Marathi govt jobs   »   राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण...   »   राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण...

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024, शिफ्ट 1, 13 जानेवारी 2024

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024: राज्य उत्पादन शुल्क विभाग 2023 भरती अंतर्गत दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी पहिल्या शिफ्टची परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 13 जानेवारी 2024 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग
भरतीचे नाव राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023
लेखाचे नाव राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024
राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024 शिफ्ट 1, 13 जानेवारी 2024
परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिटे
एकूण गुण 120

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षा एकूण 120 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 30 याप्रमाणे 120 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 30 30 1 तास 30 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 30 30
3 सामान्य ज्ञान 30 30
4 बौद्धिक चाचणी 30 30
एकूण 120 120  

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा 2024: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा 2023 ही 13 जानेवारी 2024 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11.00
शिफ्ट 2 दुपारी 01.00 ते 03.00
शिफ्ट 3 संध्याकाळी 05.00. ते 07.00

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते  मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 26-28 सोपी
2 इंग्रजी भाषा 25-27 मध्यम
3 सामान्य ज्ञान  24-26 मध्यम
4 बौद्धिक चाचणी 26-28 मध्यम
एकूण 101-109 मध्यम

विषयानुरूप राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024 (शिफ्ट 1)

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 30 याप्रमाणे 120 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षेत मराठी विषयावर एकूण 30 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, शुद्ध – अशुद्ध शब्द, क्रियापद, विशेषण इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • व्याकरण नियम नुसार वाक्य – 2
  • शुद्धलेखन
  • मिश्र वाक्य
  •  अज्ञार्थी वाक्य
  • समानार्थी
  • विरुद्धार्थी
  • म्हणी
  • वाक्प्रचार
  • उतारा – 5 प्रश्न

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Synonym, Antonym, Passage, Articles इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Synonyms
  • Antonyms
  • Idioms phrase
  • One word substitution
  • Passage
  • Voice questions – 2-3
  • Spelling error
  • Grammatical error -2-3
  • Fill in blanks
  • Articles

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 30 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
  • NAPCC स्थापना तारीख
  • क्युबा स्पर्धेत नेमबाजी मध्ये कोण जिंकले?
  • कलम – 143 – सर्वोच्च न्यायालय देशातील न्यायिक प्राधिकरण यांच्याकडून सल्ला घेते
  • मूलभूत अधिकार – राज्यघटना
  • 2021-22 सर्वात जास्त उत्पादकता पीक
  • नाशिक जिल्हा सीमा – जळगाव
  • महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमा कोणती नदी निश्चित करते
  • युद्ध सराव
  • सर्वात जास्त शहरीकरण झालेला जिल्हा-2011 नुसार
  • सर्वात कमी घनता असलेला जिल्हा
  • तापी नदी खोऱ्यातील जिल्हे
  • इतिहास – नाशिक कलेक्टर हत्या – अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे बद्दल चुकीचे वाक्य कोणते

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अंतर्गत परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 30 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात सामान्य बुध्दीमापन व आकलन, तर्क आधारीत प्रश्न आणि अंकगणित आधारीत प्रश्न इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • अंक मालिका -3/4 प्रश्न
  • अक्षर मालिका-3/4 प्रश्न
  • सांकेतिक भाषा -2/3 प्रश्न
  • बैठक व्यवस्था-2/3 प्रश्न
  • दिशा -1/2 प्रश्न
  • नातेसंबंध -1/2 प्रश्न
  • तुलनात्मक प्रश्न-2/3 प्रश्न
  • पझल टाइप प्रश्न -2/3 प्रश्न

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 शी संबंधित इतर लेख

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा कधी होणार आहे?

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा 08 जानेवारी 2024 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

मी राज्य उत्पादन शुल्क परीक्षा विश्लेषण 2024 कोठे तपासू शकतो?

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा विश्लेषण 2024 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.