Marathi govt jobs   »   Latest Post   »   Shivswarajya Din

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022

Shivswarajya Din 2022: In Maharashtra, Shivswarajya Day is celebrated on 06th June every year. Shivaji Maharaj was crowned on 06 June 1674. Shivswarajya Day is celebrated in Maharashtra to commemorate this. Shiv Rajyabhishek ceremony is celebrated every year at Raigad fort.

Shivswarajya Din 2022
Category Latest Post
Day Shivswarajya din (शिवस्वराज्य दिन)
Shivaji Maharaj Rajyabhishek 06 June 1674

Shivswarajya Din 2022

Shivswarajya Din 2022: महाराष्ट्रात दरवर्षी उत्साहात 06 जून रोजी शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा केल्या जातो. या दिवशी राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा केल्या जातो. आज या लेखात आपण Shivswarajya Din 2022 संपूर्ण महाराष्ट्रात कसा साजरा केल्या जाणार आहे, शिवस्वराज्य दिनाचे महत्व काय आहे, शिवस्वराज्य दिन कधीपासून साजरा केल्या जात आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Shivswarajya Din 2022 | शिवस्वराज्य दिन 2022

Shivswarajya Din 2022: दर वर्षी 6 जून हा महाराष्ट्रात रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो परंतु या वर्षी 6 जून 2021 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होतो. यावर्षी 6 जून 2022 रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी Shivswarajya Din साजरा होणार आहे. हा सोहळा कसा साजरा करावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रत्येक विभागास मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयात तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून उत्साहात साजरा होणार आहे.

Importance Shivswarajya Din | शिवस्वराज्य दिनाचे महत्व

Importance Shivswarajya Din: रयतेचा हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवने, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 17 व्या शतकात या महाराष्ट्रात भुमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे या महाराष्ट्र भुमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणणेसाठी सर्व जाती – धर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकूम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जाती धर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोकल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे दि. 06 जून 1674 म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन रहावे म्हणून महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करुन घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरुन घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शक कर्ते ही झाले. तो शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करुन स्वतःच्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृध्दीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता.

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022_40.1
Adda247 Marathi App

Chatrapati Shivaji Maharaj History – Birth, Establishment of Swarajya

How to Celebrate Shiv Swarajya Din 2022? | शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा?

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः चा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमी पुत्रांच्या स्वातंत्र दिनाचे महत्व आणखीन दृढ होण्यासाठी 06 जुन हा दिवस  ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यालयांमध्ये सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन (Shivswarajya Din) साजरा केल्या जातो.

शिवस्वराज्य दिन (Shivswarajya Din) साजरा करतांना गुढी व राजदंड कसा असावा याबद्दल माहिती खालीलप्रमाणे

  • ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी तसेच ध्वज हा ३ फुट रुंद व ६ फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलकृत असावा.
  • शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणुन कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा.

Shivrajyabhishekh Din 2022 | शिवराज्याभिषेक दिन 2022

Shivrajyabhishekh Din 2022: 06 जून 1674 ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. हा सोहळा तब्बल 9 दिवस चालला होता. छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानचं!शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात. शिवाजी महाराजांचा 348 वा राज्यभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा रायगड किल्यावर साजरा होत आहे. Shivrajyabhishekh Din संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. 2021 नंतर महाराष्ट्र सरकारने या दिनास Shivswarajya Din दिन म्हणून घोषित केले.

Life lessons from Shri Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji Maharaj Rajyabhishekh | शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

Shivaji Maharaj Rajyabhishekh: स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. शिवाजी महराजांनी खडतर परिश्रम व आपल्या बुद्दीचातुर्याने हे रयतेचे राज्य स्थापन केले होते. मराठा साम्राज्य हे कोणाचे अंकित नसुन एक सार्वभौम राज्य आहे हे जाहीर करणे आवश्यक होते. याच उद्देशाने महाराजांनी आपला विधिवत राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. पूर्वीच्या काळी राजाचे राज्य “राज्याभिषेक” हा विधी करूनच सुरु होत असे.

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022_50.1

असा विधी केल्यामुळे एक परंपरागत सोपस्कार पार पाडुन, अभिषिक्त हिंदू राजाचे राज्य उदयास आले आहे असा संदेश रयतेत, इतर राज्यकर्त्यांपर्यंत गेला असता. लोकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असता आणि स्वाभिमान जागृत झाला असता. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. राजगडाला राजधानीचा मान देण्यात आला. त्यामुळे सगळीकडे कसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराजांसाठी सोन्याचे रत्नजडित सिंहासन बनविण्यात आले. तसेच रत्न-माणकांचा कशिदा केलेले, मोत्यांच्या झालरी लावलेले पांढरेशुभ्र छत्र-चामर बनविण्यात आले. सेवकांनी सागराच्या आणि सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेले सुवर्णकुंभ गडावर आणले. काशीच्या गागाभट्टांचे रायगडावर आगमन झाले. राज्याभिषेक सोहळयासाठी, पंडित, राजे, सुलतान, कलावंत यांना आमंत्रण देण्यात आले.

राज्याभिषेकाच्या शुभदिनी. रायगडाच्या सभोवताली शामियाने उभारण्यात आले. गडावर अतिशय टोलेजंग असा महामंडप उभारण्यात आला. सोन्याच्या चौरंगावर शिवराय, महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. या सोहळ्यासाठी महाराजांनी खास काशीहून गागाभट्ट नावाच्या पंडितांना बोलावले. अभिषेकासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. महाराजांसाठी 52 मण सोन्याचे सिंहासन बनवले होते.  आचार्य गागाभट्ट आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पुरोहितांनी मंत्रोच्चारास प्रारंभ केला. राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. काही मंत्रोच्चार होताच गागाभट्टांनी महाराजांवर छत्र धरून गजर केला,

“क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती महाराजांचा विजय असो”

महाराजांनी या सोहळ्यापासुन छत्रपती हि उपाधी धारण केली. याच दिवसाचे स्मरण सर्वांनी करावे याच उद्देशाने महाराष्ट्रात दरवषी शिवस्वराज्य दिन (Shivswarajya Din) साजरा केल्या जातो.

Chatrapati Shivaji Maharaj Battles, Swaraj Expansion, Rajyabhishek, Governance

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022_60.1
Adda247 Marathi Telegram

FAQ: Shivswarajya Din 2022

Q1. शिवस्वराज्य दिन महाराष्ट्रात कधी साजरा केल्या जातो?

Ans: शिवस्वराज्य दिन महाराष्ट्रात दरवर्षी 06 जूनला साजरा केल्या जातो.

Q2. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

Ans: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 06 जून 1674 रोजी झाला.

Q3. महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक सोहळा 2022 कितवा आहे?

Ans: यावर्षी शिवाजी महाराजांचा 348 वा राज्यभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा रायगड किल्यावर साजरा होत आहे.

Q4. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला?

Ans: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागा भट्ट यांनी केला.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022_70.1
adda247 Prime Pack

Sharing is caring!

FAQs

When is Shivswarajya Day celebrated in Maharashtra?

Shivswarajya Day is celebrated on 06 June every year in Maharashtra.

When was Shivaji Maharaj crowned?

Shivaji Maharaj was crowned on 06 June 1674.

What is Shivrajyabhishek Sohala 2022 in Maharashtra?

This year the 348th coronation of Shivaji Maharaj (Shivrajyabhishek) is being celebrated at Raigad fort.

Who crowned Shivaji Maharaj?

Shivaji Maharaj was crowned by Gaga Bhatt.

Download your free content now!

Congratulations!

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022_90.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Shivswarajya Din 2022, शिवस्वराज्य दिन 2022_100.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.