Marathi govt jobs   »   Job Notification   »   Arogya Bharati Exam 2021 Postponed

आरोग्य विभाग भरती  2021 परीक्षा पूढे ढकलली | Arogya Vibhag Bharti 2021 Exam Postponed

Arogya Vibhag Bharti 2021 Exam Postponed: आरोग्य विभाग भरती 2021 ची गट क ची परीक्षा दिनांक  25 सप्टेंबर 2021  व गट ड ची परीक्षा  परीक्षा 26 सप्टेंबर 2021  रोजी होणार होती त्यासंबंधीचे गट क चे  प्रवेशपत्र दिनांक 21 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले व गट ड चे  प्रवेशपत्र दिनांक 22 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले होते. पण ते डाऊनलोड करण्यासाठी आणि तसेच बाकी इतर अडचणी येत होत्या आणि त्यानंतर दिनांक 24 सप्टेंबर 2021 ला आरोग्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची (Arogya Vibhag Bharti 2021 Exam Postponed) घोषणा केली. आरोग्य भरती च्या परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना आणि आता परीक्षा कधी होणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.

Arogya Vibhag Bharti 2021 Exam Postponed | आरोग्य विभाग भरती  2021 परीक्षा पूढे ढकलली

Arogya Bharati Exam 2021 Postponed  | आरोग्य विभाग भरती  2021 – परीक्षा पूढे ढकलली: आरोग्य विभाग भरती  2021 ची गट क चे  प्रवेशपत्र दिनांक 21 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले व गट ड चे  प्रवेशपत्र दिनांक 22 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले होते  परंतु उमेदवारांना प्रवेशपत्र Download करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. शेवटी 22 सप्टेंबर 2021 ला वेबसाईट पूर्ववत झाली परंतु ती पण काही तांत्रिक कारणांमुळे ती काही वेळातच डाऊन झाली आणि त्याच प्रमाणे ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र Download करता आले त्यांनाही काही तांत्रिक गोष्टींचा त्रास झाला जसे की प्रवेशपत्रावर उमेदवारांचे नाव चुकीचे येणे, फोटो न येणे, सेंटरचे नाव नसणे इ. या सर्व तांत्रिक अडचणी विचारात घेता आरोग्य विभागाने  24 सप्टेंबर 2021 रोजी काही हेल्पलाईन नंबर जारी केले होते पण अडचणींचे 100% निराकरण झाले नाही. या सर्व गोष्टीचा विचार करता आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी 24 सप्टेंबर 2021 रात्री 10 वाजता परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली.

Arogya Bharati Exam Postponed 2021- Press Note  | आरोग्य विभाग भरती  2021 – परीक्षा पूढे ढकलली – प्रेस नोट 

Arogya Bharati Exam Postponed 2021  Press Note  | आरोग्य विभाग भरती  2021 – परीक्षा पूढे ढकलली – प्रेस नोट: आरोग्य विभाग भरती  2021 ची परीक्षा पुढे ढकलल्या नंतर आरोग्य विभागाने एक प्रेस नोट जारी केली होती. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवारास परिक्षेस बसण्याची संधी नैसर्गिक न्याय तत्वानुसार प्राप्त झाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार लक्षात घेता गट-क करिता दि. २५/९/२०२१ व गट-ड करिता दिनांक २६/९/२०२१ रोजी आयोजित केलेल्या लेखी परिक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आलेले आहे. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र मिळाल्याची खात्री करुनच सर्व परिक्षेचे सक्षमपणे व पारदर्शकपणे भविष्यात आयोजन करण्याच्या हेतूने हा निर्णय मा. आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन घेण्यात आलेला आहे. 

सर्व उमेदवारांना परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत विभागाकडून या निवेदनाव्दारे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-क व गट ड संवर्गाची परिक्षा लवकरच घेण्यात येईल व परिक्षेची नियोजीत तारीख सर्व उमेदवारांना कळविण्यात येईल. हा निर्णय सर्व उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावरुन, वैयक्तिक संपर्क क्रमांकावर संदेश तसेच ईमेलव्दारे अवगत करण्यात येत आहे.

प्रेस नोट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Aarogya Vibhag Bharti 2021 Admit Card Important Dates | आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र  महत्वाच्या तारखा 

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 सर्व महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

Aarogya vibhag group ‘C’ & ‘D’ 2021: Admit Card Important Dates

Events

Date

आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date)

1 सप्टेंबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’)

21 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘D’)

22 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C)

25 सप्टेंबर 2021

 जाहीर केल्या जाईल

आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D)

26 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ 2021 Exam Pattern | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

1.तांत्रिक पदासाठी

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 English 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80
  Total 100 200

2. अतांत्रिक पदासाठी 

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 English 25 50
2 मराठी 25 50
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 25 50
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 25 50
  Total 100 200
  • ज्या पदाचे शैक्षणिक अहर्ता ही पदवीधर आहे त्या पदांची परीक्षेत मराठी विषय वगळता बाकी सर्व विषय हे English मध्ये असतील  
  • गट ड पदाची परीक्षा मराठी मधून होईल.
  • गट क व ड पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Also see:

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 काहीच दिवस शिल्लक

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

म्हाडा भरती 2021: ऑनलाइन अर्ज करा

म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

FAQs Arogya Bharti 2021 Exam Postponed

Q1. आरोग्य भरती 2021 पूढे ढकलली आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 पूढे ढकलली

Q2. आरोग्य भरती 2021 च्या नव्या तारखा जाहीर झाल्या का?

Ans. आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र तारखा जाहीर झाल्या नाही.

Q3. आरोग्य भरती 2021 च्या नव्या तारखा केव्हा जाहीर होतील?

Ans. आरोग्य भरती 2021 च्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील.

Q4. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)
Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)

Sharing is caring!

FAQs

Is Arogya Bharati Exam 2021 postponed?

Yes, Arogya Bharati Exam 2021 postponed

Is new date announced for Arogya Bharati 2021?

No, New date not announced for Arogya Bharati 2021

When will Arogya Bharati 2021 exam dates declared?

Arogya Bharati 2021 exam dates declared shortly.

Where I can see all update about Arogya Bharati Exam 2021?

On Adda 247 Marathi official webside you will get all updates regarding Arogya Bharati Exam 2021