचरा गोळा करणे त्या साथी कोणती संस्था नोडल एजन्सी म्हणुन काम करते?
  • महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना वर्ष?
  • मालदीव pm कोणाची निवड
  • महाराष्ट्रासाठी 2022-23 बजेट मध्ये किती रक्कम दिली?
  • महाराष्ट्राची ग्रामीण टक्केवारी भरतानुसार किती?
  • किती महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण केला?
  • मनुदेवी मंदिर कोणती नदी जवळ आहे?

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, बैठक व्यवस्था, अक्षरमाला, विधान व निष्कर्ष, पदावली, नफा व तोटा, शेकडेवारी इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ZP भरती 2023 संबंधित इतर लेख
जिल्हा परिषद भरती 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023  जिल्हा परिषद वेतन 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

मी ZP परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकतो?

ZP परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

ZP परीक्षा कधी घेण्यात आली?

ZP परीक्षा 23 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली?

ZP परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

ZP परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.