Table of Contents
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03 मे 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक पदासाठी गुणपत्रक, उत्तरपत्रिका बद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक बद्दल प्रसिद्धीपत्रक बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: विहंगावलोकन
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 |
पदांची नावे |
|
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
गट क एकूण पदे | 7510 |
लेखाचे नाव | MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 2023 |
परीक्षेची तारीख | 17 डिसेंबर 2023 |
अंतिम निकाल तारीख | 10 एप्रिल 2024 |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (जाहिरात क्र. 111/2023) व तांत्रिक सहायक, गट-क, (जाहिरात क्र. 111/2023) या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक 10 एप्रिल, 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
प्रस्तुत परीक्षांस उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘view’ अंतर्गत उपलब्ध करुन दिल्या आहेत, तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotaling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.
(1) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(2) उपलब्ध होणा-या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.
(3) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉग-इन करावे.
(4) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(5) उपलब्ध होणा-या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या विषयाची निवड करून Save बटणवर क्लिक करावे.
(6) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
गुणांच्या फेरपडताळणीकरिताची सदर वेबलिंक दिनांक 4 मे, 2024:12.00 ते 13 मे, 2024:23.59 वाजेपर्यंत सुरू राहील.
उपरोक्त कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेर पडताळणीकरिता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.