Marathi govt jobs   »   MPSC Group C Notification   »   MPSC गट क मुख्य परीक्षा 2023

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023, कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जारी केली आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल : विहंगावलोकन

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC गट क मुख्य परीक्षा अंतिम उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC गट क मुख्य परीक्षा 2023
पदांची नावे
  • दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क
  • कर सहाय्यक, गट-क
  • तांत्रिक सहाय्यक
  • लिपिक-टंकलेखक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
गट क एकूण पदे 7510
लेखाचे नाव MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 2023
परीक्षेची तारीख 17 डिसेंबर 2023
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in जारी केली आहे.  उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
कर सहाय्यक येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना

  • महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

     

  •  सदर अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/ शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.

     

  • खेळाडूसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला असून अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

     

  • दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्याासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

     

  • प्रस्तुत अहंताप्राप्त उमेदवारांची यादी मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

     

  • टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023, कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी_4.1

FAQs

कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे का?

होय, कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी कधी जाहीर झाली?

कर सहायक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी 15 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाली.