Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 15 आणि 16 ऑगस्ट 2021
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 15 आणि 16 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.
राष्ट्रीय बातम्या(Current Affairs for mpsc)
1. 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन 2021

- भारत 15 ऑगस्ट 2021 रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिन “आजादी का अमृत महोत्सव” म्हणून साजरा करत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून या उत्सवाचे नेतृत्व करत राष्ट्राला संबोधित केले. हे पंतप्रधान म्हणून त्यांचे हे आठवे भाषण आहे.
- प्रथमच, पंतप्रधानांनी ध्वज फडकवल्यावर, अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय वायुसेनेच्या दोन एमआय-17 1व्ही हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
- केंद्र सरकारने ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकलेल्या 32 खेळाडूंना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (एसएआय) च्या दोन अधिकाऱ्यांना लाल किल्ल्यावर आमंत्रित केले होते.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल काही दुर्मिळ तथ्ये:
- नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता‘ या गाण्याचे ‘जन गण मन‘ असे नामकरण करण्यात आले आणि 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.
- लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाताच्या पारसी बागान चौकात फडकवण्यात आला. भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाचे पहिले रूप 1921 मध्ये स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकया यांनी डिझाइन केले होते. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग आणि मध्यभागी अशोक चक्र असलेला वर्तमान ध्वज अधिकृतपणे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकवण्यात आला.
- भारतासह इतर पाच देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरे करतात. ते आहेत बहारीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि लिकटेंस्टाईन.
- केवळ कर्नाटकातील धारवाड येथे असलेल्या कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाला (केकेजीएसएस) भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा अधिकार आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) नुसार, ध्वज केवळ हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या कापसाच्या खादीच्या वाफिंगसह तयार केला जातो.
- भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोवा ही पोर्तुगीज वसाहत होती. भारतीय लष्कराने गोवा 1961 मध्ये भारताशी जोडले होते. अशा प्रकारे, गोवा हे भारतीय प्रदेशात सामील होणारे शेवटचे राज्य होते.
2. ई-स्टडी व्यासपीठ “तपस”

- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सामाजिक संरक्षण क्षेत्रात चित्रित व्याख्याने/अभ्यासक्रम आणि ई-अभ्यास सामग्री प्रदान करण्यासाठी टीएपीएएस (उत्पादकता आणि सेवा वाढविण्यासाठी प्रशिक्षण – ट्रेनिंग फॉर ऑग्यूमेंटिंग प्रोडक्टिव्हीटी अँड सर्व्हिसेस) नावाचे एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स (एनआयएसडी), सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा टीएपीएएस हा उपक्रम आहे. हा अभ्यासक्रम कोणीही घेऊ शकतो आणि तो विनामूल्य आहे.
सध्या टीएपीएएस अंतर्गत 5 अभ्यासक्रम आहेत:
- उत्तेजक पदार्थ व्यसन प्रतिबंध,
- वृद्ध/वृद्धांची काळजी,
- स्मृतिभ्रंश लोकांची काळजी आणि व्यवस्थापन,
- तृतीयपंथीयांच्या समस्या
- सामाजिक संरक्षण समस्यांवर एक व्यापक अभ्यासक्रम
(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 14 August 2021
3. एमओएचयुए ने ‘सोनचिरीया’ सुरु केले

- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने शहरी स्वयं-सहाय्यता गटांच्या (एसएचजी) उत्पादनांच्या विपणनासाठी ‘सोनचिरीया‘ या ब्रँड आणि लोगोचे अनावरण केले.
- शहरी एसएचजी उत्पादने लोकप्रिय करण्यासाठी, मंत्रालयाने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टल्ससह महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार केले आहेत.
4. भारतातील पहिली गुरांची जीनोमिक चीप “इंडिगौ”

- डॉ जितेंद्र सिंह यांनी गीर, कांकरेज, साहिवाल, ओंगोले इत्यादी देशी जनावरांच्या शुद्ध जातींच्या संवर्धनासाठी भारताची पहिली गुरांची जीनोमिक चीप ‘इंडिगौ’ चे अनावरण केले.
- ही चीप जैवतंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्थेच्या, हैदराबाद (एनएआयबी) शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.
5. ‘ऑपरेशन ब्लू फ्रीडम’

- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातून ‘ऑपरेशन ब्लू फ्रीडम’ नावाच्या जागतिक विक्रम उत्सुक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.
- ऑपरेशन ब्लू फ्रीडम मोहिमेमध्ये देशभरातील दिव्यांग लोकांचा एक संघ सियाचिन हिमनदीवर चढाई करत जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर पोहोचणाऱ्या दिव्यांग लोकांच्या सर्वात मोठ्या संघाचा नवीन विश्व विक्रम स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट मधील साप्ताहिक चालू घडामोडी
6. 2047 पर्यंत ‘ऊर्जा स्वावलंबी’ होण्याचे भारताचे लक्ष्य

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 सालापर्यंत ‘ऊर्जा स्वावलंबी देश’ बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- यासाठी पंतप्रधानांनी ‘मिशन सर्कुलर इकॉनॉमी-वर्तुळाकृती अर्थव्यवस्था अभियान’ ची घोषणा केली आहे जी 2047 पर्यंत भारताला ऊर्जा उत्पादनात स्वावलंबी बनवण्यासाठी पेट्रोलियमची जागा इतर उर्जा स्त्रोत घेतील.
- मिशन सर्कुलर इकॉनॉमीमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, गॅस-आधारित अर्थव्यवस्था, पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग आणि देशाला हायड्रोजन उत्पादनाचे केंद्र बनवणे यांचा समावेश असेल.
- मोदी सरकारने भारताला एक नवीन जागतिक केंद्र आणि हरित हायड्रोजनचे निर्यातदार बनवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन अभियान सुरु केले आहे.
राज्य बातम्या(daily Current Affairs for mpsc)
7. भारतातील पहिली ड्रोन न्यायसहायक प्रयोगशाळा केरळमध्ये

- केरळमध्ये भारतातील पहिले ड्रोन न्यायसहायक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र सुरू झाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन केरळ राज्य पोलीस सायबरडोम येथे राज्य पोलीस विभागाच्या ‘ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळे’चे उद्घाटन केले.
- सायबरडोम हे केरळ पोलीस विभागाचे तांत्रिक संशोधन आणि विकास केंद्र आहे. हे केंद्र अनधिकृत ड्रोनवर लक्ष ठेवण्यास आणि पोलिस दलाच्या वापरासाठी ड्रोनच्या निर्मितीसाठी मदत करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- केरळचे मुख्यमंत्री: पिनाराई विजयन
- केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान
8. काझीरंगा-सॅटेलाईट फोन असलेले पहिले राष्ट्रीय उद्यान

- आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (केएनपी) सॅटेलाईट फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे.
- आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना 10 बीएसएनएल ची सेवा असणारे सॅटेलाईट फोन सुपूर्द केले. सॅटेलाईट फोन उद्यानात शिकारविरोधी उपायांना चालना देतील.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
- आसामचे मुख्यमंत्री: हिमंत बिस्वा सरमा
- आसामची राजधानी: दिसपूर
आंतरराष्ट्रीय बातम्या(Current Affairs for mpsc)
9. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी पायउतार

- तालिबानी सैन्याने राजधानी काबूल शहर ताब्यात घेतल्यानंतर अफगाण सरकारने बिनशर्त शरणागती पत्करली आहे आणि राष्ट्रपती अशरफ घनी लवकरच आपला राजीनामा देऊन सरकारची सर्व सूत्रे तालिबानी फौजांकडे देतील.
- यानंतर, नवीन अंतरिम सरकारची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे नेतृत्व अमेरिकास्थित अहमद अली अहमद जलाली करणार आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- अफगाणिस्तान राजधानी: काबूल
- अफगाणिस्तान चलन: अफगाण अफगाणी
- अफगाणिस्तान अधिकृत भाषा: पश्तो, दारी
10. डब्ल्यूएचओ ने “एसएजीओ” नावाचा सल्लागार गट स्थापन केला

- जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एक नवीन सल्लागार गट तयार केला आहे, ज्याचे नाव आहे द इंटरनॅशनल सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर ओरिजिन ऑफ नॉव्हेल पॅथोजेन्स किंवा सागो.
- सागोचे कार्य हे भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या रोगजनकांच्या साथीच्या संभाव्यतेच्या रोगांचा पद्धतशीरपणे अभ्यास करणे आणि डब्ल्यूएचओला यासंदर्भातील प्रगतीबाबत सल्ला देणे आहे. हा समूह सार्स-सीओव्ही-2 विषाणूचे मूळ शोधण्याच्या दिशेनेही काम करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष: तेद्रोस अधानोम
- डब्ल्यूएचओ चे मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड
- डब्ल्यूएचओ ची स्थापना: 7 एप्रिल 1948
Current Affairs Daily Quiz In Marathi | 15 and 16 August 2021
अर्थव्यवस्था बातम्या (daily Current Affairs for mpsc)
11. एचसीएल फाउंडेशनने ‘माय ई-हाट’ पोर्टल सुरू केले

