Table of Contents
Teacher’s Day 2022: Teachers play the biggest role in shaping one’s personality or future. Only the Teachers can give a person the understanding to choose the right path in life. Teacher’s Day 2022 is celebrated every year in India to show the importance of Teachers. In this article, you will get complete information about Teacher’s Day 2022.
Teacher’s Day 2022 | |
Category | Latest Posts |
Teacher’s Day 2022 Celebrate on | 05th September 2022 |
Birth Anniversary of | Dr. Sarvepalli Radhakrishnan |
Teacher’s Day 2022
Teacher’s Day 2022: एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाला किंवा भविष्याला योग्य वळण देण्यात शिक्षकांची सर्वात मोठी भूमिका असते. माणसाला जीवनाचा योग्य मार्ग निवडण्याची समज फक्त गुरुच देऊ शकतो. यामुळेच आपल्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो आणि त्यांना पालकांपेक्षा वरचा दर्जा दिला जातो. गुरूचे महत्त्व दर्शविण्यासाठी भारतात दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांचे संस्कृत मधील काही पंक्ती दर्शवतात त्या पुढीलप्रमाणे
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
हा विशेष दिवस शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. शिक्षक दिन भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आज या लेखात आपण Teacher’s Day 2022 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.
Teacher’s Day 2022 | शिक्षक दिन 2022
Teacher’s Day 2022: देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन म्हणून साजरी केल्या जाते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः शिक्षक होते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा काही लोकांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. यावर माजी राष्ट्रपती म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन (Teacher’s Day 2022) म्हणून साजरा करा. तेव्हापासून दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन (Teacher’s Day 2022) साजरा करण्याची प्रथा आहे. हा दिवस आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आहे. दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन (Teacher’s Day 2022) म्हणून साजरा केला जातो.
Teacher’s Day 2022: Dr. Sarvapalli Radhakrishnan | डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल महत्वाची माहिती
Teacher’s Day 2022: Dr. Sarvapalli Radhakrishnan: भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.
त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (1909-1916). म्हैसूर विद्यापीठ (1916-1921), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (1929-1931) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (1929) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (1931-1935), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (1939-1948) होते. 1949 ते 1952 पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली. अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (1927) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (1930) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. 1954 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. 1952 ते 1967 पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले. तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.
Significance of Teacher’s Day 2022 | शिक्षक दिन 2022 चे महत्त्व
Significance of Teacher’s Day 2022: भारतीय संस्कृती ही आदर्श संस्काराची शिदोरी आहे. यामध्ये गुरुंचा सन्मान अग्रभागी आहे. म्हणूनच गुरुला ब्रह्मदेवाची उपमा दिली जाते. कारण ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तशी गुरुने ज्ञानाची निर्मिती केली आहे. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे असे आपण मानतो. विद्यार्थ्यांना देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षक करतात.
‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सुध्दा विद्यार्थ्यांमध्ये रमणे आवडायचे कारण त्यांच्याकडून येणाऱ्या कल्पना, त्यांची जिद्द विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असे. आणि म्हणूनच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी येणारा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन (Teacher’s Day 2022) म्हणून साजरा केला जातो.
Teacher’s Day 2022 Theme | शिक्षक दिन 2022 ची थीम
Teacher’s Day 2022 Theme: 2022 या वर्षाच्या शिक्षक दिनाची थीम ‘Teachers:: Leading in crisis, reimaging the future’ ही आहे. ज्याचा मराठीत अर्थ संकटात नेतृत्व करणे, भविष्याची पुनर्कल्पना करणे असा होतो.
See Also
Article Name | Web Link | App Link |
Our Solar System: Formation, Planets, Facts, And Questions | Click here to View on Website | Click here to View on App |
List of Governors of Maharashtra | Click here to View on Website | Click here to View on App |
INS Vikrant in Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
List Of Chief Justice In India (CJI) 1950 To 2022 | Click here to View on Website | Click here to View on App |
FAQs: Teacher’s Day 2022
Q1. Whose birthday celebrate as Teacher’s Day 2022?
Ans. The birthday of Dr. Sarvapalli Radhakrishnan celebrate as Teacher’s Day 2022
Q2. What is the theme of Teacher’s Day 2022?
Ans. The Theme of Teacher’s Day 2022 is “Teachers:: Leading in crisis, reimaging the future”.
Q3. Why Teacher’s Day 2022 is important?
Ans. Teacher’s Day is celebrated to recognize the importance of teachers in our lives.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exam | Click Here |