Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 27 डिसेंबर 2023

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: WRD जलसंपदा विभाग 2023 भरती अंतर्गत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार प्रयोगशाळा सहाय्यक पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 27 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

WRD जलसंपदा विभाग परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग WRD जलसंपदा विभाग
भरतीचे नाव WRD जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023
WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1, 27 डिसेंबर 2023
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

WRD जलसंपदा विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न व तांत्रिक विषयातील 40 प्रश्न असे मिळून 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 02 तास
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
5 तांत्रिक प्रश्न  40 80
एकूण 100 200  

WRD जलसंपदा विभाग परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

WRD जलसंपदा विभाग परीक्षा 2023 ही 27 डिसेंबर 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. WRD जलसंपदा विभाग पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11.00
शिफ्ट 2 दुपारी 01.00 ते 03.00
शिफ्ट 3 संध्याकाळी 05.00. ते 07.00

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते  मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 12-14 सोपी
2 इंग्रजी भाषा 11-13 मध्यम
3 सामान्य ज्ञान  10-12 मध्यम
4 बौद्धिक चाचणी 11-13 मध्यम
5 तांत्रिक प्रश्न  33-35 मध्यम
एकूण 77-87 मध्यम

विषयानुरूप WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न व तांत्रिक विषयातील 40 प्रश्न असे मिळून 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms and Phrases- their meaning and use, Comprehension इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक मधील पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत

  • गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्हा मध्ये आहे?
  • त्रंबकेश्वर मंदिर एसआयटी स्थापन कश्याबद्दल केली होती?
  • महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणामार्फत देण्यात आला ?
  • गोवा फिल्म फेस्टीवल अवॉर्ड ?
  • इस्रो ने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस वेहिकल कोणते आहे?
  • महाराष्ट्राचा CSI
  • मे 2023 दरम्यान 17 लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय?
  • जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियानांच्या भेसळ बद्दल नोटीस पाठवली होती ?
  • ऋषी सूनक यांनी कोणाला गृहसचिव पदावरून हटवले ?

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक मधील पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात सामान्य बुध्दीमापन व आकलन, तर्क आधारीत प्रश्न आणि अंकगणित आधारीत प्रश्न इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

तांत्रिक विषयाचे विश्लेषण

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक मधील पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषयात एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते. तांत्रिक विषयात अभ्यासक्रमाशी निगडीत प्रश्न विचारण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग परीक्षा कधी होणार आहे?

WRD जलसंपदा विभाग परीक्षा 27 डिसेंबर 2023 ते 02 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

मी WRD जलसंपदा परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकतो?

WRD जलसंपदा विभाग परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

WRD जलसंपदा विभाग परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

WRD जलसंपदा विभाग परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.