Marathi govt jobs   »   Study Materials   »   वर्गीकरण

वर्गीकरण (Classification): संकल्पना आणि उदाहरणे: ZP परीक्षा 2023 साठी अभ्यास साहित्य

वर्गीकरण (Classification)

महाराष्ट्रातील आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 आणि इतर स्पर्धा या सर्वांची तयारी करतांना बुद्धिमत्ता चाचणी या विषयाला फार महत्व आहे. बुद्धिमत्ता चाचणीत वर्गीकरण हा घटक फार महत्वाचा असून या घटकावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. वर्गीकरण या प्रकारच्या प्रश्नात चार पर्यायातून एक वेगळा पर्याय निवडायचा असतो. या लेखात आपण वर्गीकरण(Classification) बद्दल माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वर्गीकरण: विहंगावलोकन

आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वर्गीकरण या घटकावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. या लेखात वर्गीकरण म्हणजे काय त्याचे प्रश्न कसे सोडवावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

असमानता: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता ZP व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिकचे नाव वर्गीकरण
महत्वाचे मुद्दे
  • वर्गीकरणाची संकल्पना
  • वर्गीकरणावरील उदाहरणे

वर्गीकरणाची संकल्पना

बुद्धिमत्ता चाचणीत वर्गीकरण हा एक महत्वाचा टॉपिक आहे. यात प्रामुख्याने चार पर्यायांपैकी एक पर्याय जो त्या गटात बसत नाही त्याला निवडावे लागते. समूहाच्या या भागामध्ये, एक व्यक्ती किंवा गोष्टी इतर शब्दांपेक्षा भिन्न आहेत, त्यांच्याकडे काही सामान्य गुणधर्म आहेत. वर्गीकरणात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील माहिती इतिहास, विज्ञान, वर्णमाला आणि संख्यात्मक प्रश्न यावर आधारित प्रश्न विचारल्या जातात. याचे प्रमुख तीन प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे आहेत

  • शब्द आणि लोकांमध्ये वर्गीकरण
  • अक्षरांमध्ये वर्गीकरण
  • संचामध्ये वर्गीकरण

या तीनही प्रकारचे प्रश्न खाली देण्यात आले आहे.

के के वाघ एज्युकेशन सोसायटी भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

वर्गीकरणावरील उदाहरणे

प्रकार 1: या प्रकारात चार पर्याय दिलेले असतात त्यातील वेगळा पर्याय निवडावा लागतो.
Q1. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) वकील
(b) आमदार
(c) महापौर
(d) राज्यपाल
उत्तर. (a)

स्पष्टीकरण: शेवटचे 3 पर्याय राजकारणाशी संबंधित आहेत आणि पहिला पर्याय अनुसरत नाही. म्हणून, वकील हा गटात बसत नाही.

Q2. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) लघुकोन
(b) समांतर
(c) काटकोन
(d) विशालकोन

उत्तर. (b)

स्पष्टीकरण: लघुकोन, काटकोन आणि विशालकोन हे कोणाचे प्रकार आहेत. त्यामुळे समांतर हे वेगळे आहे.

Q3. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) कानपूर
(b) अलाहाबाद
(c) वाराणसी
(d) मथुरा

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: मथुरा वगळता सर्व गंगा नदीच्या काठावर वसलेले आहेत.

प्रकार 2: मागील प्रकारात, एकच शब्द किंवा गोष्ट दिली आहे जी समान प्रकारच्या गुणधर्मांचे अनुसरण करते. या प्रकारात आपल्याकडे एक जोडी आहे, पहिला घटक दुसऱ्याशी ज्या पद्दतीने संबंधित आहे त्याच पद्दतीने इतर सुद्धा संबंधित असतात फक्त एकाचा संबंध वेगळा असतो. त्याला निवडणे आवश्यक आहे.

Q1. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) चित्रकार: गॅलरी
(b) अभिनेता: स्टेज
(c) कामगार: कारखाना
(d) विद्यार्थी: स्टेज

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: स्पष्टपणे, (d) वेगळा आहे. इतर सर्व जोड्यांमध्ये, दुसरा शब्द हे पहिल्या शब्दाचे कार्य करण्याचे ठिकाण आहे.

Q2. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) ऑर्निथोलोजि : पक्षी
(b) मायकोलॉजी : बुरशी
(c) सायाटोलॉजी : शैवाल
(d) बायोलॉजी : वनस्पतिशास्त्र

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: स्पष्टपणे, उत्तर (d) आहे. इतर सर्व जोड्यांमध्ये त्या दुसरा शब्दाचा अभ्यास म्हणजे पहिला शब्द आहे.

Q3. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) 8 – 64
(b) 9 – 81
(c) 10 – 100
(d) 11 – 131

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: पहिल्या अंकाचा वर्ग दुसरा अंक आहे. त्यामुळे पर्याय d वेगळा आहे.

प्रकार 3: या प्रकारात, जोड्या किमान 3 अंकी किंवा वस्तू दिलेल्या आहेत ज्या कोणत्याही विशिष्ट गुणधर्मासह एकमेकांशी संबंधित आहेत.

Q1. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) (3, 9, 27)
(b) (5, 25, 125)
(c) (6, 36, 216)
(d) (9, 81, 728)

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: स्पष्टपणे, (d) वेगळा पर्याय आहे, इतर पर्यायात पहिली संख्या, पहिल्या संख्येचा वर्ग, पहिल्या संख्येचा घन असा क्रम चालू आहे.

Q2. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) 5, 10, 15, 20
(b) 6, 12, 18, 24
(c) 8, 60, 10, 40
(d) 15, 30, 45, 60

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: पर्याय c अंक 8 च्या गुणोत्तरांचे अनुसरण करत नाही तर उर्वरित 1 : 2 : 3 : 4 गुणोत्तर आहे.

अड्डा 247 मराठी टेलिग्राम
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

इतर अभ्यास साहित्य
बुद्धिमत्ता चाचणी  अंकगणित
अंकमालिका
आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा अपूर्णांक व दशांश
अक्षरमालिका शेकडेवारी
वेन आकृती वेळ आणि काम
घनाकृती ठोकळे नफा व तोटा
सांकेतिक भाषा भागीदारी
दिशा व अंतर सरासरी
रक्त संबंध (Blood Relation) मसावी व लसावी
क्रम व स्थान (Order and Ranking) वर्ग / घन व त्याचे मुळ
घड्याळ (Clock) विभाज्यतेच्या कसोट्या
गणितीय क्रिया सरळव्याज सूत्र
गहाळ पद शोधणे चक्रवाढ व्याज
 बैठक व्यवस्था गुणोत्तर व प्रमाण
आकृत्या मोजणे बोट व प्रवाह 
सहसंबंध वेळ व अंतर
असमानता
 

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वर्गीकरण हा घटक कोणत्या विषयात येतो?

वर्गीकरण हा घटक बुद्धिमत्ता चाचणी या विषयात येतो.

वर्गीकरण म्हणजे काय?

वर्गीकरण या घटकातील प्रश्नात चार पर्यायातून एक वेगळा पर्याय निवडायचा असतो.