Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   SBI PO परीक्षा विश्लेषण 2023

SBI PO Exam Analysis 2023 | SBI PO परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 01 नोव्हेंबर 2023, चांगले प्रयत्न आणि काठिण्यपातळी

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: बँकिंग इच्छूकांसाठी 2023 सालासाठी सर्वात महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक म्हणजेच SBI PO परीक्षा 2023 सुरू झाली आहे. 01 नोव्हेंबर 2023 साठी पहिली शिफ्ट संपली आहे. Adda247 च्या तज्ज्ञ टीमने परीक्षा दिलेल्या इच्छुकांशी संवाद साधला आणि विश्लेषण केल्यानंतर पेपरची पातळी मध्यम होती असे आपण म्हणू शकतो. येत्या शिफ्टमध्ये ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी हे विश्लेषण उपयुक्त ठरेल. या लेखामध्ये, आम्ही संपूर्ण SBI PO परीक्षा विश्लेषण 2023 वर चर्चा केली आहे.

SBI PO 2023 प्रवेशपत्र डाउनलोड 

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1, 01 नोव्हेंबर: काठिण्यपातळी

स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI PO प्रिलिम्स परीक्षा 2023 अंतर्गत 01 नोव्हेंबर 2023 रोजी पहिली शिफ्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. उमेदवारांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, पेपरची काठीण्य पातळी मध्यम होती. इच्छुक खालील तक्त्यामध्ये SBI PO परीक्षा 2023 च्या पहिल्या शिफ्टची विभागवार काठिण्यपातळी तपासू शकतात.

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: काठिण्यपातळी
विभाग  काठिण्यपातळी
तर्कक्षमता मध्यम
परिमाणात्मक योग्यता मध्यम
इंग्रजी भाषा मध्यम
एकंदरीत मध्यम 

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1, 01 नोव्हेंबर: चांगला प्रयत्न

01 नोव्हेंबर 2023 रोजी 1ल्या शिफ्टमध्ये परीक्षा देणार्‍या इच्छुकांना आता चांगले प्रयत्न जाणून घेण्याची उत्सुकता असेल. येथे, दिलेल्या तक्त्यामध्ये आम्ही SBI PO परीक्षा 2023 च्या पहिल्या शिफ्टसाठी सरासरी चांगले प्रयत्न विभागवार तसेच एकूण दिले आहेत.

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: चांगला प्रयत्न
विभाग  चांगले प्रयत्न
तर्कक्षमता 24-27
परिमाणात्मक योग्यता 20-23
इंग्रजी भाषा 21-24
एकंदरीत 65-74

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1, 01 नोव्हेंबर: विभागवार विश्लेषण

SBI PO परीक्षा 2023 मध्ये, 3 विभागांमधून प्रश्न विचारले गेले: तर्कक्षमता (Reasoning Ability), परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude) आणि इंग्रजी भाषा (English Language). एकूण 100 प्रश्न, परिमाणात्मक योग्यता आणि तर्कक्षमता या विषयातील प्रत्येकी 35 आणि इंग्रजी भाषेतील 30 प्रश्न परीक्षेत समाविष्ट होते. उमेदवारांनी तिन्ही विषयांसाठी विभागवार विश्लेषणासह अद्यतनित केले पाहिजे.

MPSC गट ब मुख्य परीक्षा अधिसूचना 2023
Adda247 Marathi Application

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: तर्कशक्ती

तर्कक्षमता विभागात, 30 गुणांसाठी 35 प्रश्न विचारण्यात आले होते जे इच्छुकांना 20 मिनिटांच्या कालावधीत सोडवावे लागले. तर्कक्षमता विभागात कोडे या घटकावरील प्रश्नांचे वर्चस्व होते जे उमेदवारांना अवघड वाटले. येथे दिलेल्या तक्त्यामध्ये, आम्ही अनेक प्रश्नांसह विषयांची संपूर्ण यादी नमूद केली आहे.

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: तर्कशक्ती
विषय प्रश्नांची संख्या
Parallel Row Seating Arrangement- 8 Person 5
Circular Seating Arrangement- 6 Persons 5
Floor Based Puzzle 5
Month Based Puzzle 5
Chinese Coding-Decoding 4
Syllogism 3
Comparison Based Puzzle- 6 Person 3
Blood Relation 3
Pair Formation 1
Word Formation 1
Total 35

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: परिमाणात्मक योग्यता

SBI PO प्रिलिम्स परीक्षा 2023 च्या पहिल्या शिफ्टमधील परिमाणात्मक योग्यता विभागाची एकूण पातळी मध्यम होती. अंकगणिताचे काही प्रश्न अवघड आणि वेळखाऊ होते. SBI PO प्रीलिम्स परीक्षा 2023 मध्ये विचारलेल्या परिमाणात्मक योग्यता चे विषयवार विश्लेषण उमेदवार खालील तक्त्यामध्ये तपासू शकतात.

 SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: परिमाणात्मक योग्यता
विषय प्रश्नांची संख्या
Quadratic Equation 5
Caselet DI 6
Arithmetic (SI & CI, Mensuration, Boat & Stream, Average, Profit & Loss, Partnership) 9
Tabular Data Interpretation 5
Line Graph Data Interpretation 5
Missing Number Series 5
Total 35

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी भाषा

इंग्रजी भाषेतील जास्तीत जास्त प्रश्न रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे होते. 01 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या SBI PO परीक्षा 2023 च्या पहिल्या शिफ्टमध्ये या विभागाची एकूण पातळी मध्यम होती. टेबलमध्ये, आम्ही इंग्रजी भाषेच्या संपूर्ण विश्लेषणाची चर्चा केली आहे.

SBI PO परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी भाषा
विषय प्रश्नांची संख्या
Reading Comprehension (Pink Tax) 9
Error Detection 5
Filler 4
Word Swap 4
Word Usage- ‘State’ 1
Column Based 2
Parajumble 5
Total 30
SBI PO Exam Analysis 2023 | SBI PO परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 01 नोव्हेंबर 2023, चांगले प्रयत्न आणि काठिण्यपातळी_4.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SBI PO प्रिलिम्स शिफ्ट 1 परीक्षेची एकूण काठिण्यपातळी काय आहे?

SBI PO प्रिलिम्स 1ल्या शिफ्ट परीक्षेची एकूण काठिण्यपातळी मध्यम होती.

SBI PO प्रीलिम्स परीक्षा 2023 साठी एकूण किती चांगले प्रयत्न आहेत?

SBI PO प्रिलिम्स परीक्षा 2023 साठी एकूण चांगले प्रयत्न 59-66 आहेत.

मला SBI PO प्रीलिम्स परीक्षा 2023 विश्लेषण कोठे मिळेल?

SBI PO प्रीलिम्स परीक्षा 2023 विश्लेषण या लेखात सविस्तरपणे दिले आहे.