चांगली बातमी: 2 लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणार्या सर्व उमेदवारांसाठी चांगली बातमी आली आहे. राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून 2 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी 1 लाख 41 हजार 329 पदे सरळ सेवेने, तर 58 हजार 864 पदे पदोन्नतीने भरायची आहेत. या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया कधी होणार याची राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना प्रतीक्षा आहे. शासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर सुरेश गज्जलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग एक ते वर्ग चारच्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता.
शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून रिक्त पदांचा तपशील
- अ वर्ग (Group-A)- 11545
- ब वर्ग (Group-B)-20999
- क वर्ग (Group-C)-127705
- ड वर्ग (Group-D)-40944
तर तुम्ही तुमची तयारी चालूच ठेवा कारण या सर्व पदांची भरती लवकरच एकसाथ येऊ शकतात. मग नंतर अभ्यासाचा फक्त गोन्धळ होईल सर्व भरती सूचना एकसाथ निघाल्यावर. तुमच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करा. आता Adda247 मराठी सोबत तुमची सर्व तयारी मराठीतून करा आणि तुमचं सरकारी नोकरीच स्वप्न पूर्ण करण्यास आमची साथ घ्या.
——————————————————————————————————
पोलीस उपनिरीक्षक (PSI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus
महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern
महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi
App- Adda247 (मराठी भाषा)
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)