Table of Contents
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि तांत्रिक सहाय्यक पदासाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा जारी केली आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल : विहंगावलोकन
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.
MPSC गट क मुख्य परीक्षा अंतिम उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 |
पदांची नावे |
|
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
गट क एकूण पदे | 7510 |
लेखाचे नाव | MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 2023 |
परीक्षेची तारीख | 17 डिसेंबर 2023 |
निकाल तारीख | 27 मार्च 2024 |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
गट क मधील पदांसाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि तांत्रिक सहाय्यक पदासाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.
पदाचे नाव | तात्पुरती निवड यादी | सर्वसाधारण गुणवत्ता यादी |
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
तांत्रिक सहाय्यक | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सूचना
- सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/ शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
- प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
- प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक 28 मार्च 2024 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 03 एप्रिल 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
- ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
- भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
- भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.