Table of Contents
तलाठी भरती 2024 अपडेट
तलाठी भरती 2024 अपडेट: महसूल विभागाने दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून सामान्यीकरण (Normalization) प्रक्रीयेबाबत माहिती जाहीर केली आहे. दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी तलाठी निकाल जाहीर झाला होता त्यात सामान्यीकरण (Normalization) मुळे काही विद्यार्थांना 200 पेक्षा जास्त मिळाले होते. त्यामुळे तलाठी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महसूल विभागाने सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती देण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या लेखात आपण तलाठी भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तलाठी भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन
तलाठी भरती 2024 अपडेट दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली. तलाठी भरती 2024 अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
तलाठी भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | तलाठी भरती 2024 अपडेट |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण रिक्त पदे | |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी उत्तरतालिका 2023 लिंक | सक्रिय |
तलाठी उत्तरतालिका 2023 | 28 सप्टेंबर 2023 |
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 | 06 डिसेंबर 2023 |
तलाठी भरती निकाल 2023 | 05 जानेवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
तलाठी भरतीशी संबंधित महत्वाच्या तारखा
महसूल विभागामार्फत तलाठी निकाल 2023 दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. तलाठी भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
तलाठी भरती 2023 अधिसूचना | 23 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 26 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जुलै 2023 |
तलाठी प्रवेशपत्र 2023 | 14 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) | 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) | 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) | 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी उत्तरतालिका 2023 | 28 सप्टेंबर 2023 |
तलाठी उत्तरतालिका 2023 आक्षेप घेण्याची तारीख | 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 |
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 | 06 डिसेंबर 2023 |
तलाठी निकाल 2023 | 05 जानेवारी 2024 |
तलाठी सामान्यीकरण (Normalization) 2024 बद्दल प्रसिद्धीपत्रक
दिनांक 15 जानेवारी 2024 महाराष्ट्र महसूल विभागाने, तलाठी भरती मध्ये झालेल्या सामान्यीकरण (Normalization) बद्दल सविस्तर माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. 05 जानेवारी 2024 रोजी जाहीर झालेल्या तलाठी भरती निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम व नाराजी आहे. तसेच बऱ्याच जणांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्या साठी स्पष्टीकरण म्हणून महसूल विभागाने हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तलाठी सामान्यीकरण (Normalization) 2024 बद्दलचे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता.
तलाठी सामान्यीकरण (Normalization) 2024 बद्दल प्रसिद्धीपत्रक PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.