Marathi govt jobs   »   MPSC Group C Notification   »   MPSC गट क मुख्य परीक्षा 2023...

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर, निवड यादी डाउनलोड करा

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि तांत्रिक सहाय्यक पदासाठी अंतिम निवड यादी व शिफारसपात्र उमेदवारांची यादी जारी केली आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल : विहंगावलोकन

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC गट क मुख्य परीक्षा अंतिम उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC गट क मुख्य परीक्षा 2023
पदांची नावे
  • दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क
  • कर सहाय्यक, गट-क
  • तांत्रिक सहाय्यक
  • लिपिक-टंकलेखक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
गट क एकूण पदे 7510
लेखाचे नाव MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 2023
परीक्षेची तारीख 17 डिसेंबर 2023
अंतिम निकाल तारीख 10 एप्रिल 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

गट क मधील पदांसाठी अंतिम निवड यादी व शिफारसपात्र उमेदवारांची यादी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि तांत्रिक सहाय्यक पदासाठी अंतिम निवड यादी व शिफारसपात्र उमेदवारांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in जारी केली आहे.  उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अंतिम निवड यादी व शिफारसपात्र उमेदवारांची यादी PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव अंतिम निवड यादी शिफारसपात्र उमेदवारांची यादी
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  येथे क्लिक करा येथे क्लिक करा
तांत्रिक सहाय्यक येथे क्लिक करा येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना

  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut- off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत निकालानुसार मागास आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्दयांसदर्भात तसेच अन्य मुद्दयासंदर्भात मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल कधी जाहीर झाला?

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 10 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाला.

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल कोणत्या पदांसाठी जाहीर झाला?

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल विविध पदासाठी जाहीर झाला

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.