Table of Contents
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक जाहीर
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक जाहीर: महाराष्ट्र शासन, पोलीस विभागाने दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक जाहीर केले आहे. सदर वेळापत्रक हे वैद्यकीय चाचणी करिता जाहीर झाले असून 17 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. या लेखात मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक: विहंगावलोकन
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रकचे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
कार्यालय | महाराष्ट्र शासन- पोलीस विभाग |
लेखाचे नाव | मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेळापत्रक |
पदाचे नाव | पोलीस शिपाई |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अधिकृत संकेतस्थळ | https://mumbaipolice.gov.in/ |

मुंबई पोलीस शिपाई भरती 2021: महत्त्वाच्या तारखा
इच्छुक आणि पात्र उमेदवार मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 च्या सर्व महत्त्वाच्या तारखा खालील तक्त्यामध्ये पाहू शकतात.
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021: महत्त्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 कागदपत्र पडताळणी सूचना | 21 ऑगस्ट 2023 |
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 कागदपत्र पडताळणी | 21 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 |
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणी सूचना | 03 नोव्हेंबर 2023 |
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणी | 17 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2023 |
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीची तारीख अधिकृत सूचना
महाराष्ट्र शासन, पोलीस विभागाने दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीची तारीख अधिकृत सूचना जाहीर केली आहे. सदर सूचनेत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीची तारीख अधिकृत सूचना डाउनलोड करू शकतात.
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीची तारीख अधिकृत सूचना
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणी: पत्ता
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर वेळापत्रकातील तारखेप्रमाणे उपस्थित राहावे.
पत्ता: पोलीस शल्य चिकित्सक, पोलीस रुग्णालय, नागपाडा, मुंबई- 400008
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय चाचणीसाठी येताना खाली दिलेली कागदपत्रे सोबत बाळगावी.
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- आधार कार्ड/ पॅन कार्ड/ निवडणूक आयोग ओळखपत्र/वाहन परवाना या पैकी एक ओळखपत्र
- लेखी परीक्षा प्रवेश/आवेदन अर्जाची प्रत
- आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे मुल कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सोबत आणावीत.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