- एचसीएल टेक्नॉलॉजीजची सामाजिक उत्तरदायित्व शाखा असलेल्या एचसीएल फाउंडेशनने कारागीरांना सक्षम बनवण्यासाठी आणि देशातील हस्तकला क्षेत्राची मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी ‘माय ई-हाट’ हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
- हे व्यासपीठ कारागीर आणि प्राथमिक उत्पादकांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना दाखवून आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी सक्षम करेल, ज्यामुळे अनौपचारिक मध्यस्थ आणि दीर्घ पुरवठा साखळी कमी होईल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ: सी विजयकुमार
- एचसीएल टेक्नॉलॉजीजची स्थापना: 11 ऑगस्ट 1976
- एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मुख्यालय: नोएडा
महत्त्वाचे दिवस (Current Affairs for mpsc)
12. 14 ऑगस्ट: फाळणी भयस्मृती दिन

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले की 1947 मध्ये देशाच्या फाळणीदरम्यान झालेल्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा ‘विभाजन भयस्मृती दिन’ किंवा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळण्यात येईल.
- आपापसातील भेदभाव, वैमनस्य यांचे विष काढून टाकण्यासाठी तसेच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांना बळकट करण्यासाठी या दिवस पाळण्यात येईल.
नियुक्ती आणि राजीनामा बातम्या (MPSC daily current affairs)
13. आदि गोदरेज गोदरेज इंडियाचा राजीनामा देणार

- आदि गोदरेज 01 ऑक्टोबर 2021 रोजी गोदरेज इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागी त्यांचा लहान भाऊ नादिर गोदरेज अध्यक्षपदावर विराजमान होतील.
- तथापि आदि गोदरेज गोदरेज समूहाचे अध्यक्ष म्हणून काम करत राहतील.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- गोदरेज इंडस्ट्रीजची स्थापना: 1963
- गोदरेज इंडस्ट्रीज मुख्यालय: महाराष्ट्र
पर्यावरण बातम्या(Current Affairs for MPSC)
14. भारतात 4 नवीन रामसार स्थळे घोषीत
- भारतातील आणखी चार पाणथळ जागांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून त्यांना ‘आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ जमिनी’ चा दर्जा देण्यात आला आहे.
- यासह, भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 46 वर पोहचली आहे, आणि त्याखालील एकूण क्षेत्रफळ 10,83,322 हेक्टर आहे.
- ही स्थळे खालीलप्रमाणे:
- थोल, गुजरात
- वाधवाना, गुजरात
- सुल्तानपूर, हरियाणा
- भिंडावास, हरियाणा
- रामसर अधिवेशन म्हणजे काय?
पाणथळ जमिनींसाठी रामसर अधिवेशन हा एक आंतरसरकारी करार आहे जो 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणच्या रामसर शहरात स्वीकारण्यात आला. भारतात त्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 1982 पासून सुरु झाली.
निधन बातम्या(Current Affairs for mpsc in Marathi)
15. जेर्ड म्युलर यांचे निधन

- पश्चिम जर्मनीचे माजी फॉरवर्ड आणि बायर्न म्युनिचचे महान फुटबॉलपटू जेर्ड म्युलर यांचे निधन झाले.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्यांनी पश्चिम जर्मनीचे प्रतिनिधित्व करत 62 सामन्यांमध्ये 68 गोल केले आणि क्लब स्तरावर ते बायर्न म्यूनिचकडून खेळतांना त्यांनी 427 बुंडेस्लिगा सामन्यात विक्रमी 365 गोल केले.
- त्याच्या गोल करण्याच्या ताकदीसाठी त्यांना “बॉम्बर देर नेशन” (“राष्ट्राचा बॉम्बर”) किंवा फक्त “देर बॉम्बर” असे टोपणनाव देण्यात आले होते.
16. भारताचे माजी बचावपटू चिन्मय चॅटर्जी यांचे निधन

- भारताचे प्रख्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू चिन्मय चॅटर्जी, जे 1970-80 च्या दशकात खेळले, त्यांचे निधन झाले.
- 1978 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत ते भारतीय संघाचे सदस्य होते जेथे ते उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या स्थानावर होते.
- चॅटर्जी देशांतर्गत कारकिर्दीत मोहन बागान, पूर्व बंगाल आणि मोहम्मदन स्पोर्टिंगसाठी खेळले. त्याने चार वेळा संतोष ट्रॉफीमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केले आणि त्यापैकी तीनमध्ये चॅम्पियन बनले.
Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
