Table of Contents
पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023
शिक्षक भरती 2023 संदर्भात एक अपडेट प्राप्त झाला आहे. शिक्षण आयुक्त श्री. सुरज मांढरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जसे कि जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगरपालिकांना लवकरच शिक्षक भरतीसाठी पोर्टलद्वारे अधिसूचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 ला थोडा विलंब होत असल्याने ही सूचना देण्यात आली आहे. तसेच पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या पदभरतीसाठी हे सर्व उमेदवार पात्र असतील असे देखील त्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिक्षक पदांची सुमारे 30000 पदांची भरती 2023 मध्ये होणार आहे. शिक्षक भरती सुरळीत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शिक्षण विभागाने PAVITRA (Portal For Visible To All Teacher Recruitment) पोर्टल 2017 मध्ये सुरु केले होते. महाराष्ट्रातील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमार्फत केल्या जाते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेने फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 ची परीक्षा IBPS मार्फत घेतली होती. ज्याचा निकाल 24 मार्च 2023 रोजी लागला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग लवकरच पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करणार आहे. आज या लेखात आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 अपडेटबद्दल माहिती पाहणार आहोत.
शिक्षक भरती अपडेट
राज्यात बहु चर्चेत असलेल्या शिक्षक भरती साठी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलद्वारे भरतीची अधिसुचना प्रसिद्ध करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत. राज्यात शिक्षक भरतीसाठी एकूण 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली असून 2 लाख 16 हजार 443 उमेदवारांनीच प्रत्यक्ष परीक्षा दिली. तसेच आत्तापर्यंत एकूण उमेदवारांपैकी फक्त 1 लाख 62 हजार 562 उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी स्व प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे. शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक डाउनलोड करण्यासठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शिक्षक भरती 2023 चे परिपत्रक(16 ऑक्टोबर 2023)
पवित्र पोर्टल काय आहे?
पवित्र पोर्टल म्हणजे काय हे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारास याबद्दल माहिती असणे क्रमप्राप्त आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती केल्या जाते. शासकीय आणि अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हायचे असल्यास आपल्याला पवित्र पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या शिक्षक संवर्गातील रिक्त पदांचा सर्व तपशील उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 (Maha TAIT 2023) परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त गुण विचारात घेतले जातात. निवड करताना उमेदवाराचा जात प्रवर्ग आणि इतर आरक्षण या बाबींचा देखील पवित्र पोर्टल वर जागांची उपलब्धता पाहून ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाते.

पवित्र पोर्टलचे फायदे
- पवित्र पोर्टल महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा पुरवते.
- अर्जासाठी पवित्र पोर्टलवर त्यांचे खाते (Account) तयार करून विद्यार्थी सहजपणे शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- आता राज्यातील शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पवित्र पोर्टलवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि विभागातील रिक्त पदांचा संपूर्ण तपशील महाराष्ट्र शिक्षण विभाग उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी पात्रता निकष
पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.
- नोंदणीसाठी, अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2023) परीक्षा दिलेली उमेदवारच नोंदणी करू शकतील.
- इयत्ता 01 ते 05 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 1) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 06 ते 08 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed / B.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 09 ते 12 साठी उमेदवाराचे B.Ed आणि Post Graduation उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी शैक्षणिक पात्रता निकष सविस्तर पणे तपासण्यासाठी खाली दिलेली PDF डाउनलोड करा.
पवित्र पोर्टल शैक्षणिक पात्रता निकष पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पवित्र पोर्टल वर रजिस्ट्रेशन कधी सुरु होईल?
विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम झाले असून प्राप्त माहितीनुसार ऑगस्ट 2023 च्या मध्ये पवित्र पोर्टल वर रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. तेव्हा महाराष्ट्रात एकूण किती पदांसाठी भरती होणार आहे याबद्दल माहिती सुद्धा जाहीर होईल.
आता पवित्र पोर्टल कोण विकसित करणार आहे?
पहिले “पवित्र प्रणाली” व्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी NIC, पुणे यांचेकडून विकसित करण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव NIC, पुणे यांचेकडून पवित्र प्रणालीचे काम आता काढून घेण्यात आले आहे. आता “पवित्र पोर्टल” अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकिय प्रणाली (Software) विकसित करण्याकरिता पात्र व अनुभवी सॉफ्टवेअर डेव्हलमेंट कंपनी मे तलिस्मा कॉर्पोरशन प्रा.लि.बेंगलुरु या संस्थेची निवड करण्यात आली आहे. लवकरच पवित्र पोर्टल विकसित होऊन सर्व उमेदवारांना पवित्र पोर्टल वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. पवित्र पोर्टल कोण विकसित करणाऱ्या कंपनीचा शासन निर्णय खाली दिला आहे.
पवित्र पोर्टल विकसित करणारी कंपनी
पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीच्या वेळेस उमेदवाराजवळ खालील कागदपत्रे पाहिजेत.
- दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी परीक्षा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- व्यावसायिक प्रमाणपत्र
- आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रमिलियर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अधिवास प्रमाणपत्र
- टी ई.टी परीक्षा प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- त्याचप्रमाणे ज्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्या महिला आरक्षणासंदर्भात लागणारी प्रमाणपत्र

Other Blogs Related to Maha TAIT 2023
- Maha TAIT Result 2023
- MahaTAIT Syllabus and Exam Pattern 2023
- MahaTAIT Previous Year Papers with Answer PDFs
- MahaTAIT Notification 2023
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |