Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   (Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021

चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 03 सप्टेंबर 2021

येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021 पाहुयात.

राष्ट्रीय बातम्या (Current Affairs for Competitive Exams)

1. महिला आणि बालविकास मंत्री यांनी न्युट्री गार्डनचे उद्घाटन केले

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_3.1
न्युट्री गार्डनचे उद्घाटन
  • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री, स्मृती जुबिन इराणी यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत (एआयआयए), नवी दिल्ली पोषण माह – 2021 ची सुरुवात करत न्यूट्री गार्डनचे [पौष्टिक उद्यान] उद्घाटन केले.
  • न्यूट्री किचन गार्डन/न्यूट्री गार्डन ही संपूर्ण वर्षभर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरांमध्ये किंवा परिसरात पौष्टिक पिके लावण्याची एक पद्धत आहे.

2. पत्रकार कल्याण योजनेचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन होणार 

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_4.1
पत्रकार कल्याण योजनेचा आढावा घेण्यासाठी समिती
  • माहिती व प्रसारण मंत्रालयाने पत्रकार कल्याण योजनेच्या (जेडब्ल्यूएस) विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्यासाठी एक 12 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या समितीचे अध्यक्ष अशोक कुमार टंडन, सदस्य, प्रसार भारती बोर्ड हे  असणार आहेत.
  • मृत्यू किंवा इतर घटनांमध्ये पत्रकारांना किंवा कुटुंबियांना मिळणारे अनुदान निश्चित करणे हे या समितीचे उद्दिष्ट आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • माहिती आणि प्रसारण मंत्री: अनुराग सिंह ठाकूर

चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021

राज्य बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

3. जम्मू काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी महिलांसाठी ‘साथ’ उपक्रमाचे उद्घाटन केले

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_5.1
‘साथ’ उपक्रम
  • जम्मू -काश्मीरमध्ये, नायब राज्यापाल मनोज सिन्हा यांनी बचत गटाच्या महिलांसाठी ग्रामीण उपक्रम प्रवेग ‘साथ’ नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे.
  • महिलांचे जीवन समृद्ध करणे आणि त्यांना सामाजिक आणि आर्थिक बाबींमध्ये स्वतंत्र आणि सक्षम बनवणे, बचत गटांशी संबंधित महिलांना मार्गदर्शन करणे आणि या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
  • या उपक्रमाचे उद्दीष्ट महिलांना त्यांच्या उद्योगाला आवश्यक कौशल्ये शिकवणे आणि त्यांचे व्यवसाय हायर ऑर्डर एंटरप्राइजेसमध्ये रूपांतरित करणे आहे.

4. लडाखने राज्य प्राणी म्हणून हिम बिबट्या, राज्य पक्षी म्हणून ब्लॅक नेकेड क्रेनची घोषणा केली

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_6.1
हिम बिबट्या आणि ब्लॅक नेकेड क्रेन
  • केंद्रशासित प्रदेश लडाखने नवीन राज्य प्राणी म्हणून हिम बिबट्या (पँथर युनिका) आणि ब्लॅक नेकेड क्रेन (ग्रस निक्रिकोलिस) ला नवीन राज्य पक्षी म्हणून घोषित केले आहे.
  • 31 ऑगस्ट 2021 रोजी केंद्रशासित प्रदेश लडाखचे उपराज्यपाल श्री राधा कृष्ण माथूर यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली.
  • पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात, ब्लॅक नेकेड क्रेन आणि काश्मीर स्टॅग (हंगुल) हे राज्य पक्षी आणि प्राणी होते.

आंतरराष्ट्रीय बातम्या (daily Current Affairs for mpsc)

5. नवीन विकास बँकेने यूएई, बांगलादेश आणि उरुग्वेला नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_7.1
नवीन विकास बँकेचे नवीन सदस्य
  • शांघाय स्थित नवीन विकास बँकेचे (एनडीबी) संयुक्त अरब अमिराती, उरुग्वे आणि बांगलादेशला नवीन सदस्य देश म्हणून मान्यता दिली आहे.
  • 2015 मध्ये ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांनी एनडीबी ची स्थापना केली.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • नवीन विकास बँकेचे मुख्यालय: शांघाय, चीन
  • नवीन विकास बँकेचे अध्यक्ष: मार्कोस प्राडो ट्रॉयजो
  • नवीन विकास बँकेचे संस्थापक: ब्रिक्स
  • नवीन विकास बँक स्थापन: 15 जुलै 2014.

Monthly Current Affairs PDF in Marathi | August 2021 | Download PDF

अर्थव्यवस्था बातम्या (Current Affairs for Competitive Exams)

6. आरबीआय एनयूई परवान्यांसाठी समिती स्थापन करणार आहे

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_8.1
एनयूई परवान्यांसाठी समिती
  • भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) श्री. वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली अर्जांची छाननी करण्यासाठी आणि नवीन अंब्रेला एंटिटी (एनयूई) परवान्यांबाबत शिफारशी देण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • एनयूईच्या व्यापक आर्थिक प्रभावापासून ते सुरक्षा जोखमीपर्यंत अशा अनेक पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी समिती जबाबदार असेल.
  • ही प्रणाली लघु आणि मध्यम उद्योग, व्यापारी आणि ग्राहकांवर केंद्रित असेल. आरबीआयने ऑगस्ट 2020 मध्ये “फायद्यासाठी एनयूई” तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तिकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता.

7. केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने अ‍ॅक्सिस बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_9.1
आरबीआयने अ‍ॅक्सिस बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 01 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या ग्राहक जाणून घ्या [नो युअर कस्टमर] (केवायसी) नियमांच्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेला 25 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी
  • अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्यालय: मुंबई
  • अ‍ॅक्सिस बँकेची स्थापना: 3 डिसेंबर 1993, अहमदाबाद.

नियुक्ती बातम्या (Daily Current Affairs for MPSC)

8. पंकज कुमार सिंह बीएसएफ चे नवीन महासंचालक 

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_10.1
पंकज कुमार सिंह
  • राजस्थान कॅडरचे 1988-बॅचचे आयपीएस अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) नवे महासंचालक (डीजी) म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते दिल्लीतील बीएसएफ मुख्यालयात विशेष डीजी म्हणून कार्यरत होते.
  • याशिवाय तामिळनाडू कॅडरचे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी संजय अरोरा यांनी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) चे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • बीएसएफची स्थापना: 1 डिसेंबर 1965
  • बीएसएफ मुख्यालय: नवी दिल्ली
  • आयटीबीपीची स्थापना: 24 ऑक्टोबर 1962
  • आयटीबीपीचे मुख्यालय: नवी दिल्ली, भारत

9. केंद्र सरकारने आरआयएनएल चे सीएमडी म्हणून अतुल भट्ट यांची नियुक्ती केली

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_11.1
आरआयएनएल चे सीएमडी म्हणून अतुल भट्ट यांची नियुक्ती
  • अतुल भट्ट यांची सरकारच्या मालकीची स्टील कंपनी राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (आरआयएनएल) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • याआधी ते सरकारी मालकीच्या सल्लागार कंपनी एमईकेओएन चे सीएमडी होते. ते पी. के. रथ यांची जागा घेतील.
  • आरआयएनएल ही विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशातील एक विशेष स्टील बनविणारी कंपनी आहे. कंपनी, राज्यात 7.3 दशलक्ष टन (एमटी) स्टील प्लांटची मालकी आणि संचालन करते.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडची स्थापना: 18 फेब्रुवारी 1982
  • राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मुख्यालय: विशाखापट्टणम.

10. पीपीके रामाचार्युलु यांची राज्यसभेचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_12.1
पीपीके रामाचार्युलु
  • राज्यसभेचे अध्यक्ष एम. वैकया नायडू यांनी राज्यसभेचे महासचिव म्हणून पीपीके रामाचार्युलु यांची नियुक्ती केली आहे. ते याधी राज्यसभा सचिवालयात सचिव या पदावर कार्यरत होते.
  • ते एम. देश दीपक वर्मा यांची जागा घेतील.
  • राज्यसभेच्या सुमारे 70 वर्षांच्या इतिहासात सचिवालयातील पदावरून वरच्या पदावर जाणारे रामाचार्युलु हे पहिले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • राज्यसभेचे अध्यक्ष: एम. व्यंकय्या नायडू
  • राज्यसभा स्थापन: 3 एप्रिल 1952
  • राज्यसभा मुदत: 6 वर्षे

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

संरक्षण बातम्या (Current Affairs for Competitive Exams)

 11. गुजरात डिफेन्स एक्स्पो 2022 चे आयोजन करणार आहे

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_13.1
डिफेन्स एक्स्पो 2022
  • पुढील संरक्षण प्रदर्शन 2022 मध्ये 10 ते 13 मार्च दरम्यान गांधीनगर, गुजरातमध्ये आयोजित होणार असल्याची मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी याची घोषणा केली.
  • या संदर्भात संरक्षण उत्पादन विभाग आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • या द्विवार्षिक कार्यक्रमात सुमारे 100 देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे. डिफेन्स एक्स्पो 2022 चे ध्येय मेक इन इंडिया च्या पुढे जाऊन मेक फॉर वर्ल्ड अर्थात संरक्षण उत्पदनाचे जागतिक केंद्र बनविणे आहे.

पुरस्कार बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 12. अलेजांद्रो प्रीटो यांना बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर 2021 पुरस्कार 

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_14.1
अलेजांद्रो प्रीटो
  • मेक्सिकन फोटोग्राफर अलेजांद्रो प्रिटो बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर (बीपीओटीवाय) 2021 चा विजेता म्हणून उदयास आला आहे.
  • त्याने यूएसए आणि मेक्सिको दरम्यानच्या काटेरी-तारांनी झाकलेल्या सीमेच्या भिंतीवर टक लावून ग्रेट रोडरोनरचे छायाचित्र टिपल्याबद्दल जिंकले आहे. जे जवळजवळ गोंधळलेल्या अवस्थेत दिसते. प्रतिमेला ‘ब्लॉक्ड’ असे शीर्षक देण्यात आले आहे.
  • द बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयरला £ 5,000 चे रोख बक्षीस दिले जाते.

13. पॉवरग्रिडने प्रतिष्ठित जागतिक एटीडी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_15.1
जागतिक एटीडी सर्वोत्कृष्ट पुरस्कार
  • पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड), भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत एक महारत्न सीपीएसयूला “असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट (एटीडी) 2021 सर्वोत्तम पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
  • जगभरातील 71 संस्थांमध्ये पॉवरग्रिड 8 व्या क्रमांकावर आहे, अशा प्रकारे हा पुरस्कार जिंकणारी एकमेव पीएसयू आहे आणि टॉप 20 मधील भारतातील दोन कंपन्यांपैकी एक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • पॉवरग्रिडची स्थापना: 23 ऑक्टोबर 1989
  • पॉवरग्रिड मुख्यालय: गुडगाव, भारत

क्रीडा बातम्या (daily Current Affairs for mpsc)

14. टोकियो पॅरालिम्पिक: अवनी लेखरा दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_16.1
अवनी लेखरा
  • अवनी लेखारा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि 445.9 गुणांसह एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
  • लेखाराने याआधी 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
  • या पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची संख्या आता 12 झाली आहे. त्याने आता दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली आहेत.

15. टोकियो पॅरालिम्पिक: प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडीत रौप्यपदक जिंकले

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_17.1
प्रवीण कुमार
  • प्रवीण कुमार 2.07 मीटरच्या आशियाई विक्रमी उंचउडीसह रौप्यपदक जिंकत भारताचा उंचउडीत चौथा पदक विजेता आणि टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये एकूण 11 वा पदक विजेता ठरला आहे.
  • या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सला सुवर्णपदक मिळाले.
  • निषाद कुमार, मरिअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांच्यानंतर टोकियो गेम्समध्ये पुरुषांच्या उंच उडीमध्ये पदक जिंकलेला प्रवीण चौथा भारतीय खेळाडू आहे.

निधन बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

16. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा खासदार चंदन मित्रा यांचे निधन

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_18.1
चंदन मित्रा यांचे निधन
  • माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन झाले. ते नवी दिल्लीतील द पायनियर वृत्तपत्राचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
  • मित्रा यांना ऑगस्ट 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले होते.
  • जून 2010 मध्ये, मित्रा मध्य प्रदेशातून भाजपकडून राज्यसभेवर दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांचा कार्यकाळ 2016 मध्ये संपला.
  • जुलै 2018 मध्ये त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले.

विविध बातम्या (Daily Current Affairs for MPSC)

17. इस्कॉन संस्थापकांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी 125 रुपयांचे विशेष नाणे अनावरण केले

(Daily Current Affairs) 2021 | 03-September-2021_19.1
इस्कॉन संस्थापकांची 125 वी जयंती
  • इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 125 रुपयांच्या विशेष स्मारक नाण्याचे आभासी पद्धतीने अनावरण केले.
  • जुलै 1966 मध्ये, प्रभुपाद यांनी कृष्ण चेतनेसाठी आंतरराष्ट्रीय सोसायटी / इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा काँशिअसनेस (इस्कॉन) ची स्थापना केली ज्याला सामान्यतः ‘हरे कृष्ण चळवळ’ म्हणून ओळखले जाते.
  • आध्यात्मिक नेते अभय चरण डे या नावाने 1 सप्टेंबर 1896 रोजी कलकत्ता येथे जन्मले आणि नंतर सन्माननीय ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणून ओळखले गेले.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!