Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी उत्तरतालिका 2023

तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर, रिस्पॉन्स शीट्स आणि तलाठी पेपर PDFs डाउनलोड करा

तलाठी उत्तरतालिका 2023

तलाठी उत्तरतालिका 2023: भूमी अभिलेख विभाग 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. उमेदवार त्यांच्या खात्यात लॉग इन करून आपली तलाठी उत्तरतालिका 2023  डाउनलोड करू शकतात. सोबतच या लेखात 2023 मध्ये तलाठी पदाचे काही पेपर देण्यात आले आहे. याचा उपयोग आपणास आगामी काळातील जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग आणि MIDC यासारख्या परीक्षांमध्ये होईल. याआधी अधिकृत अधिसूचना भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahabhumi.gov.in/mahabhumilink वर तलाठी उत्तरतालिका 2023 दिनांक  28 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर होईल असे जाहीर करण्यात आले होते. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. उमेदवार तलाठी उत्तरतालिका 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या फेज व शिफ्टनुसार तलाठी उत्तरतालिका 2023 अपलोड करण्यात येत आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना लॉग इन केल्यावर रिस्पॉन्स शीट दिसत नसेल त्यांना लवकरच त्यांच्या खात्यात तलाठी उत्तरतालिका 2023 उपलब्ध होईल. या लेखात तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक, तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन

तलाठी उत्तरतालिका 2023 दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली. तलाठी उत्तरतालिका 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023

लेखाचे नाव तलाठी उत्तरतालिका 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 लिंक सक्रिय
तलाठी उत्तरतालिका 2023 28 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

महसूल विभागामार्फत तलाठी उत्तरतालिका 2023 दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 28 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 आक्षेप घेण्याची तारीख 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023
तलाठी निकाल 2023 ऑक्टोबर 2023

तलाठी पेपर 2023 PDF

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 04 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. TCS ने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023  जाहीर केली. सर्व उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या आहेत. तलाठी परीक्षा 2023 अंतर्गत झालेले काही पेपर खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी पेपर 2023 PDF
तारीख शिफ्ट  पेपर डाउनलोड लिंक 
18 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
27 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी उत्तरतालिका नोटीस 2023 

महाराष्ट्रातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. त्यांना 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे.

उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास 100 रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तलाठी उत्तरतालिका नोटीस 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी उत्तरतालिका नोटीस 2023 

तलाठी उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक 

महाराष्ट्र महसूल विभाग 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रथम तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर करणार आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवार त्यांच्या खात्यात लॉगिन करून आपली उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. तलाठी उत्तरतालिका 2023 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार दिनांक 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत योग्य पुरावा सादर करून आक्षेप घेऊ शकतात. तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

नोट: सध्या काही उमेदवारांची तलाठी उत्तरतालिका 2023 त्यांच्या लॉग इन केल्यावर दिसणार नाही तर त्यांनी थोड्या वेळाने चेक करावे. फेजनुसार तलाठी उत्तरतालिका 2023 अपलोड केल्या जात आहे त्यामुळे लवकरच आपणास आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायला मिळेल.

तलाठी उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?

तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम ईमहाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ @mahabhumi.gov.in ला भेट द्या.
  • तिथे तलाठी सरळसेवा भरती 2023 या टॅब वर क्लीक करा.
  • आता ऑनलाईन लिंक वर क्लिक करा
  • नवीन पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लीक करा.
  • आता तुम्ही तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.

तलाठी उत्तरतालिका 2023 वर आक्षेप कसा घ्यावा?

तलाठी उत्तरतालिका 2023 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत अक्षेप घेऊ शकतात. तलाठी आक्षेप घेण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.

  • सर्वप्रथम  ईमहाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ @mahabhumi.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  • आता ऑनलाईन लिंक वर क्लिक करा
  • नवीन पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता Response Sheet या सेक्शन मध्ये जाऊन Objection वर क्लिक करा.
  • ज्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल त्याचा ID निवडा व पुरावा अपलोड करून रु. 100 एवढे शुल्क (प्रती प्रश्न) भरा व आक्षेप घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

नोट: आक्षेप घेण्यासाठी प्रती प्रश्न रु. 100 एवढे शुल्क लागणार आहे. त्यानंतर जर उमेदवाराने जो आक्षेप घेतला आहे तो योग्य असल्यास उमेदवारास हे शुल्क परत केल्या जाणार आहे.

तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर, 2023 मध्ये झालेले तलाठी पेपर PDF डाउनलोड करा_40.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य