Table of Contents
India’s Tokyo Olympic Performance at a Glance, In this article you will get detailed information of India’s Tokyo Olympic Performance at a Glance. Information about sportsperson who won medals in Tokyo Olympic 2021.
India’s Tokyo Olympic Performance at a Glance | |
Category | Study Material |
Exam | MPSC Group B and Group C Exam |
Subject | Current Affairs |
Name | India’s Tokyo Olympic Performance at a Glance |
India’s Tokyo Olympic Performance at a Glance
India’s Tokyo Olympic Performance at a Glance: MPSC गट ब व MPSC गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने चालू घडामोडी हा खूप महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडी हा विस्तृत विषय असून याचे जेवढे वाचन तेवढे चांगले. India’s Tokyo Olympic Performance at a Glance हा घटक चालू घडामोडी (Current Affairs) मध्ये येतो. चालू घडामोडी मध्ये क्रीडाविषयक बातम्या यावर प्रश्न विचारल्या जातात. Olympic दर चार वर्षांनी होतो. त्यामुळे याबद्दल माहिती असणे फार आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत यावर्षी कोणत्या शिलेदाराने (Sports Person) कोणते पदक मिळवले यासारखे प्रश्न परीक्षेत विचारल्या जातात. आज या लेखात आपण परीक्षेच्या दृष्टीने India’s Tokyo Olympic Performance at a Glance बद्दल अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहे.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर
India’s Tokyo Olympic Performance at a Glance | भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात
India’s Tokyo Olympic Performance at a Glance (भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात): जुलै 2020 ते ऑगस्ट 2020 या काळात नियोजित करण्यात आलेले टोकियो ऑलिम्पिक कोव्हीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले होते. नंतर हे ऑलिम्पिक 23 जुलै 2021 ते 08 ऑगस्ट 2021 या कालावधीत टोकियो मध्ये भरविण्यात आले. ही आधुनिक ऑलिम्पिकची 32 वी आवृत्ती होती. पॅरिसमध्ये झालेल्या सन 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने प्रथमच सहभाग घेतला होता. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 2020 च्या उद्घाटन समारंभात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम हे भारताचे ध्वजधारक होते. तर समापन सोहळ्याच्या समयी बजरंग पुनिया भारताचा ध्वजधारक होता. आजपर्यंत, 2020 टोकियो उन्हाळी ऑलिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 ऑलिम्पिक पदक जिंकण्याची भरीव कामगिरी केली. तर भारतीय गोल्फपटू आदिती अशोक, कुस्तीपटू दीपक पुनिया, भारतीय महिला हॉकी संघ यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. 7 पदकांसह भारत एकूण पदकांच्या यादीत 33व्या तर सुवर्णपदक विजेत्यांनुसार 48व्या स्थानावर आहे आणि स्वतंत्र भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 18 क्रीडा विषयांमध्ये 126 खेळाडूंसह, भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली सर्वात मोठा संघ पाठवला होता. भारतीय खेळाडूंनी एकूण 69 स्पर्धांमध्ये भाग घेतला, जो देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च आहे.
भारताचे सात ऑलिम्पिक पदकवीर खालीलप्रमाणे:
1. सुवर्णपदक (विजेता: नीरज चोप्रा. खेळ- भालाफेक)
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 87.58 मी लांब भाला फेकत सुवर्णपदक पक्के केले हे भारताचे अॅथलेटिक्स मध्ये पहिले तर वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आहे. झेक प्रजासत्ताकचा विटेझालाव वेस्लेने रौप्यपदक जिंकले.
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये बद्दल माहिती पहायासाठी येथे क्लिक करा.
2. रौप्यपदक (विजेती: मीराबाई चानू. खेळ- भारोत्तलन)
भारोत्तलनपटू मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत चीनच्या झिहुई हौने सुवर्णपदक जिंकले तर इंडोनेशियाच्या कान्टिका ऐसाने कांस्यपदक जिंकले. कर्णम मल्लेश्वरी नंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी चानू केवळ दुसरी भारतीय भारोत्तलनपटू आहे.
3. रौप्यपदक (विजेता: रवी कुमार दहिया. खेळ- कुस्ती)
भारतीय कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदक जिंकले रशियन ऑलिम्पिक समितीच्या (आरओसी) झावर उगुएवकडून पराभूत झाल्यानंतर त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केडी जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्यानंतर रवी कुमार ऑलिम्पिक व्यासपीठावर स्थान मिळवणारे पाचवे भारतीय कुस्तीपटू आहेत.
महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22
4.कांस्यपदक (विजेती:पीव्ही सिंधू. खेळ- बॅडमिंटन महिला एकेरी)
भारतची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने 01 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी स्पर्धेत चीनच्या ही बिंगजियाओला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. या विजयासह वैयक्तिक स्पर्धांमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी तिने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव
5. कांस्यपदक (विजेती: लोव्हलिना बोर्गोहेन. खेळ- बॉक्सिंग)
भारतीय बॉक्सर, लवलिना बोर्गोहेनने बॉक्सिंग मध्ये कांस्यपदक जिंकले.महिलांच्या वेल्टरवेट (69 किलो) उपांत्य फेरीत ती तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीकडून पराभूत झाल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारपथार गावातील 23 वर्षीय लोव्हलिनाने नऊ वर्षांत भारतीय बॉक्सिंगमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले.
6. कांस्यपदक (विजेता: बजरंग पुनिया. खेळ- कुस्ती)
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या दौलेट नियाजबेकोव्हवर 8-0 ने विजय मिळवल्यानंतर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कुस्तीत कांस्यपदक जिंकले आहे. केडी जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक आणि रवी कुमार दहिया यांच्यानंतर ऑलिम्पिक व्यासपीठावर स्थान मिळवणारा पुनिया सहावा भारतीय कुस्तीपटू ठरला.
7. कांस्यपदक (विजेता: भारतीय संघ. खेळ- पुरुष हॉकी)
भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला 5-4 असे पराभूत करत 41 वर्षांनी पहिले ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. या पूर्वी, भारताने 1980 मध्ये शेवटचे ऑलिम्पिक 8 वे सुवर्णपदक जिंकले होते. ओई हॉकी स्टेडियमवर सिमरनजीत सिंगने भारतासाठी दोन गोल केले, त्यासोबत हार्दिक सिंग, हरमनप्रीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनीही गोल डागले.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील भारताची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. एकूण 7 पदकांसह ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. असे असले तरी विशेषतः नेमबाजी मध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या स्पर्धेत भारताने गोल्फ आणि घोडे स्वारी या सारख्या भारताला तुलनेने नवख्या असलेल्या खेळांमध्ये चांगली कामगिरी केली ही आणखी एक जमेची बाजू. 2024 साली पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत यापेक्षाही उत्तम कामगिरी करेल अशी आशा संपूर्ण देशाला आहे. थोड्याच दिवसात टोकियोत पॅरालंपिक स्पर्धा होणार आहेत. याही स्पर्धेत उत्तम कामिगिरी करण्याची भारताला संधी आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सर्व खेळाडूंचे आणि विजेत्यांचे Adda 247 मराठी तर्फे हार्दिक अभिनंदन आणि टोकियो पॅरालंपिक मध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा.
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
Latest Posts:
RBI Assistant Notification 2022 Out for 950 Posts
MPSC PSI Departmental Exam 2022 Notification Out
SPMCIL Mumbai Recruitment 2022
FAQs: India’s Tokyo Olympic Performance at a Glance
Q1. टोकियो ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिम्पिकची कितवी आवृत्ती आहे?
Ans. टोकियो ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिम्पिकची 32 वी आवृत्ती आहे
Q2. टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये कोणती भारतीय महिला जिम्नॅस्ट भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
Ans. टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये कोणती भारतीय महिला जिम्नॅस्ट भारताचे प्रतिनिधित्व प्रणिती नायर हिने केले
Q3. पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले?
Ans. पुरुष हॉकी संघाने कस्य पदक जिंकले
Q4. नीरज चोप्रा ने कोणत्या खेळत सुवर्ण पदक जिंकले?
Ans. नीरज चोप्रा ने भालाफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकले.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो